Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : …तर सामोसे खुसखुशीत होतात!
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : …तर सामोसे खुसखुशीत होतात!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 13, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, खुसखुशीत सामेसे, स्वादिष्ट गुळपोळी, बाकरवड्या, भजी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये भजी, सामोसे, गुळपोळी अन् कोथिंंबीरीच्या बाकरवड्या बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात –

    • भजी करण्याअगोदर डाळीचे पीठ किंचित गरम होईल इतपत भाजून घ्यावे आणि मगच भिजवावे. यामुळे भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि यात तेलाचे मोहन अथवा सोडा घालायचीसुद्धा गरज पडत नाही. सोडा न घातल्याने तेलाची बचत होते. हीच पद्धत बटाटेवडा आणि सामोसा बनवतानासुद्धा वापरता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग

    • सामोसे तयार करताना मैद्यामध्ये बेकिंग पावडर घालावी. (अर्धा किलोला छोटा चमचा) एक चमचा ओवा आणि मिरे बारीक करून घालावेत. एक डाव तेल मिक्सरवर फेटून घालावे आणि मीठ घालून मैदा घट्ट भिजवावा. एक तासानंतर तो कुटून मऊ करावा आणि त्याच्या लांबट गोल पुऱ्या कराव्यात. पाच-सहा करून एकावर एक ठेवून मधोमध कापून त्याचा मोठा कोन करावा आणि त्यात सारण भरावे. पाण्याचा हात लावून वरून बंद करावे आणि गुलाबी रंगावर तळावेत. अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत सामोसे होतात.
    • काही वेळा पोळ्या खूप शिल्लक राहतात. त्याची फोडणीची पोळी करावी लागते. त्यापेक्षा गुळाची पोळी करावी. जरा बदल होतो आणि गोड असल्यामुळे मुले आवडीने खातात. पोळ्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. थोडे तीळ भाजून पावडर करावी. आवश्यक तेवढा गूळ पातेल्यात घेऊन त्यात तूप टाकावे आणि मंद गॅसवर ठेवावे. गूळ पातळ होऊ लागल्यावर मधूनमधून ढवळावे म्हणजे खाली लागणार नाही. गुळाचे खडे संपूर्ण विरघळल्यावर त्यात तिळाची पावडर घालावी आणि सर्व एकत्र झाल्यावर त्यात पोळीचे तुकडे टाकावे आणि ढवळावे. नंतर झाकण ठेवून वाफ आणावी आणि पातेले गॅसवरून उतरवावे. गुळामुळे पोळी खमंग लागते. गुळात तुपाऐवजी पाणी घालू नये. कारण त्यामुळे पोळी थोडी ओलसर होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    • कोथिंबिरीच्या बाकरवड्या तळताना आतील बाकर बाहेर निघतो आणि तेलात वाया जातो. अशा वेळी बाकरवड्या तळण्यापूर्वी सपिटाचा अतिशय पातळ घोळ बनवून घ्यावा आणि त्यात एक-एक वडी बुडवून तळावी. बाकरवड्या चांगल्या होतात आणि आतील मसाला वाया जात नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    By Team AvaantarMay 29, 2026

    गोळ्यांचे सांबार साहित्य मसुराची डाळ – दोन वाट्या जिरे – दोन चमचे धणे – तीन…

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 437
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.