Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!
    फूड काॅर्नर

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJune 19, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, विदर्भ स्पेशल सरगुंडे, आमरस आणि सरगुंडे, सरगुंडेची घसरगुंडी, मसाला सरगुंडे, उन्हाळ्यातील सरगुंडे, वाळवणाचा प्रकार सरगुंडे, टेस्टी आमरस आणि सरगुंडे, सरगुंडेची रेसिपी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज सरगुंडे हा विदर्भातील उन्हाळ्यात तयार करण्यात येणारा पदार्थ आठवण्याचे कारण म्हणजे लग्नानंतर दुसऱ्यांदा हा पदार्थ माझ्या खाण्यात आला. मला हा पदार्थ खायला कधीच जमले नाही. एकतर नवीन सुनबाई म्हणून सासरी वावरताना रोज काहीतरी नवीन प्रश्नांना सामोरे जावे लागायचे. खरंच, लग्नानंतर सासरी गेल्यावर तिथे नवीन लोकांशी आणि नवीन वातावरणात बाईच्या जातीला कितीतरी गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात नाही का?

    विदर्भात सरगुंडे हे प्रामुख्याने आंब्याच्या रसासोबत खाल्ले जातात. उन्हाळ्यात पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या पाहुणचारामध्ये या आमरस आणि सरगुंड्यांचा बेत हमखास असतो. तर, त्याच झाल असं की, माझे लग्न झाल्यावर माझ्या सासुबाईंच्या एका मैत्रिणीकडे आम्हा सर्वांना जेवायला बोलावले. ज्यांनी जेवायला बोलावले होते त्या मावशी एकदम कसलेल्या सुगरण होत्या. त्या काळात सर्व पदार्थ घरीच केले जायचे. बाहेरून गोड पदार्थ फार कमी आणले जायचे. तर, त्या मावशींनी आमच्याकरिता आमरस, सरगुंडे आणि शेवयांची खीर असा  बेत केला होता. जेवताना पानामध्ये आंब्याच्या रसासोबत त्याला जोड म्हणून मुगवड्यांची रस्सा भाजी, कुरडई, ज्वारीचे – गव्हाचे पापड, कांदा भजी, चटणी, कोशिंबीर असा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. जेवताना मला वाटलं तसा फक्त आंब्याचा रस नव्हता तर, एका मोठ्या प्लेटमध्ये उकळलेले सरगुंडे टाकून त्यावर आंब्याचा रस आणि तूप टाकून वाढण्यात आला होता. सरगुंडे खायची माझी ही पहिलीच वेळ होती, ताटातील सर्व पदार्थ संपले, पण मला ते सरगुंडे पाहून टेन्शन आलं होतं की, हे चमच्याने खायचे कसे? कारण मी पहिलाच घास तोंडात घेतला तर, ते सरगुंडे सटकन वाटीत पडले आणि चमच्यात फक्त थोडासा आंब्याचा रस राहिला. दोन-तीन वेळा तसंच झालं. ते आमरसात बुडलेले सरगुंडे काही केल्या माझ्या चमच्यात येईना. माझी त्रेधातिरपट पाहून त्या मावशींच्या मुलींना हसू येत होते… माझ्या वाटीतल्या सरगुंड्यांची ‘घसरगुंडी’ खेळणे काही संपत नव्हते! शिवाय, वरून त्या मावशींचा “अजून सरगुंडे घे” म्हणून मला आग्रह सुरू होता. शेवटी त्या सरगुंड्यांची कशीबशी चमच्यातून चालवलेली घसरण थांबवली अन् तो हातघाईचा सरगुंडे नावाचा प्रकार एकदाचा संपवला आणि मी पटकन पानावरून उठून हात धुतले. तेव्हापासून मला कोणी आमरस, सरगुंडे खाते का म्हटलं की, “मला ते आवडत नाही,” असे सांगायची. त्यांच्या वाटेला मी परत कधीच गेले नाही!

