लीना जोशी परुळेकर
मागच्या लेखात आपण त्वचा आणि तिचे प्रकार पाहिले. यावेळी आपण, त्वचेवर कुठल्या गोष्टी परिणाम करतात, ते पाहू. आपल्या त्वचेवर अंतर्गत आणि बाह्य गोष्टींचे परिणाम होत असतात. यातील अंतर्गत बदल हे मुख्यत्वे करून Hormones च्या बदलामुळे होत असतात, या बदलांमुळे तुमची त्वचा अतितेलकट होऊन त्यावर मुरुमे येऊ शकतात किंवा त्वचा अतिकोरडी होऊन Hyperpigmentation सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. Hormones मध्ये होणाऱ्या बदलाला Puberty, गरोदरपणा, menstrual cycle (मासिक पाळी), menopause इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अपुरी झोप, चुकीची जीवन शैली, सतत बाहेरचे खाणे, आजारपण या आणि अशा विविध गोष्टी त्वचेवर विपरित परिणाम करतात.
बाह्य गोष्टींमध्ये ऋतू बदल, पाणी, वातावरण तसेच चुकीच्या उत्पादनांचा वापर यांचा समावेश असतो.
ऋतू बदल : जसे ऋतू बदलतात, त्याप्रमाणे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होत असतो. उन्हाळ्यात त्वचा जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. तर, पावसाळ्यात ती बऱ्यापैकी Balance असते आणि थंडीत त्वचा कोरडी होण्याची शक्यता जास्त असते.
पाणी : आपण कुठे राहतो, त्याप्रमाणे पाणी आपल्या त्वचेवर परिणाम करीत असते. हलके पाणी जे मुख्यत्वे समुद्रसपाटीला आढळते, ते तुमच्या त्वचेवर कुठलाही residue सोडत नाही. तेच, जड पाणी जे डोंगराळ भागात किंवा उंच पठारांवर सापडते, त्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. असे पाणी त्वचेवर एक अदृश्य असा residue सोडते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. जलतरण तलावातील पाण्यात क्लोरिन घातलेले असते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. अगदी पावसाचे पाणी हे गुणधर्माने mildly acidic असते, त्यामुळे सुद्धा त्वचा कोरडी पडू शकते.
हेही वाचा – Skin Care : त्वचा आणि तिचे प्रकार
वातावरण : सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा कोरडी पडून त्वचेवर सुरकुत्या, सूक्ष्म रेषा तसेच Pigmentation चे प्रमाण वाढू शकते.
- प्रदूषणामुळे काहीवेळा त्वचा कोरडी होऊन तिचे premature aging होऊ शकते. तसेच, तेलकट त्वचेवर मुरुमांचे प्रमाण वाढते. त्वचेवर allergic reaction होऊ शकते.
- तापमानात होणारे बदल आणि हवेतील आर्द्रता सुद्धा त्वचेतील moisture level imbalance करते. थंड हवा त्वचेला कोरडेपणा आणि flakiness देते. तर, गरम हवा त्वचा अतितेलकट करून मुरुमांचे प्रमाण वाढवू शकते. काहीवेळा त्वचेला fungal infection चा सुद्धा सामना करायला लागू शकतो.
चुकीची उत्पादने : आपण कित्येकदा आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे, याचा विचार न करता आपल्याला आवडतील ती, बाजारात कुठला trend सुरू आहे हे बघून, नवीन उत्पादन आले आहे म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून… अशा अनेक कारणांनी विविध उत्पादने घरी आणतो आणि वापरतो. ती उत्पादने आपल्या त्वचेला नेहमीच suit होतील असे नाही. कित्येकदा आणलेली उत्पादने महाग असतात म्हणून ती suit होत नसून सुद्धा वापरली जातात. अशावेळी आपण आपल्या त्वचेचे अधिकाधिक नुकसान करत असतो. म्हणूनच कुठल्याही मोहाला बळी न पडता आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे, याचा विचार नक्कीच करावा.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
माझ्या मागील लेखामध्ये त्वचेचे प्रकार आणि प्रस्तुत लेखामध्ये त्वचेवर होणाऱ्या आंतरबाह्य घटकांचे परिणाम याविषयी आपण जाणून घेतले. आता आगामी लेखात आपण जाणून घेऊया की, त्वचेची काळजी कशी घ्यावी.
(क्रमश:)
lee.parulekar@gmail.com