Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
हिमाली मुदखेडकर मल्हारराव कुलकर्णी ऊर्फ आप्पा हे नव्वदच्या दशकातील नांदेडच्या सिडक-हडको भागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. व्यवसायाने शिक्षक असणारे आप्पा नंतर हडको येथे रहावयास आले… ते, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि दोन नातवंडे असा त्यांचा परिवार… एकास एक जोडून अशी त्या स्कीमची दोन घरे त्यांनी घेतली होती. दोन बाजूंनी रस्ता असणारे कोपर्यावरचे घर मिळाल्यामुळे त्यांना इतर घरांपेक्षा जरा जास्त मोकळी जागा मिळाली होती… ज्यात त्यांनी एक मोठा हॉल बांधून घेतला होता. या हॉलमध्ये त्यांची इंग्लिश विषयाची शिकवणी चालत असे. त्यांच्या या टूमदार छोटेखानी घराला नाव होते ‘आशीर्वाद’… नावाप्रमाणेच हे घर तिथे येणार्या प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचे खरे! इयत्ता पाचवीपासून इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥200॥ तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥201॥ हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां काहीं । मना नये ॥202॥ म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥203॥ येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि…
दर्शन कुलकर्णी बलिप्रतिपदा दीपावली पाडवा विक्रम संवत 2082 प्रारंभ गोवर्धन पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वृषभ – आजचा दिवस आव्हानांना तोंड देण्याचा असेल. शत्रू तुमच्यावर मात करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र प्रतिभेचा वापर करून कठीण कामे देखील सहजतेने हाताळू शकाल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु दुसरीकडे खर्च देखील वाढतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. मित्रांसोबत आनंदात संध्याकाळ घालवाल. मिथुन – दिवस…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
चंद्रकांत पाटील रंगा कारभारी म्हणजे गुडघ्यापातूर लालकाठाचं धोतर, खादीचा नेहरुशर्ट आणि डोक्याला मुंडासं, कपाळावर गंध, बुक्का लावलेला आणि भराभरा चालणारा गडी… पहाटे पाचला उठून विठ्ठल रूकमाईच्या मंदfरात जायाचा, मंदिर झाडलोट करायचा, सगळं चकाचक करायचा आणि तसाच शेतात जायचा जनावराचं शानघाण बघायचा आणि दूध घेऊन डेअरीला याचा… रंगा कारभारी चालायला लागला म्हणजे त्याच्या कापशीटाइप चप्पलमधून ‘कार- कूर’ असा आवाज निघायचा आणि तो आला हे समजायचं… तर अशा या कारभाऱ्याला दोन बायका पहिली बायको ‘रकमा’ शेजारच्या पाडळीतली आणि दुसरी ‘लक्ष्मी’ उरणाची. पहिली बायको गोरीपान आणि जरा बारक्या अंगकाठीची… पण कणखर होती. ती घरातली सगळी कामं आवरायची, पण तिला शेतातलं काम जमायचं नाही.…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥39॥ तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाही ॥187॥ जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचे केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥188॥ तयातेंचि गिंवसित । हेंहें ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥189॥ तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग…
दर्शन कुलकर्णी लक्ष्मीपूजन (सायंकाळी 06:10 ते रात्री 08:40) दर्श अमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्यांकडून भरघोस मदत मिळेल, त्यामुळे आर्थिक अडचणींची धग कमी जाणवेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे भेट म्हणून मिळू शकतात. व्यापार आणि व्यवसाय अनुकूल राहील. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ – आजच्या सुविधा उद्या उपलब्ध नसतील, त्यामुळे आजच फायदा घ्या. अडचणीत आणणाऱ्या मित्रांशी चार हात लांब राहणेच चांगले. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. जंगम आणि स्थावर अशा दोन्ही मालमत्तांमध्ये वाढ होऊ शकते. आज आरोग्याकडे लक्ष द्या. मिथुन – इतरांच्या मदतीने…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…! मराठी भाषा… आपली मायबोली, मातृभाषा. तसं तर बऱ्याच लोकांना कमीत कमी चार भाषा तर येतातच. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा अजून एखाद-दुसरी किंवा दुसऱ्या अनेक भाषा येतात. हे चांगलं आहे. भाषा मग ती कोणतीही असो, ती शिकणं चांगलंच आहे. पण दुःख होतं की, आपली स्वतःची भाषा मात्र आपण खूप चुकीची, अशुद्ध बोलत असतो. ‘जागा भेटली’, ‘बस भेटली’, ‘पट्टी सांडली’, ‘पेन पडला’, ‘वहिनी मिळाली होती काल बाजारात’, ‘साडी घातली’… एक उदाहरण आहे का? एक मराठी सीरियल करत होते दिग्दर्शक होते कांचन नायक सर. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय माणूस. त्यांनी एकदा सीन कसा…
माधवी जोशी माहुलकर मोगरी घातलेला बेसनाच्या लाडवाची प्रक्रिया नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या चॅनलवर पहायला मिळाली. मोगरी घातलेला बेसनाचा लाडू काय असतो, याबद्दल मलाही उत्सुकता होतीच! त्यांचा संपूर्ण व्हिडीओ पाहील्या नंतर मलाही हे लाडू बेसनाला मोगरी घालूनच करावेत, असे वाटले… तसे मी लाडू केले सुद्धा! ते चवीला रवाळ आणि सुंदर झाले. शिवाय, टाळूला अजिबात चिकटत नाहीत. विशेष म्हणजे, बेसन देखील खूप लवकर भाजता आला. आता हे मोगरी घातलेले लाडू कसे करतात, त्याची प्रक्रिया पाहू… साहित्य हेही वाचा – Recipe : गूळ आणि कणकेचे शंकरपाळे! कृती तयारीसह एकूण कालावधी – 1 तास हेही वाचा – Recipe : दिवाळी स्पेशल… खमंग…
पराग गोडबोले माझा वाढदिवस झाला 30 सप्टेंबरला. खूप शुभेच्छा आल्या आणि मी भरून पावलो अगदी! हल्ली या शुभेच्छा देणं खूप सोप्पं झालंय, त्यामुळे अगदी पूर येतो त्यांचा आणि त्या सगळ्यांना उत्तरे देता देता श्रमतो जीव… तरीही छान वाटत राहतं दिवसभर. कधी नव्हे ती सुट्टी घेतली होती. बायकोला आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं, “घरी काही करत बसू नको… छान कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ.” अर्थात, सर्वसामान्य डोंबिवलीकराची झेप ‘मॉडर्न कॅफे’च्या पुढे जात नाही आणि तिथे जाऊन त्याच लाल, पिवळ्या, हिरव्या भाज्या, रोट्या, नान हे सगळं सदोदित आणि निरंतर खाऊनही जित्याची खोड काही जात नाही…! “नको बाई, मी घरीच करते काहीतरी तुझ्या आवडीचं……

