Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…
    ललित

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करJuly 11, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, प्रदीप केळुसकर, कहाणी वर्दे सरांची, वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात, कोण होते वर्दे सर, वर्दे सरांचे विद्यार्थी, रसिकाला वर्दे सरांबद्दल कुतूहल, नर्स रसिकाची वर्दे आजोबांची काळजी, वर्दे सरांची प्रेमकहाणी, वर्दे सर साठेबाई प्रेमकहाणी, वर्दे सरांकडून आदिवासींचे शिक्षण, वर्दे सरांचे हेमलकसामध्ये शिक्षणकार्य,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    शहरातल्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर वर्दे आजोबा ॲडमिट होते. त्यांना कुणीच भेटायला येत नव्हते, म्हणून हॉस्पिटलमधील स्टाफला आश्चर्यच वाटत होते. रसिका नर्सला त्या 80 वर्षांच्या वर्दे आजोबांबद्दल आत्मीयता होती आणि कुतूहलही. रसिकाने एकदा त्यांच्या बेडखालील छोटी बँग उघडली. त्या बॅगेत आजोबांचे दोन-तीन कपडे आणि काही वर्तमानपत्रांतील कात्रणे होती. एका कात्रणात वर्दे आजोबांच्या सत्काराचा फोटो होता. तिने चटकन मोबाइल काढला आणि त्याचा फोटो घेतला आणि वर्दे आजोबांचाही. नंतर हे दोन्ही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट पाहिली होती आणि अनेकांनी मेसेज टाकले होते.

    वर्दे आजोबा हे पेशाने शिक्षक होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे माजी विद्यार्थी आणि माजी सहकाऱ्यांची हॉस्पिटलमध्ये झुंबड उडाली. वर्दे सरांचे सहकारी शिक्षक म्हणत होते, जवळजवळ चाळीस वर्षे सर बेपत्ता होते… 85 साली सरांना शेवटचे पाहिले होते, त्यानंतर सर आज दिसत आहेत…

    रात्री त्त्यांचे 80च्या बॅचचे विद्यार्थी आले. सर्वजण सरांच्या पायाकडे बसले. आता ते सर्व साठीच्या पुढे होते.

    “सर म्हणजे आमचे हीरो होते. नेहेमी सायकलवरून शाळेत यायचे, गणित अप्रतिम शिकवायचे, कबड्डी आणि खोखो खेळायचे. सरांची एक आठवण म्हणजे एकदा केमिस्ट्री लॅबला आग लागलेली, आत नववीची मुले होती… सर दहावीचा वर्ग घेत होते. सरांना कळताच ते त्या आगीत घुसले आणि आपल्या जिवाची काळजी न करता त्यानी एकेका मुलाला सुखरूप बाहेर काढले…”

    “हो हो… माझ्या पण ते लक्षात आहे. तेव्हा मी आठवीत होतो. सर्व मुलांना आणि साठेबाईंना पण… त्यावेळी त्या मुलांचं प्रॅक्टिकल घेत होत्या.” एक माजी विद्यार्थी म्हणाला.

    “साठेबाई?”

    त्यावेळी त्या लॅबमध्ये अडकलेल्या मुला-मुलीतील गुलाब पण तिथे होती.

    “मी वाचले त्या दिवशी… याचे श्रेय वर्दे सरांबरोबर साठेबाईंना पण होतं… आग सर्वत्र पसरली होती. वर्दे सरांनी बऱ्याच मुलांना बाहेर काढलं होत. पण मी आणि साठेबाई शेवटी होतो… आणि वर्दे सरांना आमच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं.. त्यावेळी साठेबाईंनी मला पोटाशी धरत खिडकीतून बाहेर उडी घेतली होती.”

    अनेकांना साठेबाईंची पण आठवण आली. दोन वर्षांनी साठेबाईंचे लग्न झाले आणि त्या इंदूरला गेल्या.

    वर्दे सरांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या आठवणी काढत होते. पण सर कुणाशी बोलत नव्हते किंवा ओळखत नव्हते.

    आता रोज संध्याकाळी वर्दे सरांसाठी फुले, पुष्पगुच्छ येत होती… त्या वार्डमधील इतर कुणाही पेशन्टला कधीही आली नसतील एवढी! रसिका ते पहात होती आणि आनंदित होत होती.

