Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 
    ललित

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    Team AvaantarBy Team AvaantarApril 24, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, सदानंद पाठक, कथा सदानंद पाठक यांची, सदानंद पाठक यांचा विदेशदौरा, सदानंद पाठकांची उच्चशिक्षित मुले, जगदीश महाजन भ्रष्टाचार, महाजनांच्या घरावर इन्कम टॅक्स छापा, हितचिंतक सदानंद पाठक, महाजन बेहिशेबी मालमत्ता, महाजनांच्या कुटुंबाचा परकेपणा,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    उत्तरार्ध

    “साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!” सदानंद पाठक बोलला… बँकॉकच्या हॉटेलमधील पाठकच्या रूममध्ये गेलो होतो. एका शाळेतील क्लार्कने एवढ्या फॉरेन टुर्स कशा जमवल्या, याची उत्सुकता होती, म्हणून त्याला भेटलो.

    “आमचं ठीकच आहे. औरंगाबादला या. तिथे आमचा मोठा बंगला आहे, दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लॅट्स आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियर बार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय,” मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.

    ‌”अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच राहतो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण का हो साहेब! तुम्ही एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त पगारावर जमवली? की, काही साइड बिझनेसही आहे तुमचा?”

    ‌मी जोरात हसलो… उघड होतं की. हे सगळं मी भ्रष्टाचार करून कमावलं होतं! दोन-तीनदा मी पकडलोही गेलो होतो, पण मंत्र्यांच्या कृपेने सहीसलामत सुटलो होतो.

    ‌”अहो, पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरिष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं, हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की, साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?”

    ‌”साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं, मी आनंद मिळवण्यात! अर्थात, पैसा कमावण्यातही आनंद मिळतोच की!”

    ‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?

    ‌”घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो, हे समजेल तुम्हाला…”

    ‌पाठक निर्मळ हसला. माझ्या बोलण्यातली घमेंड त्याला जाणवली असावी. मग म्हणाला, ‌”पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की, आम्हालाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल.”

    ‌”हरकत नाही. येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो… गुड नाइट!”

    ‌आम्ही रूमवर परतलो, पण मला झोप काही लागेना. कमी पैशांतही अनेक गोष्टी करता येतात, हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बीपी, डायबिटिस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश… कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी, सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकॉकचं साइटसीइंगही एन्जॉय करू शकलो ‌नव्हतो.

    बँकॉकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

    पाठकला इम्प्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली. एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता!

    ‌”या साहेब, या मॅडम…” पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण!

    हेही वाचा – आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    हॉलमध्ये थोडंसंच पण सुबक फर्निचर होतं. भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपॉयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लॉवरपॉट्स होते. शोकेस ट्रॉफिजने भरलेली होती.

    ‌”बापरे, इतक्या ट्रॉफी! कुणाच्या आहेत या?” माझ्या तोंडातून नकळत शब्द निघून गेले.

    ‌”सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ.च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या…” पाठक म्हणाला.

    ‌”वा, छान!” मी चांगलाच इम्प्रेस झालो.

    ‌”या साहेब, तुम्हाला घर दाखवतो. अर्थात, तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी…”

    ‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो, तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकूण एक रूम पाठक कुटुंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी वृत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती… छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं!

    ‌बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पूर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.

    ‌”घ्या, साहेब!”

    पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भूक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.

    ‌”वा, अप्रतिम!” मी पाठककडे पाहात म्हणालो.

    ‌”साहेब, तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात, नाहीतर एक वेगळाच मेन्यू आम्ही ठरवला होता…”

    ‌”अशी सुरेख चव असेल तर, जेवायला यावंच लागेल!”

    मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो. ‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करून दिल्यावर तो माझ्या आणि सौ.च्या पाया पडला.

    ‌”तुझ्या हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडील मदत करणार असतील ना तुला!”

    पाठकला हिणवण्यासाठी ‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.

    ‌”बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो, आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शून्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून किती अपेक्षा करायची आम्ही त्यांच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर कायमची रुखरुख लागेल आम्हाला की, त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो. स्वकर्तृत्वावर केलेली कोणतीही गोष्ट समाधान देऊन जाते. नाही का?”

    ‌त्याच्या सडतोड उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती… हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो, याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती, ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. माझ्या मुलांच्या बेजबाबदार, कर्तृत्वशून्य वर्तनाला मीच जबाबदार होतो, याची मला जाणीव झाली.

    ‌पाठक कुटुंबाचा निरोप घेऊन निघालो. पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो, ते पाठक कुटुंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटुंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.

    दिवस बदलत गेले. निवडणुका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभूत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती. कारण मी आता नोकरीत नव्हतो.

    एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर चार-पाच सुटाबुटातील माणसं उभी होती.

    ‌”जगदीश महाजन, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आलोय.”

    त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात दिलं. मी गारठलो… माझे हातपाय थरथर कापू लागले.

    ‌”मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?” मी कापऱ्या आवाजात विचारलं.

    ‌”जरूर बोला. त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्रं आहेत आमच्याकडे!”

    ‌”अहो, पण साहेब मी आता रिटायर झालोय.”

    ‌”साहेब, जरूरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की, आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल…” तो स्मित करत म्हणाला. हे काय झालं, कसं झालं याचा मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो.पण आता मी काहीच करू शकत नव्हतो.

    ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरू होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. ‘आता भोगा आपल्या पापाची फळं’ अशाच नजरेने ती बघत होती.

    हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

    ‌”चला साहेब,” झडतीत सापडलेले बेहिशोबी 25 लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला.

    ‌”कुठे?”

    ‌”चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत…”

    ‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो.

    ‌मला अचानक पाठकची आठवण आली.

    ‌”साहेब, एक फोन लावू?” मी विचारलं.

    ‌”नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स. त्याचा काही उपयोग होणार नाही!”

    ‌”साहेब, हा माणूस साधा कारकून आहे.”

    ‌”ठीक आहे. स्पिकर ऑन करा…”

    ‌मी पाठकला फोन लावला.

    ‌”हॅलो पाठक, मी महाजन बोलतोय. पाठक तुम्ही जिंकलात, मी हरलो…”

    ‌”काय झालं साहेब? असं का बोलताय?”

    ‌”पाठक इन्कम टॅक्सचा छापा पडला, आज बंगल्यावर! मी पकडलो गेलो… यातून मी सुटू शकेन, असं वाटत नाही.”

    ‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला… ‌”साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही. पण मी तुमच्या सुटकेसाठी जरूर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं, ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हाला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद असतो साहेब. काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल…”

    ‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल. नाहीतरी ज्यांच्यासाठी ती  कमावली त्यांना कोणती माझी किंमत होती? पकडला गेल्यावर साधी सहानुभूती सुद्धा त्यांनी मला दाखवली नव्हती.

    ‌पाठकच्या रूपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता. पण तो अगोदर का भेटला नाही, याची खंत मला वाटून गेली.

    समाप्त

    (ही कथा माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026 ललित

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026 ललित

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पसारा आवरेना आठवणींचा!

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 24, 2026

    “चला उद्या रविवार छान आरामात उठणार आणि निवांत आवरणार… रोजची गडबड असतेच उद्याची सुटी मात्र…

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!

    April 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026

    April 24, 2026

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 277
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 577
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026
    Most Popular

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.