Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: ॲड. कृष्णा पाटील
पूर्वार्ध वकील आणि कोर्ट कचेरी कधी उभ्या आयुष्यात पाहिली नाही. पोलीस स्टेशनची पायरी तर नावच काढू नका. वकील म्हटलं की, पांढऱ्याचं काळं न् काळ्याचं पांढरं करणारा माणूस. त्यांना खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं लायसनच मिळालेलं असतंय. लहानपणी तर आण्णा सांगायचे, ‘कधी प्रसंग आला तर दोन म्हणता चार पावलं मागं सरायचं. पण वकिलांच्या आणि कोर्ट-कचेरीच्या नादाला कधी लागायचं नाही.’ पण आज मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून नेमकं नको त्या वाटेला जावं लागत होतं. आता कोण आणि कसला वकील भेटतोय काय माहीत? दुपार सरत आली होती. घाटे वकिलांच्या कार्यालयाच्या खिडकीबाहेर आभाळ भरून आलं होतं. गार वारा सुटला होता. मक्याच्या दाण्याएवढा…
उत्तरार्ध नानांनी अरुणासाठी पुसेगावचं स्थळ आणलं होतं. सात लाखांवर अडून बसलेली इंदू मावशी देखील तडजोडीला तयारी झाली. आपला मुलगा सचिनला ती म्हणाली, “अरुणाचं आयुष्य माझ्या म्हणण्यापेक्षा मोठं हाय… मला मस्त वाटतंय तेला धडा शिकवावा, पण जशी योग्य तडजोड हुईल तशी करूया. आता तिचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं पायजे.” सचिनच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी हलकंसं समाधान उमटलं. दुसरीकडे, अरुणाचा नवरा अभिजीत, सामंत वकिलांच्या कार्यालयात पोहोचला. वकील म्हणाले, “पहिलं लग्न अजून कायदेशीररीत्या संपलेलं नाही. न्यायालयाचा अंतिम घटस्फोटाचा हुकूम झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी जर पुढील विवाहाची अशी घाई केली असेल, तर ती बाब त्यांच्याच अडचणीची ठरू शकते. आधी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवू. त्यांनी…
पूर्वार्ध खाली मान घालून तो बराच वेळ शांत बसला होता. हाताची बोटं चाळवत फरशीवर पहात होता. थोड्या वेळाने त्याने उगीच दाढी खाजवल्यासारखी केली. काहीतरी नवीन सुचल्यासारखे आठवून तो म्हणाला, “तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे साहेब. कुठवर कोर्टकचेरी करत राहणार? आयुष्य काय थांबून रहात नाही. त्यापेक्षा मिटवून घेतलेलं बरं. पण आमची आई थोडी तर्कट आहे. तिला सांभाळून घ्या.” समोरची फाइल बाजूला ठेवून बोटातली अंगठी फिरवत फिरवत मुंगळे वकील म्हणाले, “पुढच्या आठवड्यामध्ये लोकअदालत आहे. त्यावेळी विरुद्ध पार्टी येईल. तुम्ही सर्वजण या. शांतपणे चर्चा करून योग्य तो तोडगा काढूया.” कागदपत्रांची पिशवी घेऊन सचिन कार्यालयाच्या बाहेर पडला. रस्त्यावर गर्दी होती. रहदारी वाढली होती.…
न्यायालय म्हणजे फक्त कायद्याची भाषा बोलण्याची जागा नसते, तिथं रोज माणसांच्या आयुष्याची असंख्य पानं उलटली जातात. काही पानांवर अन्याय असतो… काही पानांवर अपराध असतो… तर काही पानांवर अश्रू असतात. काहींवर मात्र काळाने शिकवलेला कठोर धडा असतो. कालचा दिवस तसाच होता. कोर्टाचं काम सुरू होण्याआधीच पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. त्याने तारीख चुकवली होती. त्यामुळे त्याच्यावर अटक वॉरंट होते. आरोपी परजिल्ह्यात राहणारा होता. योगायोग असा की, आज त्याचे वकील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे तेही आले नव्हते. घरी तर पोलीस येऊन गेले होते, नेमका तो त्यावेळी घरात नव्हता, नाहीतर तो आता तुरुंगात असता. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या…
उत्तरार्ध संदेश माने जामिनावर बाहेर आला. संपाबुवा त्याला घरी घेऊन आला. विस्कटलेली केसं, वाढलेली दाढी, शिळा पडलेला चेहरा, चुरगळून टाकलेल्या फुलासारखा संदेश दिसत होता. आई सुनीताला भडभडून आलं. ती तशीच लगबीगीने आत गेली. भाकरीचा एक तुकडा आणि पाणी घेऊन बाहेर आली. पाण्याचं चार शितूडं शिंपडून तिने भाकरीचा तुकडा संदेशवरून ओवाळून टाकला. “खोटी केस दाखल केली आहे, हे कोर्टाला पटलं. आपल्या वकिलांनी चांगली बाजू मांडली. चुलत चुलत्याचा आणि आमचा जमिनीचा वाद आहे. तो दहा-बारा वर्षे चालू आहे. संदेशच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. संदेश आणि आई दोघेच घरात असतात. संदेश एमपीएससीच्या परीक्षेला बसला आहे. आत्ताची त्याची शेवटची परीक्षा आहे.…
