Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अण्णांचं मृत्युपत्र
    ललित

    अण्णांचं मृत्युपत्र

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीJuly 15, 2026Updated:July 16, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, रंग हळव्या मनाचे, आजारी वडिलांची सेवा, अण्णांना पॅरेलिसिस, अण्णांची तीन मुले, शिरीषचे भाऊ निर्मल आणि गुणवंत, स्वार्थी निर्मल, स्वार्थी गुणवंत, शिरीषकडून अण्णांची सेवा, सून नेहाकडून सासऱ्याची सेवा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    शिरीष जसा घरात शिरला, तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली,

    “अहो, जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत!”

    “हो. फ्रेश झालो की, लगेच बघतो.”

    बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठीक दिसत नव्हतं.

    “काय झालं अण्णा? काय होतंय?” स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला,

    “काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा…”

    “म… ला… दे… वा… क… डे… जा… य… चं… य…” परत हात वर करून ते म्हणाले.

    शिरीषच्या डोळ्यांत पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला,

    “मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”

    अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले…

    “बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का?”

    त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय, असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरून आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं,

    “डॉक्टरांना बोलावू?”

    त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला,

    “बरं बरं. मी रोहनचं जेवण झालं की, त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला.”

    अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला.

    “काय झालं? काय होतंय त्यांना?” नेहाने विचारलं.

    “काही होत नाहीये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत! कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच…” शिरीष गहिवरून म्हणाला.

    शिरीष योग्यच म्हणतोय, हे नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्षं अण्णा पॅरेलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे… पण ते तेवढंच. खरंतर, शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे सुरू राहील, असं त्यांना वाटलं. सुरुवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत, घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करून वाढणं, नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे, असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कामावरून कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली… तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं.

    हेही वाचा – आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यांत दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं. नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुद्धा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती, पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? माणूस ठेवला तर त्याचे पैसे कोण देणार? शिवाय, त्यानं घरात चोऱ्यामाऱ्या केल्या तर? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून सोडलं. शिरीषची संमती घ्यायचीही त्यांना गरज वाटली नाही.

    अर्थात, शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्यांच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत, यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की, अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि शहरातून फिरवून आणायचा.

    तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.

    0000

    झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला, “आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत.”

    मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, “अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला.”

    अण्णांनी मान डोलावली.

    रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरू होता.

    सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते. त्याला हायसं वाटलं.

    “कसं वाटतंय?” त्याने विचारलं.

    त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.

    “अण्णा मी येतो आंघोळ करून. मग तुमचा चहा झाला की, तुम्हाला आंघोळ घालेन.”

    अण्णांनी मान डोलावली. शिरीष रूमच्या बाहेर आला तर, नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय, असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं.

    शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला, तशी नेहा त्याला म्हणाली,

    “अहो, अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.”

    शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाहीत. त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला,

    “डॉक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…” पुढे त्याला काही बोलता येईना.

    डॉक्टर आले, अण्णा गेल्याचं निदान करून गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली, तसा शिरीष भानावर आला. सगळ्यांना कळवणं भाग होतं. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला, निर्मलला फोन लावला.

    “दादा अण्णा गेले…” तो रडतरडत म्हणाला.

    “काय? असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”

    “सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये, मग सांगेन तुला सविस्तर…”

    “अरे बापरे, शिरीष, आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार!”

    तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला…

    “शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर, आम्हाला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये. तिचे पैसे आता कोण देणार?”

    शिरीषला संताप आला, पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्याने फोन बंद करून मधला भाऊ, गुणवंतला फोन लावला आणि अण्णांची बातमी सांगितली.

    “ओ माय गॉड! शिरीष मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”

    “अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये, मग मी तुला सगळं सांगतो…”

    “मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की, मला कळव…”

    शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली. वडील वारल्याचं कोणतंच दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवत नव्हतं. पण आता ते बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.

    निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी, गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला,

    “अरे, मी दोन तासांपूर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी? बरं आलोच…” जसा वडिलांच्या अंत्यविधीला येऊन तो शिरीषवर उपकारच करणार होता.

    सगळेजण त्याची वाट पहात बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.

    तेराव्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुद्धा खर्च केला नव्हता. तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला. चौदाव्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढलाच…

    “अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्युपत्र करून ठेवलं होतं का? नाही म्हणजे, आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटेहिस्से नको का व्हायला?”

    “दादा मला तरी मृत्युपत्राबद्दल काही माहीत नाही… आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल, असं मला वाटत नाही.”

    हेही वाचा – जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    “असं कसं म्हणता भावजी? त्यांची काही फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मधेच बोलली.

    “हो शिरीष,” गुणवंत म्हणाला, “मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर, आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे.”

    वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची मात्र खूप काळजी होती, हे स्पष्ट दिसत होतं.

    “रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं…” शिरीष आठवून म्हणाला.

    “अरे, मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब,” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

    शिरीषने डायरीतून वकिलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, “ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे!”

    क्रमश:
    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026 ललित

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026 ललित

    गुलकंद

    July 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    By ॲड. कृष्णा पाटीलJuly 14, 2026

    पूर्वार्ध जेवणाचे ताट बाजूला सारून तो गुडघ्यात मान घालून तसाच बसून राहिला. कोपऱ्यात पडलेल्या बारावीच्या…

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    गुलकंद

    July 13, 2026

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026

    …अन् ती 32 वर्षं झोपली!

    July 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव 

    July 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 360
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 491
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 236
    • मैत्रीण 24
    • ललित 780
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जुलै 2026

    July 16, 2026

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.