घावन बनविण्यासाठी साहित्य
- काकडीचा कीस – दोन वाट्या
- कणीक – तीन वाट्या
- तांदळाचे पीठ – एक वाटी
- गूळ अगर साखर – दोन वाट्या
- मीठ – चवीपुरते
- तेल – एक पळी
कृती
- काकडीचा किस घेऊन त्यात गूळ अगर साखर तसेच, चवीपुरते मीठ घालून तो शिजवावा.
- किस शिजल्यावर तो गरम असताना त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि ढवळून झाकण घालून ठेवून द्यावे.
- हे मिश्रण गार झाल्यावर त्यात कणीक घालावी आणि पीठ फार पातळ होणार नाही, या बेताने पाणी घालून चांगले कालवावे.
- नंतर तव्यावर तेल टाकून त्यावर हे मिश्रणाचे पीठ घालून घावन करावेत.
हेही वाचा – Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?
टीप्स
- काकडी न घालता नुसती कणीक आणि तांदळाचे पीठ घालूनही घावन होतात.
- काकडीऐवजी लाल भोपळा अगर दूधीभोपळ्याचा किस घालूनही घावन चांगले होतात.
आंबोळे बनविण्याचे साहित्य
- तांदूळ – सहा वाट्या
- तांदळाच्या कण्या – एक वाटी
- मीठ – एक चमचा
- सोडा – अर्धा चमचा
- तेल – चार चमचे
- नारळ – एक वाटी (किसलेला)
- गूळ – चवीनुसार
- जायफळ – पाव इंच तुकडा
हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो
कृती
- तांदूळ भाजून धुवावे आणि सावलीत वाळवावे. नंतर दळून त्याचे बारीक पीठ करावे.
- तांदळाच्या कण्यांची पेज करून, त्यात दळलेले तांदळाचे पीठ घालावे आणि साधारण घट्ट कालवावे.
- त्या पिठात चार चमचे तेल आणि एक चमचा मीठ घालून, ते कालवून मोठ्या भांड्यात मिश्रण झाकून ठेवावे.
- एक दिवस असे ठेवून द्यावे, नंतर ते फसफसून येईल.
- मग त्यात अर्धा चमचा सोडा घालून ते हाताने ढवळून एकजीव करावे.
- कढईला तेल लावून ती तापल्यावर त्यात वाटीने पिठाचा जाडसर थर ओतावा. वर ताट झाकावे. विस्तव मंद ठेवावा.
- थोड्याच वेळात बनपावाप्रमाणे फुगून हे मिश्रण वर येईल.
- नंतर ते परतून गुलाबी रंग आल्यावर काढून घ्यावे.
- नारळाचे दूध काढून, त्यात गूळ आणि जायफळ उगाळून घालून त्याच्याबरोबर आंबोळे खावयास द्यावे.


