Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रवचनकार बुवा अन् गोदी…
    ललित

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीJuly 12, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, विशाल कुलकर्णी, प्रवचनकार बुवा, कीर्तनकरा बुवा, दामाजीपंतांची कथा, बुवांना चिंता नातीची, बुवांना चिंता नात गोदीची, बुवांना हार्ट अटॅक, गोदीचा शालेय गणवेश, गोदीची शालेय फी, बुवांची गरीबी, अनाथ गोदीची कथा, बुवांचे मित्र परबत आबा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “…तर बरंका महाराजा, हा असा दरबार भरलेला आहे. बादशहाचे सरदार, दरकदार असे हात जोडून, आदराने, खालमानेने आपापल्या जागी उभे आहेत. बादशहाचाच दरबार तो! संपन्नता कशी मान तुकवून उभी आहे. सर्वत्र रेशमी किनखापं लावलेली. गाद्या-गिरद्या, लोड, तक्के अंथरलेले आहेत. एका ऊंच कट्टयावर हिरेजडीत, सुवर्णमंडित सिंहासनावर दस्तुरखुद्द बादशाह महम्मदशहा बिराजमान झालेले आहे. चाकर चवऱ्या ढाळताहेत. समोर एक सेवक खाली मान घालून उभा आहे. बादशहा अतिशय संतप्त झालेले आहेत…

    “दामाजीपंत की ये जुर्रत? उसकी बहादूरी देखकर हमने उन्हें खजांची क्या बनाया, वह अपने आप को इस दौलत के मालिक समझने लगे? हमारा खजाना भिखमंगो, लुच्चो लफंगों में बटवा दिया? सिपहसालार, जाओ दामाजी को बेड़ियां डालकर हमारे सामने पेश करो. हम खुद उसे उसकी औकात बतायेंगे!”

    आणि बादशहाचा सेनापती रवाना झालेला आहे मंगळवेढ्याकड़े दामाजीपंताना कैद करायला…
    बोला, पुंडलिक वरदे हssरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम…”

    नेहमीप्रमाणे बुवांचे प्रवचन आजही जमून आले होते. त्यात सध्या भागवत सप्ताह सुरू असल्याने गर्दीही भरपूर जमे. पुढच्या थाळीतही बऱ्यापैकी दक्षिणा जमा होत असे. त्यात बुवा प्रवचनात अगदी एकजीव होऊन जात. विशेषतः, दामाजीपंतांची कथा सांगताना त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागायची. पण आज बुवांचा रंग काही जमत नव्हता. ऐकणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते. कारण, त्यांच्या डोळ्यांसमोर दामाजीपंत उभे राहिलेले होते. पण दस्तुरखुद्द बुवा मात्र आजच्या प्रवचनात मानसिकदृष्ट्या पूर्णतः एकजीव होऊ शकत नव्हते. डोळ्यांसमोर सारखी सारखी छोटी गोदावरी उभी राहात होती…

    हेही वाचा – सावळ्याची सावली!

    “आजोबा, माझा गणवेश खूप फाटलाय हो! रफू करून करून त्याचा मूळ कपडाच दिसेनासा होइल आता. वर्गातली मुले हसतात हो, माझे फाटके कपडे बघून. आज आई-बाबा असते तर…?”

    बुवांचा मुलगा-सून एका एसटी अपघातात ही एकुलती एक पोर बुवांच्या पदरात टाकून देवाघरी गेलेले. आता बुवाच गोदावरीचे सर्वकाही. पण त्यांचंही वय झालेलं. बिचारे प्रवचने करून त्यातून मिळालेल्या पैश्यांतून गोदावरीला वाढवत होते. आजच्या दक्षिणेतून गोदीचा गणवेश घ्यायलाच हवा. उद्याच दुकानात घेऊन जातो पोरीला… हरखून जाईल लेकरू. चष्मा काय अजून काही दिवस दोरी बांधून अडकवता येईल कानाला. बुवांनी मनाशी पक्कं केलं आणि पुन्हा गजर केला…

    “जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी…”

    “बादशहाचे सैनिक दामाजीपंतांना पकडायला त्यांच्या घरी पोहोचले आहेत, महाराजा. घरात हाहाकार उडालेला आहे. घरासमोर ही गर्दी जमलेली. पंत पूजेला बसले आहेत. तो यवनी फौजदार पंतांना अटक करायला पुढे सरसावलाय आणि महाराजा…
    जणू वीज चमकावी तशी पंतांची कारभारीण यवनाच्या समोर उभी ठाकलेली आहे. जोपर्यंत त्यांची पूजा होणार नाही, तोवर मी तुला त्यांना अटक करू देणार नाही. त्या दुर्गेच्या तेजापुढे यवनानेही नांगी टाकली महाराजा. तो वरमलेला आहे. बोला संत श्री दामाजीपंत महाराज की जय… पुंडलिक वरदे…”