    रोज संध्याकाळी इतकी माणसे येत होती म्हणून किंवा वर्दे सराबंद्दल चर्चा सुरू होती म्हणून किंवा हॉस्पिटलमधील उपचारामुळे असेल… पण वर्दे सर थोडे थोडे विद्यार्थ्यांना ओळखू लागले होते. ओळखीचे वाटले तर हात वर करत होते, ओठावर हसू आणत होते. एक दिवस हॉस्पिटलबाहेर एक गाडी थांबली. त्यातून एक वृद्ध आणि एक तरुण स्त्री खाली उतरली. त्या दोघी वर्दे सर ॲडमिट होते, त्या वॉर्डमध्ये आल्या. त्या दोघी विचारत विचारत वर्दे सरांच्या बेडपाशी आल्या. त्या वृद्ध स्त्रीने गुलाबांची फुले आणली होती. तिने फुले बेडशेजारील टेबलावर ठेवली आणि ती वाकून सरांच्या चेहेऱ्याकडे पाहू लागली…

    “ओळखले का सर मला?”

    इतर सारेजण सरांच्या चेहेऱ्याकडे पहात होते… सर थोडे हसले असे सर्वाना वाटले…

    “नाही ओळखले? मी पण आता म्हातारी झाले. मी निर्मला साठे नाही का! मी होते शाळेत शिक्षिका तुमच्या वेळेस. मग माझे लग्न झाले आणि मी इंदूरला गेले… गेली पंचवीस वर्षे इंदूरला होते. माझ्या नवऱ्याच्या मृत्यनंतर या माझ्या मुलीकडे आले. माझ्या मुलीचे आणि जावयाचे हॉस्पिटल आहे या भागात.”

    हेही वाचा – वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात का होते?

    तिथे बाजूला उभी असलेले सर्व वर्दे सरांचे तसेच साठेबाईंचेही विद्यार्थी होते.

    ‘साठेबाई तुम्ही? आम्ही सर्व तुमचेच विद्यार्थी… आता ज्येष्ठ नागरिक झालोय! किती वर्षांनी?”

    ‘होय का? मला आता आठवत नाही… पण एक गुलाब आठवते…”

    गुलाब चटकन पुढे झाली… साठेबाईंना कडकडून भेटली.

    “बाई तुम्ही? तुम्हाला मी कशी विसरेन. तुम्ही त्या आगीतून मला वाचवलेत.. नाहीतर माझा कोळसा झाला असता.”

    ‘होय… ते मला पक्कं आठवतंय… पण या वर्देंनी किती मुलांना वाचवलं… माझ्या आठवणीप्रमाणे पंचवीस मुलांना! आता वर्दे या बेडवर आहेत…”

    “पण बाई तुमचे लग्न झाले आणि त्यानंतर दोन महिन्यांत वर्दे सर शाळा आणि नोकरी सोडून गेले… आज कित्येक वर्षांनंतर सर आणि आता तुम्ही भेटलात!”

    “यासाठी चाळीस वर्षं मागे जावे लागेल. माझ्या मुलीसमोरच मी हे सांगते… माझे आणि वर्दे सरांचे एकमेकांवर प्रेम होते…”

    “काय?” सारे ओरडले.

    “प्रयोगशाळेत आग लागली आणि दुसऱ्या वर्गावर असलेल्या वर्देंनी आपला जीव धोक्यात घालून मुलांना वाचवले. या प्रसंगामुळे मला ते आवडू लागले. मी त्यांना चिठ्ठी लिहिली… प्रेमाची… प्रेमपत्र… सरांनी पण मला चिठ्ठी लिहिली. त्यांना पण मी आवडत होते. एका वर्षानंतर लग्न करायचे आणि त्यानंतर ही नोकरी सोडून कुठल्यातरी आदिवासी भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे वर्देसर हेमलकासा भाग पण पाहून आले होते… त्या भागातील आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे त्त्यांचे म्हणणे होते, पण..”

    “पण काय बाई?”

    “माझ्या आई-वडिलांना ही बातमी समजली. त्यांनी मला कोंडून ठेवले आणि एकदिवस गुपचूप इंदूरला नेऊन माझे लग्न करून दिले.”

    “अरेरे…”

    “शेवटी माझे जबरदस्तीने का होईना लग्न झालेच. माझ्या अंदाजाने त्यामुळेच व्यथित होऊन सरांनी राजीनामा दिला असणार आणि बहुतेक ते इतकी वर्षे त्याच आदिवासी भागात मुलांना शिक्षण देत असणार. त्यामुळे त्त्यांचा संसार नाही… कुणी आप्तेष्ट नाही…”

    “पण त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले कुणी?”

