Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने
    ललित

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJuly 12, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, लेखक श्री ना पेंडसे, कादंबरी रथचक्र, रथचक्र कादंबरी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, तिची कहाणी, तिचा संघर्ष, तिचे प्रवाहाविरुद्ध जाणे, तिच्यातील दुर्गुण, तिच्या नवऱ्याचा नाकर्तेपणा, मौनीबाबाचा संन्यास, खलनायक मौनीबाबा, तिचा पती मौनीबाबा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, यशोदा वगैरे गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्या असल्याने त्यांची प्रादेशिक कादंबरीकार अशी ओळख आहे. रथचक्र ही कादंबरी सुद्धा लोकप्रिय झाली. यावर आधारित टीव्हीवर मालिकाही आली होती.

    कादंबरी वाचायला घेतल्यावर मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. निळ्या रंगांच्या छटात जमिनीत अर्ध्याहून अधिक रुतलेले रथाचे चाक दाखवले आहे. रुतलेल्या रथचक्राशी संबंधित दोन कथा आठवतात – एक रामायणातल्या कैकयीची आणि दुसरी कर्णाची. यापैकी एकाचे हे चाक आहे का? की संसाराच्या रथाचे चक्र आहे? संसाराचा रथ दोन चाकांचा असतो – एक पतीचे आणि दुसरे पत्नीचे… की हे कालचक्र आहे? ‘चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च।’ ही उक्ती सार्थ करणारे कालचक्र? लेखकाने यापैकी कुठले चक्र कथनासाठी निवडले आहे, याची उत्सुकता मनात दाटून आली.

    कादंबरीच्या कथनात एकाही पात्राला नाव नाही. नायिकेचा उल्लेख ‘ती’ असाच होत राहतो. तिचे नाव लक्षुमबाई असा उल्लेख एकदाच मिळतो, जो सहज नजरेतून सुटू शकतो. ती, थोरली, मधली, धाकटी, लखनौवाला, काका, थोरला मुलगा असेच उल्लेख येत राहतात. कोकणातल्या एका लहानशा खेडेगावात असलेल्या पाच भावांच्या एकत्र कुटुंबाची ही कथा आहे. ‘ती’ ही मुख्य नायिका आणि तिचा पती मौनीबाबा. ही अत्यंत परस्परविरोधी पात्रे आहेत. पती संसाराचा मोह सोडून परमेश्वर प्राप्तीसाठी संन्यस्त वृत्तीने राहणारा, तरी पत्नी आणि मुले असलेला. ती शिक्षणाचे मोल जाणणारी बुद्धिवादी पुरोगामी विचारांची स्त्री. निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊ पाहणारा आणि तरीही जाऊ न शकणारा तिचा पती तिला दांभिक वाटतो. संसाराच्या जबाबदाऱ्या झटकून टाकणारा ढोंगी वाटतो.

    मौनीबाबा चार मुले झाल्यावर घर सोडून निघून जातो आणि मुलांची जबाबदारी तिच्यावर येते. कोकणातल्या त्या काळातल्या कर्मठ घरात सांसारिक मोहमाया नसलेल्या पतीचे कौतुक असते, आदर असतो, जो तिच्यासाठी अनाकलनीय असतो. पूर्ण कादंबरीवर मौनीबाबाचा अंतःप्रवाह आहे. ती सोडून सर्वांना तो वंदनीय आहे. त्याच्या येण्याची चातकासारखी वाट पहिली जाते. तिच्यासाठी मात्र त्याचे पुन्हा तिच्या आयुष्यात येणे अत्यंत भीतीदायक आहे.

    स्त्रियांचे स्वयंपाकघरातले राजकारण एकत्र कुटुंबाचा अपरिहार्य भाग असते. घरातली मोठी स्त्री जिला लेखक ‘थोरली’ म्हणतात, तिच्या शब्दाला मान आहे. ती विचारी, संयमी आहे. ‘मधली’ आणि ‘धाकटी’ या दोघींचे नवरे कमावते असल्याने त्यांचा तोरा आहे. नायिकेला कुठलाही निर्णय घेण्याची परवानगी नाही. तिचा नवरा कमवत नाही, त्यामुळे घरात तिला आणि मुलांना अपमानास्पद वागणूक मिळते. पण ती हार मानत नाही. शिक्षणाची कास धरते… काबाडकष्ट करते, पण तिला श्रेय मिळत नाहीच, उलट प्रखर निंदा सहन करावी लागते. तिची सगळे जण अवहेलना करतात. तिच्यामुळे मुलगा शिकतो तरी, त्याचे श्रेय पतीच्या पुण्याईला जाते, हे पाहून ती विषण्ण होते.

    हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!

    कथा वाचताना कमी शब्दांत संवाद लिहिण्याची लेखकाची शैली प्रभाव टाकते. कथेत येणारे कितीतरी शब्द प्रादेशिक असल्यामुळे सर्वांना कळतीलच असं नाही. संदर्भाने अर्थ लागतो. कथेला प्रचंड वेग आहे. घटना भराभर घडत जातात. समस्या आणि समाधान येत राहते. मौनीबाबा म्हटला तर खलनायक आहे, पण तसा नाहीही. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो; पण तिच्यासाठी तो खलनायकच आहे. ती बंडखोर स्त्री आहे. स्वतंत्र विचारांची, उच्च मनोबल, आत्मविश्वास असलेली, ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणारी, मेहनती बुद्धिमान स्त्री आहे. पण तिच्यात दुर्गुण सुद्धा आहेत. लेखकाने तिचे महिमामंडन केलेले नाही. तिला तिच्या दुर्गुणांची जाणीव आहे.

    कुटुंबाची कथा वाचताना एक गोष्ट जाणवते, खटकते – नात्यांतला व्यवहारीपणा आणि कोरडेपणा. धर्म, अर्थ आणि काम या तिघांभोवती विणलेली कथा आहे. ती वास्तविक आहे. यात कुठलाही भाग अवास्तव, अविश्वसनीय, अतिरंजित वाटत नाही. मनुष्य स्वभावाचे नमुने, कंगोरे पटतात… अशी माणसे आपण आसपास पाहतो.

    नायिका सून, पत्नी, जाऊ, आई आहे; पण एकाही नात्यात ती यशस्वी होत नाही. तिच्या नशिबाचे भोग, असे सोयीस्कर उत्तर देता येईल… पण त्यापेक्षा प्रवाहाच्या विरुद्ध चालायचे ठरवले की, प्रतिकार होणारच, प्रवाहाशी लढावे लागणारच! त्यावेळी नाकातोंडात पाणी जाणारच, कधी जीव गुदमरेल, कधी जीव गमवावा लागेल. हे उत्तर अधिक पटते. ती काळाच्या पुढची आहे.

    हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

    अवघी दोनशे पानांची कादंबरी आहे आणि उत्सुकता ताणून धरणारे कथानक आहे. वाचताना आपण गुंतत जातो, पण कुठेच न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. चूक, बरोबरचा न्यायनिवाडा करू शकत नाही; कारण प्रत्येक पात्राच्या वागण्यापाठी स्वतःचे कारण आहे. ही कादंबरी वाचून झाल्यावर एक प्रसिद्ध उक्ती आठवते – जेव्हा समस्येचे दोनच पर्याय असतील, तेव्हा तिसरा पर्याय शोधावा! थोडक्यात तिसरा पर्याय असतो, पण जो दिसत नाही.

    हे रथचक्र कुठले? दशरथ आणि कैकयीचे वाटत नाही. ‘तिने’ संसाराचे रुतलेले चक्र बाहेर काढायचा प्रयत्न केल्यावर तिला साधे श्रेय मिळत नाही, वर कुठून मिळणार? कर्णाचे आणि श्रीकृष्णाचे म्हणावे तर ‘ती’ सांसारिक युद्ध एकटी लढते आहे, सर्व कुटुंबीय ‘शल्य’ आहेत, पण तिने कुठलाही अपराध केलेला नाही. तिने धर्माची कास सोडलेली नाही. हे कालचक्र नाही कारण ते निरंतर फिरत असते, ते कधीही थांबत नाही, रुतून बसू शकत नाही. हे संसार रथाचे चक्र असावे. रथाचे एक चक्र (पती) निरुपयोगी आहे, रथ जमिनीवर ठेवायला सुद्धा उपयोग नसलेले आहे आणि दुसरे चक्र तिचे… ती आटोकाट प्रयत्न करून रथ ओढते आहे, जमिनीवर ठेवते आहे, पण तरीही ते धसत जाते आहे. शेवटी ते पूर्णतः रुतून बसेल की बाहेर निघेल? दुसरे चक्र कार्यक्षम होईल का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कादंबरी वाचावी लागेल.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026 ललित

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026 ललित

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    By विशाल कुलकर्णीJuly 12, 2026

    “…तर बरंका महाराजा, हा असा दरबार भरलेला आहे. बादशहाचे सरदार, दरकदार असे हात जोडून, आदराने,…

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मित्र कसा असावा तर…

    July 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 775
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.