Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेJuly 12, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात मनासारख्या गोष्टी घडतील. राशीस्वामी मंगळ वृषभ राशीत आहे, अधिकारात वाढ होईल. नोकरदारांनी अमावस्येदरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी गटबाजी आणि राजकारण असेल तर, त्यापासून लांब राहावे. व्यावसायिक वर्गाला एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. अडकलेली कामे पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील, मात्र कायद्याने पुढे जा. पैसे देऊन काम करण्याचा प्रयत्न करू नका. घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांचे वर्चस्व राहील. विद्यार्थ्यांनी सामंजस्याने आपले प्रश्न सोडवावेत, कोणाची अडवणूक करू नका.

    वृषभ

    • या आठवड्यात वाहनसुख मिळेल. मंगळ तुमच्या राशीत विराजमान आहे. कामाच्या ठिकाणी नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेल. तुमच्या हुशारीचे कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. व्यवसायासाठी वाहन खरेदी करू शकाल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या कलेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत यश मिळू शकेल. बोलण्याने तुम्ही दुसऱ्यांना जिंकू शकाल.

    मिथुन

    • या आठवड्यात राशीस्वामी स्वतःच्या राशीत आहे. चांगले ग्रहमान आहे. नोकरदारांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. स्वतःला सिद्ध करून स्वतःची जागा पक्की करू शकाल. मेहनतीने आणि बोलण्याच्या कौशल्याने व्यावसायिक वर्ग नवीन कामे मिळवू शकेल. व्यापारात वाढ होईल. बुध आणि रवी एकत्र असल्याने महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; अडकलेली कामे पूर्ण करा. विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.

    कर्क

    • या आठवड्यात अमावस्या कर्क राशीत आहे. तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत, याकडे लक्ष असू द्या. काम वेळेत पूर्ण करा. स्वतःचे काम बाजूला ठेवून इतरांना मदत करू नका. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांपासून सावध रहावे. व्यवसायातील कागदपत्रे आणि सिक्रेट जपून ठेवावीत. स्वतः लक्ष देऊन कामे करून घ्यावीत. महिलांच्या बाबतीत घरात छोट्या कारणांवरून अबोला राहील. व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करता येईल, आवडीच्या विषयात पुढे जाल.

    सिंह

    • या आठवड्यात राशीस्वामी रवी 17 तारखेला कर्क राशीत येत आहे. नोकरदारांना परदेशी जाण्यासाठी संधी मिळेल. संधीचा फायदा घ्या. वेळेचे बंधन पाळा. कामावर फोकस ठेवा. व्यावसायिक वर्गाचे नवीन करार होतील. जुनी येणी वसूल होतील. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांना मैत्रिणींबरोबर खरेदीचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना मित्रांबरोबर पावसाळी सहलीला जाता येईल.

    हेही वाचा – सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    कन्या

    • या आठवड्यात 17 तारखेला रवी लाभस्थानात येत आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. नोकरदारांना इन्सेन्टिव्ह मिळण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास होतील. घरात नवीन वस्तू घेऊ शकाल. व्यावसायिक वर्गाने आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पॅम्प्लेट वाटून प्रसिद्धी मिळवावी. महिलांच्या बाबतीत देवदर्शनाला जाण्याचा योग आहे, मनाप्रमाणे खरेदी करता येईल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

    तुळ

    • या आठवड्यात राशीस्वामी शुक्र सिंह राशीत लाभस्थानात आहे. समाधानकारक आठवडा जाईल. नोकरदारांनी पैशाचे आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित करावे. अचानक चांगली संधी उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाने भागीदार तसेच सहकाऱ्यांशी सौजन्याने वागावे. त्यांचे म्हणणे आधी ऐकून घ्या, नंतर विचार करून निर्णय घ्या. महिलांना महत्त्वाची कामे करण्याची संधी मिळेल, स्वतःला सिद्ध करा. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा योग आहे, आनंदी राहाल.

    वृश्चिक

    • राशीस्वामी मंगळ सप्तमात वृषभ राशीत आहे. अशा स्थितीत सांभाळून बोला. नोकरदारांनी सहकारी तसेच हाताखालील वर्गाशी जेवढ्यापुरते तेवढेच संबंध ठेवा. कामाचा थोडा ताण जाणवेल. व्यावसायिक वर्गाने भागीदाराशी सर्व प्रॉब्लेम शेअर करावेत आणि एकत्र मिळून त्यावर तोडगा काढावा. स्पर्धकांपासून सावध रहा. महिलांच्या बाबतीत घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. घाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. कायद्याचे पालन करा.

    धनु

    • राशीस्वामी गुरू कर्क राशीत म्हणजे अष्टमात आहे. महत्त्वाची कागदपत्रे आणि पाकीट सांभाळावे. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी सावध रहावे. तुमचा लॅपटॉपचा पासवर्ड कोणालाही सांगू नका किंवा बदलून घ्या. मेहनतीने केलेल्या कामाचा उल्लेख कोणाजवळ करू नका. महिलांनी प्रवासात पर्स, पैसे, छत्री आणि फोन सांभाळावा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर विश्वास ठेवावा आणि त्यांचे मार्गदर्शन उपयोगात आणावे, फायदा होईल.

    मकर

    • या आठवड्यात राशीस्वामी शनी तृतीय स्थानी मीन राशीत आहे. नोकरदारांना कामाचा खूप ताण राहील. तब्येतीची काळजी घ्या. पाणी भरपूर प्या आणि योगाभ्यास करावा. वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला एका कामासाठी उगाच जास्त वेळ घालवावा लागेल. परिणामी चिडचिड होण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण होतील, पण मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. महिलांच्या मदतनीस बायका अचानक दांडी मारतील, त्यामुळे जास्त काम करावे लागेल. विद्यार्थ्यांना मित्रांबरोबर ट्रेकला जाण्याची संधी मिळेल, जपून पावसाचा आनंद घ्या.

    कुंभ

    • राशीस्वामी शनी द्वितीय स्थानात आहे. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. नोकरदारांना घरात बसून काम करण्याची संधी मिळेल. पण कामाचा वेग कमी राहील आणि चिडचिड होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाची खूप दिवसांपासून अडकलेली कोर्ट तसेच सरकारी कामे मार्गी लागतील. तुम्हाला कर्ज मिळेल आणि पुढील कामाला वेग येईल. महिलांच्या बाबतीत घरात पाहुणे येतील, त्यामुळे घरात उत्साही वातावरण राहील. विद्यार्थ्यांना छोट्या नोकरीच्या संधी मिळतील.

    हेही वाचा – मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    मीन

    • या आठवड्यात राशीस्वामी गुरू, पंचम स्थानात कर्क राशीत आहे. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. पण, वरिष्ठ आणि सहकारी सहकार्य करतील. काही गोष्टींमध्ये स्वतःलाच लक्ष द्यावे लागेल. व्यावसायिक वर्गाला खूप धावपळ करावी लागू शकते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. महिलांसाठी घरात कामाचा ताण जास्त असेल. अशा वेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि शांत रहा. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. मित्रांना स्वतःचे वाहन देऊ नका.

    prajaktakathe3970@gmail.com


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जुलै 2026

    July 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 12, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जुलै 2026

    July 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जुलै 2026

    July 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 775
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.