    “बाई, सध्या आजोबांकडे पैसे नाहीयेत. पण ते लवकरात लवकर पैसे जमवून नवा गणवेश घेऊ म्हणालेत. तोवर मला वर्गात बसू द्या ना, प्लीज…” छोटी गोदी हात जोडून विनवत होती…

    बाईंनी तिच्या खांद्यावर हलकेच थोपटले…

    “हे बघ गोदे, मी काही लगेच तुला वर्गाच्या बाहेर काढत नाहीये. इतके दिवस तुला सांभाळून घेतलंच ना आम्ही सगळ्यांनी. पण हे असं किती दिवस चालणार बाळा? बरं, प्रश्न फक्त गणवेशाचा नाहीये. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेची फी भरलेली नाहीयेस तू. अगदी तुझी शालेय फी जरी माफ केली असली तरी, बाकीच्या गोष्टी आहेतच ना? मी मागेच बुवांना म्हणाले होते की, तुला एखाद्या सरकारी शाळेत घाला. पण तेही हट्ट सोडायला तयार नाहीयेत. प्रत्येक वेळी बुवांकडे पाहून सगळे गप्प आहेत. पण कुठेतरी सगळ्यांनाच मर्यादा येतात गं गोदे… शेवटी आम्हीही पगारी नोकरच!”

    “बाई, मी सांगते तुमचा निरोप आजोबांना आणि नसेलच जमत तर, मीच हट्ट करते, मला एखाद्या सरकारी शाळेत घाला म्हणून!”

    गोदी रडवेली झालेली बघून बाईंनी तिला जवळ घेतले.

    “एकदा व्यवस्थापकांशी बोलायलाच हवे. गोदीसाठी एखादी शिष्यवृत्ती किंवा कुणा दानशूर व्यक्तीची मदत मिळते का ते पाहण्यासाठी… एवढ्या हुशार विद्यार्थिनीचे नुकसान व्हायला नको.” बाईंनी मनाशीच एक निर्णय घेतला.

    “विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…
    विठोबा रुख्माई, विठोब्बा रुख्माई, ज्ञानबा तुकाराम!”

    प्रवचन रंगात आलेलं होतं. बुवासुद्धा काही काळापुरते आता गोदीला विसरले होते.

    “काय सांगू महाराजा. काय ते तेज… काय ते सावळे सुंदर रूप… अंगात एक फाटकी बंडी, कंबरेला गुडघ्यापर्यंत येणारे फाटके धोतर… खांद्यावर कांबळ, हातात काठी, पायात चामड्याच्या वहाणा आणि कपाळावर गोपी चंदनाचा टीळा… एवढा श्रीमंत बादशहा, पण तो सुद्धा त्या रूपाने मंत्रमुग्ध झालाय बघा!

    “जी हुजूर, म्या इठू चांभार. दामाजीपंतांचा चाकर हाय म्या. ज्ये धान त्यांनी लोकास्नी वाटलं त्याची किंमत चुकवाया आलोय. तेवडी तुमची रोकड घ्या, आन मस्नी पावती द्या बरं रोकड़ पोच झाल्याची…”

    बोला ज्ञानेश्वर महाराज की जय…

    बुवांचे लक्ष समोरच्या ताटावर होते. लोकांनी टाकलेली दक्षिणा, तिने ताट गच्च भरलेलं. बुवांचे मनही समाधानाने भरलेले. आज गोदीचा ड्रेस येणार. लेकरू खूश होणार…

    “चमत्कार झालेला आहे महाराजा… महम्मदशहा वेडावून गेलाय. विठू चांभाराच्या कंबरेचा तो एवढासा कसा. पण त्यातून मोहरांचा जणू पाऊस पडतोय. ढिग लागलेयत मोहरांचे. जेवढ्या किमतीचे धान्य होते, त्याच्या शंभरपट रक्कम समोर पडलीय. बादशहाने पावती दिली. ती घेऊन बादशहाचा चाकर दामाजीपंतांना आणणाऱ्या सेनापतीकडे पोचलाय.

    सगळी घटना ऐकल्यावर दामाजीनी विचारले…

    ‘कोण आलं होतं म्हणालात रोकड घेऊन?’

