Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    November 24, 2026

    धामापूरच्या गजाली आणि पंचकन्या

    November 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया

    November 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, November 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?
    अवांतर

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरNovember 24, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, अभिजात मराठी, सुधीर करंदीकर, लेखक सुधीर करंदीकर, आनंदाची दिवाळी, मुक्या प्राण्यांच्या वेदना,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिवाळी सण धडाक्यात आणि खूप आनंदात साजरा केला जातोय. ऐन दिवाळीत म्हणजे, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे सकाळी मृत्युंजय मंदिराकडे फिरायला बाहेर पडलो. दिवाळीमुळे मैत्रिणी मनवा, मेघना यांची भेट होण्याची शक्यता फारच कमी होती.

    फिरण्याच्या रस्त्यावर मारुतीचे एक देऊळ आहे. मंदिराच्या दाराजवळच, बाहेर एक मोठा फळा लावलेला आहे. त्यावर नेहेमी सुविचार लिहिलेले असतात.  मला सुविचार वाचायला नेहेमीच आवडते. मी अगदी रोज फळ्यावरचा सुविचार वाचायला हमखास तिथे थांबतो. काही काही सुविचार, खरंच सुंदर असतात आणि हमखास ते मनात मुरतात आणि मग आपोआप आचरणात उतरतात, हा माझा अनुभव.  उदाहरणादाखल तिथे वाचण्यात आलेले काही सुविचार असे होते —

    #   जो नेहेमीच दुसऱ्याच्या सावलीत वावरतो, तो स्वतःची सावली कधीच निर्माण करू शकत नाही, स्वतःची सावली निर्माण करायला – आपल्याला उन्हात यावेच लागते.

    #   आपले सुख किंवा दुःख, सभोवतालच्या परिस्थितीपेक्षा, स्वतःच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते.

    #  विषय किती वाढवावा, कुठे थांबवावा, कुठे दुर्लक्ष करावे, हे ज्याला समजले, तो आयुष्यात कुठल्याही परिस्थितीशी सामना करू शकतो.

    त्या दिवशी फळ्यावर बघितलं तर पहिलं वाक्य चक्क इंग्रजीत होतं आणि खाली निरनिराळ्या अक्षरात उत्तरादाखल बरेच संदेश  लिहिलेले होते. सुविचार लिहिण्याच्या फळ्यावर हा प्रकार नवीनच होता. त्यामुळे उत्सुकतेने  मी वाचायला सुरवात केली —–

    #  Please Save us from loud noise and smoke.

    We cannot tolerate it.  Please help us!!

    खाली काही पक्षी, प्राणी यांची चित्रे होती.

    बहुदा या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी काल रात्री हे फळ्यावर हे लिहिले असावे. आणि सगळ्यांनाच वाचता यावे, म्हणून कदाचित, आपली व्यथा त्यांनी इंग्रजीत लिहिली असावी.

    वाचून खूप वाईट वाटले. रस्त्यावर कानठळ्या बसवणारे आणि धूर ओकणारे फटाके फुटत असतानाची दृश्य डोळ्यासमोरून जायला लागली – घाबरून उडणारे पक्षी दिसायला लागले – गांगरून पळणारी कुत्री, मांजरं, गायी दिसायला लागल्या. या मुक्या प्राण्यांचे काय हाल होत असतील, ही कल्पना पण करणं कठीण आहे. कुत्र्याच्या / गाढवाच्या शेपटाला फटाक्याची लड लावणारे महाभाग पण दिसायला लागले. मनात विचार आला, लोक हॉस्पिटलच्या समोर फटाके लावतात, आसपासच्या घरात आजारी माणसे असली, तरी घरासमोर फटाके लावतात. हे लोक पक्षी आणि प्राणी यांची काय तमा बाळगणार ! ज्या पक्ष्यांमुळे, प्राण्यांमुळे, जीवजंतूंमुळे आणि वृक्षांमुळे आपल्या सभोवतालची  सृष्टी संतुलित राहते आणि त्यामुळेच आपण जीवन आनंदात जगू शकतो, त्यांना आपल्याला मदतीची अशी याचना करावी लागते आहे, हे वाचून खूप वाईट वाटले.

    हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…

    मी पुढचे संदेश वाचायला लागलो —

    काही वाचकांनी त्या सकाळीच आपली  मते मांडली होती —

    #  Dear birds and animals – sorry to say that your request will remain on this board only. सणासुदीच्या दिवसात, कुणीही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आम्ही हा त्रास सहन करतो, तसा तुम्ही पण सहन करायला शिका. We have no choice and you too are sailing in the same boat.

    Your helpless friends – मेघना

    #  Dear birds and animals – sorry to learn your pains. मेघना यांनी जे लिहिले आहे, ते बरोबरच आहे. कुणाला सांगणे, म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी ओतणे’ असा प्रकार आहे. हेल्पलेस परिस्थितीतून जेव्हा आपल्याला जावे लागते, तेव्हा संतांचे वचन आठवून शांत रहावे, “जे जे होईलं  ते ते पाहावे (म्हणजे कानठळ्या सोसाव्या, धुराचा श्वास घ्यावा), पण चित्ती असू द्यावे समाधान”. आम्ही हेच करतो.

    Your friend – मनवा

    #  Dear birds and animals – आपकी तकलीफ पढकर बहुत दुख हुआ. यहा पर उपरसें आये  ऑर्डर भी माननेके  लिये पब्लिक तैयार नही है. आप और हम किस पेड की पत्ती है, आपकी कौन सुनेगा

    आपका मित्र – शर्मा

    #  Dear birds and animals – शर्मा म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. लोक कुणाचेही याबाबतीत ऐकायला तयार नाहीत हे खरेच आहे. लोकांचे म्हणणे असे आहे, सणवार कसे साजरे करावेत, फटाके उडवावे, का उडवू नयेत / कुठले उडवावे / केव्हा उडवावे / किती उडवावे / कुठे उडवावे, ढोल ताशे/ डीजे वाजवावे का –  किती वाजवावे / नाच गाणी कितीवेळ करावी  वगैरे वगैरे, यामध्ये कुणीही  पडू नये. त्यामुळे तुम्ही कुणावर अवलंबून राहू नका.  तुम्हाला कोणीही वाली नाही. Sorry.

    तुमची मैत्रीण  – सुनैना

    #  Dear birds and animals – मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. खरंतर तुमच्या मदतीकरता प्राणी मित्र, पक्षी मित्र, वृक्ष मित्र अशा खूप संस्था आहेत. पण कान बधिर करणाऱ्या आवाजांमुळे आणि विषारी धुरामुळे, त्यांचे सदस्यच परेशान आहेत, त्यामुळे अशावेळेस त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचेच वाटते. पण काहीतरी मार्ग तर काढायलाच पाहिजे. संध्यातरी मला  दोनच पर्याय दिसत आहेत 1) आलीया भोगासी असावे सादरं, चित्ती असू द्यावे समाधान. अशी मनाची तयारी करायला सुरुवात करा. यातून काहीतरी मार्ग हा असणारच. “शोधा म्हणजे सापडेल” अशी आमच्याकडे म्हण आहे. म्हणजे यात तथ्य हे  नक्की असणारच. तुम्ही शोधात राहा, मी पण शोधते.

    2) आपल्याला इथे नोकरी मिळू शकत नाही, हे समजल्यावर जसे बरेच जण परदेशात पलायन करतात,  तसेच इथून स्थलांतरित होण्याचे काहीतरी बघा. परदेशात जाता आले तर उत्तम, कारण तिथे प्राणी आणि पक्षी यांची कदर केली जाते. निसर्गाचा समतोल, पशू / पक्षी / कीटक यांच्यामुळेच साधतो, हे त्यांना समजते व त्याप्रमाणे ते वागतात. परदेशात जमत नसेल, तर लहान खेडेगावात पलायन करा. “दगडापेक्षा वीट मऊ” असे म्हणतात. Very very sorry.

    तुमची मैत्रीण – वसुंधरा

    हे सगळे वाचून, आपण सगळेच  किती हेल्पलेस आहोत, याची जाणीव झाली. पूर्वी  दिवाळीत फटाके उडायचे, पण ते आजच्या तुलनेत अगदी साधे असायचे.  थोडासा आवाज  / थोडासा धूर  / थोडासा रंगीबेरंगी प्रकाश,  हे सगळे डोळ्यांना आणि कानाला मजा देऊन जायचे. मजा यायची.

