Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026

    हलकल्लोळ

    August 10, 2026

    वारसा

    August 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 24, 2026Updated:March 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर :  03 चैत्र शके 1948; तिथि : षष्ठी 16:08; नक्षत्र : रोहिणी 19:04
    • योग : प्रीति 09:07, आयुष्मान 30:01; करण : गरज 26:57;
    • सूर्य : मीन; चंद्र : वृषभ 30:16; सूर्योदय : 06:41; सूर्यास्त : 18:49;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    विख्यात अमेरिकन कवी हेन्री वॉड्‌सवर्थ लाँगफेलो

    टीम अवांतर

    विख्यात अमेरिकन कवी हेन्री वॉड्‌सवर्थ लाँगफेलो यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1807 रोजी  पोर्टलंड मेन येथे झाला. पोर्टलंड येथे असतानाच तेथील एका नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. तसेच महाविद्यालयात असताना अमेरिकन मंथ्‌ली मॅगझिन  आणि युनायटेड स्टेट्‌स लिटररी गॅझेट यांसारख्या नियतकालिकांतून त्यांच्या कविता आणि निबंध प्रसिद्ध होत. पदवीधर झाल्यानंतर आधुनिक भाषांचा प्राध्यापक म्हणून त्यांना त्यांच्याच बोडन कॉलेजात बोलविण्यात आले होते.

    त्याआधी त्यांनी 1826 ते 1829 या तीन वर्षांमध्ये फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनी या देशांत त्यांनी वास्तव्य केले आणि तेथील भाषांचा अभ्यास केला. पुढे 1836 पासून ते हार्वर्ड विद्यापीठात शिकवू लागले आणि तेथे 1854 पर्यंत त्यांनी प्राध्यापकी केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला लेखनास वाहून घेतले.

    हेही वाचा – सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    कवी म्हणून त्यांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर इंग्लंड आणि अन्य युरोपीय देशांत त्यांचे काव्य आवडीने वाचले जात होते. भावकाव्ये, कथाकाव्ये, सुनीते, महाकाव्य असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. युरोपीय साहित्यातील विचारप्रवाह त्यांनी अमेरिकन साहित्यात आणले. तथापि, विसाव्या शतकात त्यांची लोकप्रियता ओसरू लागली. पहिल्या दर्जाचा कवी म्हणून त्यांना आज मान्यता नसली, तरी साध्या, सोप्या शैलीत आणि साँग ऑफ हायावाथासारखे काव्य लिहिणारा कवी म्हणून त्यांचा लौकिक अद्याप टिकून आहे.  आपल्या उत्तरायुष्यात लाँगफेलो यांनी दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडीचे इंग्रजीत भाषांतर केले.

    त्यांनी 1868-69 मध्ये यूरोपचा दौरा केला, तेव्हा ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांना सन्मानित केले. केंब्रिज (मॅसॅचुसेट्‌स) येथे त्यांचे 24 मार्च 1882 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वेस्टमिन्स्टर ॲबेमधील प्रसिद्ध कविकोपऱ्यात (पोएट्‌स कॉर्नर) त्यांचा पुतळा उभारण्यात आला. असा मान मिळणारे ते पहिलेच अमेरिकन ठरले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस खर्चिक असेल. तुम्हाला वाढत्या खर्चाची थोडी चिंता वाटेल. त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा. जिथे पैसे वाचवता येतील, तिथे वाचवा. पूर्वी जर कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. बऱ्याच काळानंतर तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळेल.

    वृषभ – आजचा दिवस संभ्रमाचा असेल. मात्र भाग्याची  तुम्हाला साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे काम अगदी सहज होईल. आज कुटुंबाकडून भरभरून पाठिंबा मिळत राहील. भावांची देखील मदत मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने, आजचा दिवस काहीसा चढ-उतारांनी भरलेला असेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे घरी आयोजन करू शकता.

    मिथुन – आजचा दिवस फायदेशीर राहील. जोडीदाराच्या पाठिंब्याने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल. उत्पन्नातही वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशेष रस घ्याल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने तुम्हाला आनंद होईल. शेअर बाजार किंवा तत्सम प्रकारची गुंतवणूक केलेल्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

    कर्क – आजचा दिवस आनंदाचा असेल. तुम्हाला एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा आज पूर्ण होईल. कायदेशीर प्रकरणे अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून आशीर्वाद मिळतील. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा आणि पथ्यपाणी सांभाळा.

    सिंह – आज काही कामे भागीदारांच्या मदतीने पूर्ण होतील. ज्यांना भागीदारी सुरू करायची आहे, त्यांच्यासाठीही आजचा दिवस अनुकूल आहे. मात्र घाईघाईने  कोणताही निर्णय घेणे टाळा. तुम्ही कार्यक्षेत्रातील कोणावरही विश्वास ठेवण्याआधी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, अन्यथा फसवणूक होऊ शकते. एखाद्या व्यवहारात चांगला नफा मिळेल.

    कन्या – जे ऑनलाइन काम करतात त्यांना आज एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी कामाबद्दल तुमची प्रशंसा होऊ शकते. आर्थिकदृष्ट्याही हा दिवस फायदेशीर ठरेल. तुमचे उत्पन्न वाढेल. कोणतेही महत्त्वाचे काम प्रलंबित असल्यास, ते आज पूर्ण होऊ शकते. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना मित्राकडून मदत मिळेल.

    हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    तुळ – कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसायात तुम्हाला एखादा चांगला सौदा मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज एक मोठी संधी मिळू शकते. कुटुंबातील काही प्रश्न आज सुटू शकतात. मात्र, बोलण्यावर ताबा ठेवा. कोणतेही अपशब्द किंवा एखाद्याची चेष्टा अडचणीत आणू शकते.

    वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरी करणाऱ्या जातकांसमोर अचानक अनेक कामे पूर्ण करण्यासाठी येऊ शकतात, ज्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत समन्वय राखणे आवश्यक असेल, कारण काही विशिष्ट बाबींवर तुमच्यात मतभेद होऊ शकतात.

    धनु – अतिशय हुशारीने कामाच्या ठिकाणी शत्रूंना सहज पराभूत कराल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यात यशस्वी व्हाल. काही योजना देखील सुरू करू शकता, ज्यासाठी वडिलांकडून पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. भावांसोबत झालेल्या गैरसमजामुळे नात्यातील तणाव वाढू शकतो.

    मकर – सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक फायदेशीर संधी मिळेल. कुटुंबात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. मित्रासोबत वाद निर्माण झाला तरी तुम्हाला संयम बाळगावा लागेल. क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. कुटुंबातील एखाद्या विवाहोत्सुकाचे लग्न ठरू शकते.

    कुंभ – आजचा दिवस आनंदाचा असेल. जोडीदाराकडून मोठा पाठिंबा आणि साथ मिळण्याची शक्यता आहे. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तळलेले पदार्थ जास्त खाणे टाळा, कारण त्यामुळे पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिक व्यक्ती आपल्या भागीदारासोबत व्यवसायाशी निगडित एखाद्या प्रवासाला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल.

    मीन – आज अनेक चिंतांपासून दिलासा मिळेल. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आज त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही मतभेद निर्माण झाले असतील, तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा. भविष्याच्या दृष्टीने काही गुंतवणूक करू शकता. महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरAugust 10, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे अशी आहेत – 15) वृद्धावस्था (50 वर्षांनंतर) – रोग…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 09 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026

    हलकल्लोळ

    August 10, 2026

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 390
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 528
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 841
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026

    हलकल्लोळ

    August 10, 2026

    वारसा

    August 10, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.