Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बनाना डिलाइटची गोष्ट…
    फूड काॅर्नर

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    तृप्ती देवBy तृप्ती देवJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, बनाना डिलाइट रोटी, कच्च्या केळ्यांपासून पिकलेल्या केळ्यांपर्यंत, पिकलेली केळी, जास्त पिकलेल्या केळीची पोळी, पौष्टिक बनाना डिलाइट रोटी, केळ्याची पौष्टिक पोळी, सुग्रण गृहिणीची कल्पकता,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    झाडावरची नैसर्गिक कच्ची केळी जेव्हा अनैसर्गिक पद्धतीने पिकवून बाजारात येतात, तेव्हा गृहिणीच्या मनात एकच प्रश्न असतो… “ही केळी लवकर खराब तर होणार नाहीत ना?”

    घरी आणलेली ती टपोऱ्या रंगाची केळी रोज माझ्याकडे पाहत असतात आणि मी त्यांच्याकडे!

    “आज कोण खाणार?”

    “उद्या खाऊ…”

    “अजून आहेत की!”

    असा संवाद घरात सुरू असतो.

    हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    दोन-तीन दिवसांतच केळी आपला रंग बदलायला लागतात. आधीच घाईघाईत पिकवलेली असल्यामुळे घरी आल्यावर ती आणखी भराभर मऊ पडतात आणि मग घरातल्या प्रत्येकाचा एकच सूर…

    “मला नको केळं!”

    खरं सांगायचं तर, केळं आजकाल फारसं कुणाचं आवडतं फळ राहिलेलं नाही. मग अशा वेळी माझ्यातली गृहिणी जागी होते. फेकून द्यायचं मनाला पटत नाही… आणि ती केळीही जणू विनवणी करत असतात,

    “आम्हाला अजून एक संधी द्या!”

    बस्स! मग ती केळी सरळ किचनमध्ये प्रवेश करतात… मनात एखादी जुनाट, पण भन्नाट रेसिपी चमकून जाते आणि सुरू होतो… बनाना डिलाइट रोटीचा प्रवास!

    रवा, गूळ, खोबरं, काजू-बदाम, वेलची-जायफळ आणि ती थोडीशी नाराज झालेली केळी… सगळे एकत्र आलं की, तयार होतं एक गोड, मऊ, सुगंधी सारण. मग ते सारण कणकेच्या उबदार पोळीत भरलं जातं आणि तव्यावर तुपात भाजताना घरभर असा सुगंध दरवळतो की, ज्यांनी थोड्याच वेळापूर्वी केळं खायला नकार दिला होता, तेच आता विचारतात…

    “अगं, अजून एक रोटी मिळेल का?”

    आणि तेव्हा मनात एकच विचार येतो —

    स्वयंपाकघरात काहीच वाया जात नाही. थोडी कल्पकता, थोडं प्रेम आणि गृहिणीचा थोडासा हट्ट असेल तर, अगदी दुर्लक्षित केळंसुद्धा ‘बनाना डिलाइट’ बनून सगळ्यांच्या मनात गोड जागा करून जातं!

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    बनाना डिलाइट रोटी

    पोळीकरिता साहित्य

    • कणीक – एक कप
    • मीठ – चिमूटभर
    • हळद – चिमूटभर
    • पाणी – आवश्यकतेनुसार
    • तूप – पाव टीस्पून

    सारणासाठी साहित्य

    • पिकलेली केळी – 2
    • रवा – पाव कप
    • गूळ – अर्धा कप
    • खोबऱ्याचा किस – अर्धा कप
    • मिल्क पावडर – 2 टीस्पून
    • काजू-बदाम काप – 2 टेबलस्पून
    • वेलची पूड – अर्धा टीस्पून
    • जायफळ पूड – चिमूटभर
    • तूप – 1 ते 2 टीस्पून

    कृती

    1. प्रथम कणकेत मीठ, हळद आणि थोडंसं तूप घालून मऊसर कणीक भिजवून घ्यावी आणि झाकून ठेवावी.
    2. कढईत तूप गरम करून रवा हलका भाजून घ्यावा. त्यात मॅश केलेली केळी घालावीत.
    3. त्यानंतर गूळ, खोबऱ्याचा किस, मिल्क पावडर, काजू-बदाम, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण सतत हलवत घट्ट होईपर्यंत परतावे. नंतर सारण थंड होऊ द्यावे.
    4. भिजवलेल्या कणकेचे गोळे करून छोटी पुरी लाटावी. त्यात तयार सारण भरून हलक्या हाताने पोळी लाटावी.
    5. तवा गरम करून ही पोळी तुपावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी.
    6. बस्स! गरमागरम, मऊ, गोड आणि पौष्टिक बनाना डिलाइट रोटी तयार!

      विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

      IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

      या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    July 3, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    By Team AvaantarJuly 3, 2026

    नीलिमा विजय खडतकर खीरीसाठी साहित्य वरी तांदूळ – पाव कप दूध – 1 कप घट्ट…

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    दृष्टिकोन…

    July 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 354
    • अवांतर 193
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 482
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 232
    • मैत्रीण 24
    • ललित 767
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जुलै 2026

    July 9, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.