    जमाना बदलतोय, माणसे बदलतायत, फटाके बदलतायत. फटाक्यांची विक्री आता वर्षभर सुरु असते. काहीतरी कारण शोधायचं आणि फटाके फोडायचे, हेच सत्र सध्या सुरु आहे.

    आपण हेल्पलेस झालो, की नेहेमी  देवाकडे धाव घेतो. मी विचार केला, इथे तर देव अगदीच समोर आहे, म्हणजे त्याच्याकडे पोहोचायला, धाव घेण्याची पण जरूर नाही.

    मी आत मंदिरात गेलो, हात जोडले आणि देवाला म्हणालो –  माणसांनी असे वेडेवाकडे फटाके बनवणे, ते वर्षभर उडवणे, याची बिचाऱ्या पक्ष्यांना/ पशूंना शिक्षा मिळायला नको. त्यांच्याकरता काही तरी कर, ही  मनापासून तुला प्रार्थना आहे. वयस्कर मंडळी, आजारी मंडळी, लहान बालके, आणि फटाके उडवणाऱ्यांसकट सगळेजण, यांना पण ही शिक्षाच आहे. काहीतरी उपाययोजना कर आणि हे थांबव, कमी कर.

    हेही वाचा – एक मॉर्निंग वॉक असाही….

    प्रार्थना करून मी बाहेर पडलो. असं म्हणतात, की पशुपक्ष्यांना थर्ड सेन्स असतो. त्यांचे हितचिंतक कोण आहेत, वगैरे त्यांना कळतं. आपल्या  हितचिंतकाला ते धन्यवाद देण्याचा नेहेमीच प्रयत्न करतात.

    मी मंदिराच्या बाहेर पडलो. फुटपाथ वरची 2-3 कुत्री माझ्या पायापायाशी करायला लागली, नाजूक आवाजात भुंकायला लागली. बहुदा त्यांना मला थँक्स म्हणायचे असावे. मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघालो. थोडं पुढे मृत्युंजय मंदिर आहे. तिथे फुटपाथवर खूप कबुतरे असतात. आपण जवळ गेलो, की सगळी उडतात. आज मी तिथून चालत जातांना, एकही कबुतर उडून गेले नाही. त्यांना माझ्या पायाशी यायचे होते, असा भास झाला. एकतर माझ्या खांद्यावर बसले आणि उडून गेले. सगळ्यांनाच माझे आभार मानायचे असावेत. घरापर्यंत पोहोचलो. केव्हातरी दर्शन देणारा भारद्वाज पक्षी, चक्क गेटवर बसून धन्यवाद देण्याकरता माझी वाटच बघत असावा. मला बघताच तो उडून गेला. मी सगळ्यांना मनापासून  नमस्कार केला.

    हे सगळं वाचून, आपण सगळ्यांनीच, या संदर्भात काहीतरी सकारात्मक करायचंच, असं मनाशी ठरवलं, तर देवाच्या कृपेने, आपल्याला अशक्य असे काहीच नाही. आणि कुठलाही बदल हा आपण नक्कीच घडवू  शकतो.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    लेकीवरच्या प्रेमापुढे…

    November 23, 2026 अवांतर

    दिवाळीतला किल्ला

    November 10, 2026 अवांतर

    दिवे

    November 8, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    लेकीवरच्या प्रेमापुढे…

    By दीपक तांबोळीNovember 23, 2026

    भाग – 1 टीव्हीवरच्या बातम्या पहाता पहाता शेखरची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. साडेदहा वाजले होते.…

    दिवाळीतला किल्ला

    November 10, 2026

    दिवे

    November 8, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    November 24, 2026

    धामापूरच्या गजाली आणि पंचकन्या

    November 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया

    November 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 नोव्हेंबर 2026

    November 24, 2026

    जोखीम

    November 23, 2026

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    November 23, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आनंदाची दिवाळी की मुक्या प्राण्यांच्या वेदना?

    November 24, 2026

    धामापूरच्या गजाली आणि पंचकन्या

    November 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आणीकही एक तया, वोळखण असे धनंजया

    November 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.