    “मी केले…” तेथे असलेला एक माणूस म्हणाला.

    “बाई म्हणाल्या ते खरे आहे… हे सर हेमलकसा भागात शिक्षणाचे कार्य करत होते. त्या भागातील मी.. त्यांचा विद्यार्थी. मी या गावात पोलीस आहे. सरांची तब्येत ढासळू लागली, तेव्हा मी त्यांना माझ्या घरी आणले. माझी बायको पण त्यांचीच विदयार्थिनी! आमच्यावर आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी प्रेम केलं. त्यांना श्वास लागायचा… रात्र रात्र खोकला यायचा… मी गावी गेलो, तेव्हा त्यांची ही अवस्था पाहिली आणि त्यांना माझ्यासोबत आणून या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.”

    साठेबाई पुढे झाल्या आणि त्यांनी त्या पोलिसांची पाठ थोपटली…

    “फार चांगले काम केलेत तुम्ही पोलीसदादा… तुमच्यामुळे हे वर्दे मला आणि या त्यांच्या विद्यार्थ्यांना दिसले, भेटले… अर्थात, या हॉस्पिटलमधील नर्स रसिका हिचेही कौतुक… आणि तिचेही आभार मानायला हवेत. तिने सोशल मीडियावर सरांचा फोटो आणि वर्तमानपत्रातील कात्रणे टाकली, त्यामुळे हेच वर्देसर हे लक्षात आले.”

    “होय होय, खरे आहे… या हॉस्पिटलमधील नर्स रसिका हिचे मोठे श्रेय आहे.”

    कुणीतरी रसिकाला साठेबाईंसमोर आणले… बाईंनी तिला जवळ घेतले. त्या म्हणाल्या,

    “तुम्ही सर्व माझे आणि वर्दे सरांचे विद्यार्थी… मी तुम्हाला आताच सांगितले होते की, सरांना आणि मला लग्न करायचे होते… पण ते झाले नाही… झाले ते झाले… आता माझी एक इच्छा आहे, मी सरांचा डिस्चार्ज घेऊन माझ्या मुलीच्या घरी त्यांना नेत आहे. माझी मुलगी आणि जावई दोघेही फिजिशियन आहेत… त्यामुळे दोघेही त्यांची काळजी घेतील आणि सरांचे जे काय शेवटचे दिवस असतील, त्या काळात मी त्यांची सुश्रुषा करीन. अर्थात, तुम्ही सारे सरांना भेटायला येत चला. हे पोलीसदादा नेहेमी येतीलच. ही आपली रसिका पण येईलच…”

    हेही वाचा – एका शाळेचा अंत

    सर्वजण स्तिमीत झाले.. एक अंदाजे ऐशी वर्षांची स्त्री, आपले जुने प्रेम अजून मनात जपून ठेवते आणि या वयात आपल्या जुन्या प्रियकराची सुश्रूषा करू इच्छिते…

    सर्व लोकांची मान्यता होतीच. थोड्या वेळाने साठेबाईंच्या मुलीने वर्देसरांचा डिस्चार्ज घेतला आणि ॲम्ब्युलन्समधून त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये आणले.

    वर्दे सर पुढे सहा महिने जगले. या सहा महिन्यांत त्त्यांचे आणि साठेबाईंचे विद्यार्थी त्यांना भेटत राहिले. पोलीसदादा आपल्या पत्नीसोबत येत राहिला आणि दर रविवारी रसिका गुलाबांची फुले घेऊन येत होती. या सहा महिन्यांत साठेबाईंनी वर्देसरांना भरवले… त्यांचे तोंड धुतले… त्यांचे अंग स्वच्छ केले.

    हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस ज्या वर्दे सरांना कित्येक दिवस कुणीपण भेटायला येत नव्हते… त्याच वर्दे सरांच्या अंत्ययात्रेत पाचशेपेक्षा जास्त लोक सामील झाले होते… त्यात पोलीसदादा होते आणि रसिका पण अश्रू ढाळत होती.

    समाप्त
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    जेन झी

    August 15, 2026 ललित

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026 ललित

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जेन झी

    By प्रदीप केळुस्करAugust 15, 2026

    आईचा साठावा वाढदिवस म्हणून समीराने आठ दिवसांची रजा घेतली आणि पुढील आठ दिवस आईसोबत घालवायचे…

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.