Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!
    अवांतर

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 15, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नीता कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, पंढरीची वारी, वारकऱ्यांचे कपडे, वारकऱ्यांचे पांढरे कपडे, वारकऱ्यांचा पेहराव, पंढरीच्या वारकरणी, वारकऱ्यांचा साधेपणा, वारकऱ्यांशी संवाद, देवाचे ओझे, विठ्ठल रुक्मिणी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारीचं कुतूहल काही केल्या उलगडत नाही. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक, अप्रूप वाटत राहतं. मला तर या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्यांचं पण वाटतं! शर्ट, पायजमा, टोपी पांढरे  शुभ्र… इतके पांढरे कपडे घालून कसे येतात हे लोक? त्याविषयी  विचारावं असं वाटलं. आळंदी पुणे वारीला गेले होते, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला. घोळका करून रस्त्याच्या कडेला वारकरी बसले होते.

    गंमत अशी असते की – “नमस्कार माऊली कुठून आले?” – अशी सहज सुरुवात करून त्यांच्याशी बोलता येते. औपचारिकपणा अजिबात नसतो. तेही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. त्यातल्या काही दादांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा –

    “आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो, इतर वेळेस नाही. घरी गेलो की भट्टीला देतो आणि आणून बांधून ठेवून देतो पुढच्या वर्षीच काढतो.”

    “मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला कपडे तरी घेते रे… तेवढंच मला समाधान!”

    एक दादा म्हणाले, “माझी आई माझ्यासाठी कपडे शिवते. मशीन कामं येतं तिला. किती छान शिवते बघा ना!” असं म्हणून दादांनी उभं राहून पायजमा शर्ट दाखवला… त्यांना त्यांच्या आईचे कौतुक आणि अभिमान आहे, याचा मला फार आनंद झाला.

    “हा बघा सोपाना, याचा भाऊ ज्ञाना… याचं लय लाडकोडं करतोय… तोच देतो याला नवीन कापडं घेऊन…” एक दादा सांगत होते. वयाने थोडा लहान असलेला सोपाना खुशीत येऊन हसत होता.

    हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    “माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी घेऊन येते.”

    “किती कपडे घेऊन येता?” मी विचारल.

    “पावसा पाण्यात भिजतात म्हणून पुरेसे जोडं घेऊन यावे लागतात…”

    एक एक जण सांगत होते. मी ऐकत होते. एकाने तर सांगितले की,

    “वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात. कौतुकाने घालतात…”

    हे ऐकून तर माझे डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा! वारीत पंढरीला जाऊन आलेल्या त्या कपड्यांबद्दल सुद्धा भक्तीभाव… आत्मीयता असावी… आपली संस्कृती किती  संवेदनशील आहे, याचीच यातून आपल्याला प्रचिती येते. लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते!

    वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींच्या अंगावर साध्यासुध्या साड्या होत्या. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. मग त्यांच्याशीही गप्पा मारल्या. एकजण म्हणाली,

    “पुरुषमाणसांची गोष्ट वेगळी असते… त्यांना पाहिजेतच तशी चांगली कापडं… आमच्या बायकांचं काय हो… वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा… इथं आमची कापडं कोण बघतंय?”

    शांत संयमीत आवाजात त्या बोलत होत्या. त्यांची कुठलीच तक्रार नव्हती.

    “वरून पाऊस पडतोय म्हणून लगेच वाळतील अशा साड्या आम्ही घालतो आणि त्यानं झपाझपा चालायला येतंय बघा…”

    “वारीपुरत्या घालायला आमच्या मैत्रिणी पण आम्हाला साड्या देतात…”

    एक ताई म्हणाल्या, “आम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे मागे टाकतो आणि वारीला जायच्या वेळी एखादी नवीन साडी घेतो.”

    सगळ्या बायका गप्पा मारत काही काही सांगत होत्या…

    “अहो, हिचा मुलगा अमेरिकेत आहे. पण तिला कसला गर्व नाही बघा! ती आमच्यातच बसतीय…”

    मी ताईंना म्हटलं, “अरे वा! तुमचा मुलगा तिकडे आहे?”

    “पांडुरंगांनं बुद्धी दिली म्हणून शिकला. आता बक्कळ पोरं तिकडं जातायत, त्याचं काय! तो गेला म्हणून आपण आपला धर्म सोडायचा का काय?”

    त्या अगदी सहजपणे म्हणाल्या.

    जीवनाच साधं सोपं तत्वज्ञान घेऊन या बायका जगत असतात. हा लहान, हा मोठा असा भेदभाव त्यांच्यात नसतो. या खऱ्याखुऱ्या ‘वारकरणी’ होत्या. देहभान विसरून आळंदी ते  पंढरपुर पायी चालणाऱ्या… श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं. त्यांच्या कपड्यांकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं.

    हेही वाचा – तुळस माझी भाग्याची!

    एक बाई उभी राहिली डोक्यावरून पदर घेतला, दुसरीने तिच्या डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली… मी बघत होते न राहून विचारलं…

    “ताई, कसं चालता हो इतकी जड मूर्ती डोक्यावर घेऊन?”

    ती पटकन म्हणाली,

    “देवाचं कुठं ओझं असतय का?”

    मनात आलं, इतका सोज्वळ भक्तीभाव असलेल्यांनाच वारी करायला मिळते… वारकऱ्यांच्या अंगावरच्या पांढऱ्या कपड्यांसारखंच त्यांचं अंतरंग पांढरं स्वच्छ… शुद्ध आहे… ही मोठी मोलाची गोष्ट आहे…

    वारी काय काय शिकवते ना आपल्याला! त्यातून काय शिकायचं हे मात्र आपल्या हातात आहे…

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026 अवांतर

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026 अवांतर

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    तुळस माझी भाग्याची!

    By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 12, 2026

    सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून…

    आठवण आषाढी वारीची

    July 10, 2026

    वारी पंढरीची… जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते!

    July 9, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026

    …अन् ती 32 वर्षं झोपली!

    July 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव 

    July 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 360
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 490
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 236
    • मैत्रीण 24
    • ललित 780
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.