पूर्वार्ध गावच्या चावडीसमोर पानगळ झालेलं जुनं लिंबाचं झाड शांतपणे उभं आहे. कधीकाळी नामा सावताने त्या झाडाला बांधून दिलेला काळा दगडी कोरीव कट्टा ऐसपैस पसरला आहे. भणाण वारा सुटला की, सगळा कट्टा वाळलेल्या पाल्यापाचोळ्याने भरून जातो. मग देवळापुढं कायम पडून असणारी वांझोटी, विधवा यलव्वा सकासकाळी तो कट्टा तुरकाट्याच्या खराट्याने लोटून चकचकीत करते. देवळाच्या बाजूला वडापावच्या दोन चाकी मोडक्या गाड्यावर पिठाळलेले दोन मोठाले भजी आणि एक मुठीएवढा शिळ्या पावाचा तुकडा तिला भिकाजी देतो. तेवढ्यावर तिचा अर्धा दिवस तरी सहज जातो. नंतर दिवसभर देवळात कोण दर्शनासाठी आला तर, चवली-पावली मिळते. कधी कुणीतरी घरातलं उरलंसुरलं जेवण पण देतं. ती कुणालाच नाही म्हणत नाही. यल्लवाने…
नोकरीसाठी गाव सोडून आता बरोबर पंचवीस वर्षे झाली. तरीही गाव अन् गावाची ओढ काही कमी होत नाही. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, नोकरीची रखरखीत, तणावग्रस्त जिंदगी तात्पुरती गठुळ्यात गुंडाळून, गावाकडच्या शांत आणि स्थिर जगण्याकडं जावं, ही इच्छा उफाळून येते आणि माझी पावलं आपोआप गावाकडे वळतात… निवाळसंख खळाळत्या पाण्याचा ओढा ओलांडून गावच्या वेशीला पोहचतो न पोहचतो तोच, दिवसरात्र वाजणाऱ्या मारुतीच्या देवळातील, बापू दादाच्या महिपाने नवसाने बांधलेल्या, भल्या मोठ्या पितळी घंटेचा प्रसन्न लहरी उत्पन्न करणारा, गावचा आसमंत भरून टाकणारा, पवित्र घंटानाद लहरत राहतो. पहाटेच्या काकड आरतीला पेटविलेल्या धूपाचा दरवळ देवळातून बाहेर पडून गावभर मांगल्य लेऊन पसरलेला असतो. पंढरीची वारी करून परत येताना…
उत्तरार्ध आज बारावीचा निकाल लागला. सौरभ हुशार आहे… चुणचणीत आहे. शाळेत नेहमी डिस्टिंक्शनमध्ये असतो. त्यामुळे आज निकालही तसाच लागणार अन् तो मेडिकलला जाणार, असं सर्वांनी परस्पर ठरवून टाकलं. अर्थात, तोही “हो”ला “हो” म्हणत गेला. पण प्रत्यक्षात सौरभला केवळ बहात्तर टक्के मार्क मिळाले. सौरभची अवस्था वाईट झाली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. पार चोळामोळा झाल्यासारखी त्याची स्थिती होती. पोराचा हा निकाल ऐकून माणिकराव आणि वैशाली हे दोघेही हादरले होते. माणिकरावांनी लगेच सयाजी नानांना बोलावून घेतले. पण दोन दिवसांनी सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या वारीला अन्नदान करण्याचा कार्यक्रम असल्याने सर्व पॅकिंग करायला रात्री अकरा वाजले, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच आले. सयाजी नाना सौरभला म्हणाले,…
पूर्वार्ध जेवणाचे ताट बाजूला सारून तो गुडघ्यात मान घालून तसाच बसून राहिला. कोपऱ्यात पडलेल्या बारावीच्या मार्कलिस्टकडे अपराधी नजरेने पाहू लागला. कातर आवाजात वैशाली पुन्हा म्हणाली, “पोटभर खा आणि आता डोक्यातून सगळं काढून टाक. आम्ही तुला काय बोललो का? कशाला उगाच डोक्यात राख घालून घ्यायची?” तो आईकडे विमनस्क होऊन पाहात राहिला. सकाळपासून तिने अंघोळही केली नव्हती. चुरगळलेली साडी नेसून तिने निमूटपणे चार भाकरी थापल्या होत्या. सौरभच्या बारावीच्या निकालानंतर तिची सगळी हालचाल कोरडी आणि यांत्रिक झाली होती. घरात तर कोण कुणाशी बोलत नव्हतं. सगळं घर चार भिंतीत थंड, निर्जीव होऊन गेलं होतं. बारावीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत आई, बाबाचे उत्साहाने ओसंडून…
भाग – 2 घरात पहिल्यांदाच मोठं कार्य होतं. मुलगा शिकून नोकरीला लागला होता. कष्टाने संसार उभा केलेल्या बापासाठी हा दिवस मोठा होता. नामदेवला वाटलं, आमदार साहेबांना पत्रिका दिली, त्यांनी दोन शुभेच्छा दिल्या, तर मुलालाही आनंद होईल. त्यासाठी नामदेव सकाळीच साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसला होता. साहेब बाहेर आले, पण त्या गर्दीत नामदेवला भेटताच आलं नाही. ते गाडीत बसून कुठेतरी जायच्या तयारीत होते. पुढे होऊन हातातली पत्रिका उंचावत तो म्हणाला, “साहेब, मुलाचं लग्न आहे… पत्रिका द्यायची होती…” आमदार साहेबांनी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं की नाही, ते समजलंच नाही. ते फक्त म्हणाले, “आज खूप मोठा दौरा आहे. मी उद्या किंवा परवा फ्री असेन.…