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    परंतु अलीकडेच माझ्या एका मैत्रिणीने तिच्या भिशी पार्टीत हा आमरस, सरगुंडेंचा बेत ठेवला होता. पण तेव्हा मी ते बऱ्यापैकी न सांडवता व्यवस्थित खाल्ले.

    विदर्भात आणि खानदेशात उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये सरगुंडे हे कुरडई, शेवयांइतकेच महत्त्वाचे मानले जातात. मार्च महिना सुरू झाला की, वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू होते. अक्षय्यतृतीयेला देवाच्या तसेच पितरांच्या पानांमध्ये आंब्याच्या रसापासून सरगुंडे, शेवया यांच्यासह उन्हाळ्यातील सर्व वाळवणांच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

    विदर्भात तयार केले जाणारे सरगुंडे हा उन्हाळ्याच्या दिवसांत आवडीने खाल्ला जाणारा एक प्रसिद्ध पारंपरिक आणि वाळवणाचा पदार्थ आहे. गव्हाचे पीठ आणि रवा यापासून हे सरगुंडे तयार केले जातात आणि ते दिसायला लांबट, पांढरे आणि सर्पिलाकार (गुंडाळीसारखे) असतात.

    सरगुंडे कसे तयार केले जातात?

    सरगुंडे बनवण्यासाठी गव्हाला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी ते गहू उपसून, त्यातील पाणी पूर्ण निथळून गेल्यावर ते कोरड्या सुती कापडात बांधून ठेवले जातात आणि थोडे वाळल्यावर हे गहु गिरणीतून दळून आणतात. सरगुंडे तयार करताना पहिले हे पीठ चाळणीने चाळून त्यातील कोंडा काढून घेतात, साधारण तीन वाट्या ओलवलेल्या गव्हाचे पीठ असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धा चमचा मीठ टाकून या पिठाचा गोळा  भिजवून त्याला चांगली तार तुटेपर्यंत तिंबून घेतात. त्यानंतर हे तिंबवलेले गव्हाचे पीठ एक तास झाकून ठेवतात.

    हेही वाचा – 90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    सरगुंडे तयार करताना या भिजवलेल्या पिठाचा हाताने एक लांब गोळा करून त्याला शेवईसारखा पातळसर करून तो एका हाताने गोल गोलाकार फिरवत बांबूच्या काड्यांवर, ज्वारीच्या बारीक आणि चोपड्या धांड्यांवर किंवा विणण्याच्या सुईवर लांबट गोल गुंडाळून तयार केले जातात. नंतर ते उन्हात कडकडीत वाळवले जातात आणि वर्षभर साठवून ठेवतात. सरगुंडे खाण्यापूर्वी, उकळत्या पाण्यात थोडे तूप टाकून, त्यात ते शिजवून मऊ केले जातात. शिजवून तयार असलेल्या सरगुंड्यांवर आंब्याचा रस टाकून वरून तूप सोडून हे आमरसातले सरगुंडे पाहुण्यांना पाहुणचार म्हणून खायला दिले जातात. विदर्भात आमरस, सरगुंडे, पापड, कुरडई यांचा खास बेत उन्हाळ्यात घरोघरी केला जातो.

    पारंपरिक जेवणाच्या आवडीनुसार, काही घरांमध्ये शिजवलेले सरगुंडे तिखट आणि मसालेदार फोडणी देऊन (मसाला सरगुंडे) देखील तयार केले जातात. मैद्याच्या मॅगीपेक्षा गव्हाच्या पिठाचे सरगुंडे हा उत्तम पर्याय आहे. तर, असे ते ‘गुंडांचे सर’ असलेले आणि समोरच्याला गुंडाळणारे सरगुंडे तुम्ही कधी आंब्याच्या रसासोबत खाल्ले आहेत का?

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026 फूड काॅर्नर

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    By Team AvaantarJune 17, 2026

    काकडीचे सांदण साहित्य तांदळाचा रवा – चार वाट्या चिरलेला गूळ – तीन वाट्या चांगली जून…

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 333
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 459
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 225
    • मैत्रीण 21
    • ललित 715
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.