    ‘कोणीतरी काळाकुट्ट माणूस होता, इठू चांभार म्हणून… एवढासा कसा त्याचा, पण त्यातून पैशांचा पाऊस पाडला त्याने…’

    दामाजीपंतांच्या डोळ्यातून कृतज्ञतेने, भक्तीने भरलेल्या आसवांच्या धारा लागलेल्या आहेत महाराजा. पंत तसेच दिसेल त्या मंदिरात शिरले. समोर तो काळ्या हासत उभाय…

    माऊली… म्हणत पंतांनी त्या मूर्तीच्या पायाशी स्वतःला झोकून दिलेलं आहे…

    बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय…”

    बुवा रंगात आले होते. गोदीचा, कदाचित सगळ्याच विवंचनाचा त्यांना त्या क्षणापुरता का होईना विसर पडलेला होता. आता ते नेहमीचे बुवा होते. मागच्या गाभाऱ्यातला पांडुरंग जणू त्यांना समोर जमलेल्या जनमानसात दिसत होता. त्यांनी उजव्या हातातली वीणा उंचावली आणि बेभान होऊन जागच्या जागी गिरक्या घ्यायला सुरुवात केली. मुखाने अविरत विठूनामाचा गजर चालू होता. समोर बसलेला श्रोतृसमुदायही त्या मनस्वी नामस्मरणात तल्लीन होऊन गेला. साऱ्या आसमंतात फक्त विठू, विठू आणि विठूच सामावला होता जणू! सभामंडपाच्या भिंतीही जणूकाही पांडुरंग, पांडुरंग असा गजर करत होत्या. भाविकातले काही जण उठून बुवांबरोबर नाचायला लागले. टाळ-चिपळ्यांच्या गजरात दाही दिशा विठूमय होऊन गेल्या होत्या. सगळीकडे तोच भरून राहिला होता… आणि तितक्यात कोणीतरी ओरडले…

    “सांभाळा, बुवांना धरा. बुवा पडले.”

    तसा एक घोळका बुवांकडे धावला. बुवा आपली छाती दाबत खाली कोसळले. तोंड वेडेवाकडे झाले होते. वेदनेने साकळलेल्या चेहऱ्यावर तरीही एक अस्फुट हासू होते बुवांच्या…

    “बुवांना अटॅक आलाय भौतेक. डाक्टरला बोलवा कोनीतरी…”

    हेही वाचा – विठ्ठल दर्शनाची आस, वारी आणि मी

    “आरं डाक्टर नंतर, आदी गाडी आना. बुवांना दावखान्यात नेयाला पायजे…” कुणीतरी बुवांची छाती हाताने चोळत म्हणाले.

    “परबत आबा, आमची वेळ संपली. त्याचं बोलावणं आलं. तेवढं दक्षिणेचं ताट गोदीला द्या. तिला गणवेश घ्यायचाय. शाळेची फी भरायचीय. तेवढं सांभाळा माझ्या लेकराला. आम्ही जातो आमच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा…” बुवा निर्वाणीचे बोलत होते.

    बुवांचा एक हात अजूनही दक्षिणेच्या थाळीवरच होता. जणूकाही कुणी ती थाळी घेणार तर नाही, अशी भीती वाटत होती.

    “बुवा गोदीची काळजी करू नका. तिला म्या सांबाळंन. पर तुमी गप रावा बरं… आपून दावखान्यात जाऊ आदी…”

    परबत आबांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. त्यांचा दोस्त साथ सोडून चालला होता. पण बुवा खरोखरच गप्प झाले. कायमचेच…

    कुणीतरी म्हणालं,  “लै पुण्येवंत माणूस वते बुवा. देवाच्या दारात, देवाचं नाव घेताना मरान आलं. लैच पुण्येवंत!”

    परबत आबांच्या डोळ्यांसमोर राहून राहून गोदी येत होती. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि मंदिरात जमलेल्या भाविकांनी पुन्हा गजर चालू केला, बुवांना निरोप देण्यासाठी…

    जय जय रामकृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026 ललित

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026 ललित

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    By डॉ. अस्मिता हवालदारJuly 12, 2026

    श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, यशोदा वगैरे गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर…

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    July 11, 2026

    सिंगापूरमध्ये स्वादाचा आणि चवीचा शोध…

    July 11, 2026

    मित्र कसा असावा तर…

    July 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 12 ते 18 जुलै 2026

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 12 जुलै 2026

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 357
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 486
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 775
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.