Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥38॥ म्हणोनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥178॥ एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरे गा ॥179॥ या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥180॥ ना तरी पृथ्वीचेनि पाडें…
दर्शन कुलकर्णी नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान सोमवती अमावस्या प्रारंभ 15:44 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, परंतु खर्चही वाढू शकतात. नोकरी करणारे जातक आणि व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक जाणकारांच्या सल्ल्या घ्यावा. कुटुंबातील सदस्यांकडून एखादी आश्चर्यकारक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – आरोग्याच्या बऱ्याच काळापासून कुरबुरी सुरू असतील, पण काळजी करू नका; लवकरच आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुमच्या कार्यक्षेत्रात पाठिंबा देईल आणि तुम्हाला आर्थिक फायदाही होईल. मनातील नकारात्मकता दूर कराल, सकारात्मक गोष्टींची कदर कराल. संगीत ऐकल्याने मनाला शांती मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल.…
डॉ. किशोर महाबळ शाळाशाळांमध्ये दरवर्षी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होतात. पण काव्यस्पर्धा होतात का? किती शाळांना आपल्या विद्यार्थ्यांमधील काव्यप्रतिभा शोधण्यात रूची असते? शाळांना जरी या गोष्टीचे महत्त्व वाटत नसले तरीही विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. चांगली कविता करता येणे, चांगली कविता समजणे, हे भाषिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असते. कविता या सर्जनशीलतेचा एक समृद्ध आविष्कार असतात. ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ असे जे म्हटले जाते तेही खरेच आहे. कवी आपल्या कवितांद्वारे वाचकाला जीवनाकडे वेगळ्या अन् व्यापक दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. कविता वाचकाला संवेदनशील करते, विविध भावभावनांचे दर्शन घडविते, निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य दाखविते, कृतिशील…
मनोज जोशी व्यक्ती तितक्या प्रकृती, असं म्हटलं जातं. क्षेत्र कुठलंही असो तिथे तयारीचे, दिखाऊपणा करणारे, दुसऱ्यांना शहाणपण शिकवणारे… असे माणसांचे नानाविध प्रकार पाहायला मिळतात. क्षेत्र जितकं मोठं तितकी व्हरायटी जास्त! पत्रकारितेतही अनेक प्रकारची माणसे पाहिली. काहींची विद्वत्ता तोंडात बोटं घालयला लावणारी होती. अफाट वाचन, भाषेवर प्रभुत्व, पक्की वैचारिक बैठक, लिहिण्याची खास शैली… अशी वैशिष्ट्ये त्यांच्यात होती. काही ‘गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास’ असेही होते, पण ते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. काहींचा अभ्यास चांगला, वाचन चांगले पण केवळ दिखाऊपणा करण्यात सर्व शक्ती खर्ची करणारे होते. त्यातही आपल्या पेशाचा उपयोग ‘वर कमाई’साठी करणारे महाभाग या दिखाऊ सहकाऱ्यांमध्ये होते. मुंबई-ठाणे परिसरात…
हर्षा गुप्ते डोसा, उत्तप्पा, इडली, मेदूवडा असे साऊथ इंडियन अर्थात दाक्षिणात्य पदार्थ सर्वांच्याच आवडीचे असतात. विशेष म्हणजे, मेदूवडा वगळता इतर पदार्थांमध्ये व्हरायटी पाहायला मिळते. हे पदार्थ घराघरात बनवले जातात. तसे पाहिले तर, आजपर्यंत आपण डोश्याच्या पिठात कांदा, मिरची (काही वेळा टोमॅटो) घालून उत्तप्पा बनवत होतो. पण आज जरा हटके उत्तप्पा पाहुयात… साहित्य पुरवठा संख्या – 3-4 व्यक्तींसाठी एकूण कालावधी – अर्धा तास हेही वाचा – Recipe : अनोखी अशी भरली अळूवडी! कृती टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥34॥ तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥165॥ जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥166॥ तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥167॥ मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणे अंतःकरण बोधलें ।…
दर्शन कुलकर्णी शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रा महत्त्वाची आणि आवश्यक दिनविशेष मराठी लघुकथाकार दिवाकर कृष्ण टीम अवांतर प्रसिद्ध मराठी कथाकार दिवाकर कृष्ण केळकर म्हणजेच दिवाकर कृष्ण यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1902 रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल (गुनमटकल) येथे झाला. पुढे मुंबई, पुणे आणि सांगली येथे राहून एम्. ए., एल्एल्. बी. झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथे वकिलीचा व्यवसाय करायला सुरुवात केली. 1922मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकात ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘समाधी व इतर सहा गोष्टी’ या नावाने 1927 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर 1941 साली रूपगर्विता आणि सहा गोष्टी तर 1955…
माधवी जोशी माहुलकर गूळ आणि कणीक यांचे शंकरपाळे म्हणजे अफलातून स्वाद! गुळाचे आणि गव्हाचे इतकं ‘गूळपीठ’ आहे ना की, एकमेकांमध्ये ते कधी अधीन होऊन एकजीव होतात, हे कळत नाही! कणकेमध्ये साखरेपेक्षा गुळाचा गोडवा चवीला जास्त छान लागतो नक्कीच! गूळ आणि कणकेचे शंकरपाळे करायला अगदी सोपे… फार काही जास्त तामझाम न करता सगळ्या पदार्थांमधे आपला गोडवा व वेगळेपण जपणारा पदार्थ आहे! साहित्य हेही वाचा – दिवाळी फराळ… प्रथा आणि परंपरेची जपणूक कृती हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी टीप एकूण कालावधी – एक ते दीड तास तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ…
हिमाली मुदखेडकर सकाळच्या वेळेस मुलखाची घाई… स्वयंपाकघरातील नित्यावळी आटोपता आटोपता जीव मेटाकुटीला आलेला… अशात दारावरची बेल वाजली की, सहाजिकच कपाळावर आठी पडते… ती लपवत दार उघडलं… तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला…! दारात सृष्टी उभी!! सृष्टी… माझी मैत्रिण… पूर्वीची शेजारीण… दोन-तीन वर्षांच्या शेजार सहवासात खूप छान कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालेला आमच्या दोन्ही कुटुंबात… तीही माझ्यासारखीच, गृहिणी! दुपारी चहा घेता घेता आमच्या रोज गप्पा चालत तेव्हा… एकमेकींकडे पदार्थांच्या वाट्या पोहोचवणे, हा तर नित्यक्रम होता… पुढे मुलाला कॉलेज दूर पडते म्हणून आम्ही जागा बदलली. पण अधून मधून एकमेकींना भेटत बोलत होतोच… हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक! “तुझं आवर तू… तोवर मी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जें योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥ जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥155॥ एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥32॥ ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥ परि…

