Author: Team Avaantar

ॲड. कृष्णा पाटील माझा मित्र नंदूने नवीन बांधलेल्या घराचा ‘गृहप्रवेश’ कार्यक्रम होता. खूप वर्षांनी खपून त्याने दोन मजली घर बांधलं होतं. समोर अंगण ठेवून चहूबाजूंनी लाल चिऱ्याचे दगडी कंपाऊंड केलं होतं. कष्टाने मिळवलेली बरीच रक्कम या संपूर्ण कामासाठी खर्ची पडली होती. आयुष्यातली खूप वर्षे ती कमाई करण्यासाठी घालवली होती. कारण, सर्व सोयीसुविधा असलेलं घर बांधायचं… हे नंदूचं फार दिवसांपासूनचं स्वप्नं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. म्हणूनच गृहप्रवेश करताना त्याला अतीव आनंद होणं, स्वाभाविक होतं. तर, त्या दिवशी नंदू खूप आनंदी होता. कार्यक्रम दुपारचा होता. खूप उत्साहाने आणि आग्रहाने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नातेवाइक अन् मित्रांना बोलावलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी हार,…

Read More

आराधना जोशी नवीन वर्ष सुरू झाले की, बहुतांश सर्वांच्याच नजरा गणेशोत्सवाकडे लागलेल्या असतात. तसं पाहिलं गेलं तर, पावसाळ्याला होणारी सुरुवात ही सण-उत्सवांची सुरुवात असते. आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याने पावसाचा शिडकावा उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या जीवाला जसा आल्हाददायक असतो, तसाच धरणीमातेसाठी देखील! या काळात सर्वत्र दिसणारी हिरवाई मन प्रफुल्लित करणारी असते. सणावारात हाच आनंद विविध उत्सव साजरा करताना दिसतो. दहिहंडी, गणपती झाले की, तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रीचे. रास गरबा, दांडिया खेळायला उत्सुक असणारी तरुणाई गणपती विसर्जनापासूनच याची तयारी सुरू करताना दिसते. नऊ रात्रींसाठी असणारे वेगवेगळे पोशाख, त्यावर मॅचिंग दागदागिने, मोजडी, अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू यांनी तरुणाईला आकर्षित केलं आहे.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगीं ॥151॥ कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥20॥ देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥ याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥ जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ॥154॥ देखें प्राप्तार्थ जाहले ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 03 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 07:05; नक्षत्र : स्वाती 19:07 योग : वैधृती 21:52; करण : वणिज 20:17 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भावंडांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि घरातील वातावरण आनंददायी असेल. एखादा महत्त्वाचा प्रवास दौरा होण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 3 आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली. घरातून रागात बाहेर पडलेले मोहन आणि आशा…

Read More

सुनील शिरवाडकर अलीकडचीच गोष्ट. एक तिशीचा तरुण दुकानात आला. चांदीचा ताईत त्याला हवा होता. एक ताईत घेतला त्याने. सहजच चौकशी केली, कशासाठी वगैरे… त्याने जे सांगितलं, त्यानं अचंबित झालो! हिरावाडीमध्ये रहात होता तो. पूर्वी कुठेतरी भद्रकालीत राहायचा… त्यांचा जुना वाडा आहे तिथे. शेजारी काका-काकूंचे घर… म्हणजे तेही घरचेच! त्यांच्याकडे खायला-प्यायला हे तिघे भाऊ जात. काका-काकूंची मुलेही यांच्याकडे येत. तर, यांचा असा समज की, ती काकू आपल्या वाईटावर आहे. कोणी आजारी पडले की… त्या काकूनेच काहीतरी ‘करणी’ वगैरे केली… हे डोक्यात फिटट्! ते घर सोडून आता हिरावाडीत रहातात. “मग आता काय त्रास होतो तुला?” मी विचारले. “त्या काकूनेच काहीतरी केलंय… अंगात…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥139॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥ जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥ तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥141॥ कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥142॥ म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 02 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया अहोरात्र; नक्षत्र : चित्रा 16:15 योग :  ऐंद्र 21:01; करण : तैतिल 17:56 सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:33 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. कुटुंबाशी समन्वय सुधारेल आणि जुने मतभेद दूर होऊ…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार ‘बोल माधवी’ हे चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्याचा अनुवाद आहे. काव्याचा अनुवाद करण्याचे कठीण काम आसावरी काकडे यांनी समर्थपणे केले आहे. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा माधवी कोण? मला माहीत नव्हतं. ‘माधवी’ ही ‘गालव आख्याना’ची नायिका आहे. मला पुस्तक वाचावेसे वाटले ते मुखपृष्ठावरील चित्रामुळे! मुखपृष्ठावर ठकीचे चित्र फार बोलके आहे. ठकी म्हणजे पूर्वीची लहान मुलींची लाकडाची बाहुली… या ठकीचा उपयोग अनेक कामांसाठी व्हायचा… अगदी जात्याची खुंटी म्हणून सुद्धा! ठकी असलेल्या माधवीच्या ओठावर पट्टी आहे, हात जोडलेले आहेत, अर्ध्या बाजूवर काळोख आणि अर्धी बाजू उजळलेली, बाजूला तिच्या अस्पष्ट होत जाणाऱ्या प्रतिकृती… गालव आख्यान महाभारताच्या उद्योगपर्वात आलेले…

Read More

सतीश बर्वे मित्रासोबत त्याच्या वडिलांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी मुंबईमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नंबर येण्याची वाट बघत होतो. अचानक पलिकडे दोन-तीन ओळी सोडून एका आरामदायी खुर्चीवर ती बसलेली दिसली… माझ्या मित्राने खांद्यावर हात ठेवून विचारले, “काय बघतोयस एवढा निरखून?” मी समोर हात करून त्याला खूण केली आणि आमच्या दोघांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडले… “केतकी!” आम्ही दोघांनीही एकमेकांकडे दचकून बघितलं… कारण रुमाल बांधून तिचं डोकं झाकलं होतं. क्षण दोन क्षण असेच गेले… तेवढ्यात कशी काय कोण जाणे, पण तिची अन् आमची नजरानजर झाली. तिने खुणेनेच आम्हाला बोलावलं. स्तंभित होऊन आम्ही तिच्याजवळ गेलो. तिने खुणेनेच आम्हाला शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. आम्ही काही…

Read More