Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आठवडी बाजारातील भातकं!
    ललित

    आठवडी बाजारातील भातकं!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरNovember 13, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, भातकं, आठवडी बाजार, गावातील बाजार, शेवचिवड्याची लज्जत, बालपणीच्या आठवणी, शेवचिवडा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिवाळीला मी दरवर्षी घरीच शेव तयार करते आणि ती तयार करत असताना मला नेहमी ग्रामीण भागातील आठवडी बाजार आठवतो. नोकरीच्या निमित्ताने बहुतांश लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य असतं, त्याप्रमाणे आमचेही विदर्भातील चंद्रपूर, अहेरी, वर्धा जिल्ह्यांतील देवळी, आर्वी, वर्धा शहर, अमरावती, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरस्ती झालेली आहे. त्यामुळे अहेरी, आर्वी, देवळी या छोट्या गावांत भरणारे आठवडी बाजार कायम लक्षात राहिले आहेत. या आठवडी बाजारांमध्ये शेतकरी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्यांसोबत प्रत्येक ऋतुनुसार शेतीत उपलब्ध असणारी पपई, पेरू, बोर यासारखी फळे विक्रीसाठी ठेवतात. हा आठवडी बाजार म्हणजे प्रत्येक गावातील लोकांचे आकर्षण बिंदू आहे.

    या बाजारात भाजीपाला आणि फळे तर विक्रीस असतात, परंतु सोबत फुगेवाले, रंगीबेरंगी बांगड्या अन् रिबिन्स, टिकल्यांची पाकिटे, सेफ्टीपिन्स, हेयर क्लिप्स विक्रेते, शुगर कॅण्डी विक्रेते (ज्याला गावामध्ये ‘बुढ्ढी के बाल’ म्हटले जाते), बूट पॅालिशवाले, पायातील तोरड्या; तांब्या-पितळीच्या, पंचधातूंच्या, रंगीबेरंगी खड्यांच्या अंगठ्या, कानातले, गळ्यातले, त्यासोबतच तांब्याचे कान कोरणे, स्टिल आणि तांब्याची कडी, लाल आणि काळे कडदोरे विकणारे… दुसरीकडे हे विकत घेणारे… असे अनेक हवसे, नवसे आणि गवसे लोक या आठवडी बाजारात येतात. मिरची, मसाल्यापासून कपडे, चपला, भांडी, वेताच्या टोपल्या, लोखंडी बादल्या, ॲल्युमिनियमची तसेच लोखंडाची टोपले, कढया, तवे, सुया, बिबे, सुपं, झाडण्या, शेतीचे सामान आणि औजारे, दोरखंड असे सर्व सामान या आठवडी बाजारात विक्रीस उपलब्ध असतं. खेडेगावातील हा बाजार आठवड्यातून एकदा ठरलेल्या दिवसावर भरतो आणि त्या दिवशी मोठी उलाढाल होते.

    या बाजारात येणारे लोक आपल्या मनासारखी खरेदी झाली की, सर्वात शेवटी भातकाच्या म्हणजेच खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानात जातात आणि तिथे शेव, चिवडा, पापडी, जिलेबी, फुटाणे, मुरमुरे यासारखे खाऊ किंवा भातकं घेऊन आपापल्या घराकडे रवाना होतात. आमच्याकडे आठवडी बाजारातील या खाद्यपदार्थांना ‘भातकं’ अस म्हणतात. यामध्ये जाड्या पोह्यांचा लसूण घातलेला चिवडा, शेव हे खास चवीचे असतात. यासोबतच तळलेले तिखटमीठाचे शेंगदाणे, डाळ्या, हिरव्या मसाल्यातील फुटाणे, सुकी भेळ, कच्चा चिवडा, बॅाबी (ज्यांना आमच्याकडे ‘पोंगा पंडित’ म्हणतात) असे अनेक पदार्थ त्या दुकानांमध्ये मिळतात. परंतु ग्राहकवर्ग हा शेव-चिवड्याच्या जास्त पसंती देतो. त्यामुळे या आठवडी बाजारात मिळणाऱ्या शेव-चिवड्याला खूप मागणी असते. या शेवेचेही जाड, बारीक, मसाल्याची शेव असे अनेक प्रकार दिसतात, परंतु साध्या नमकीन शेवेचा उठाव जास्त असतो; कारण ही शेव कशातही घालून खाता येते… चिवडा, भेळ, उसळ यांची लज्जत ही साधी शेव वाढवते. नुसती खायलाही छान वाटते.

    बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात, त्यामध्ये मनस्वी आनंद देणारं हे शेव-चिवड्याचे भातकं आहे. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये दोऱ्याने बांधलेले ही भातकाचे पुडके म्हणजे लहान मुलांचा अवर्णनीय आनंद असायचा. त्याच्या सुंगंधाने सारे घरदार हसरे व्हायचे. आमच्या लहानपणी कोणी गावाकडून आले तर आवर्जून हे शेव-चिवड्याचे भातकं आठवणीने खाऊ म्हणून घेऊन येत असत. हे भातकं आजही लहानपणीच्या अनेक आठवणी घेऊन मनामधे घर करून आहे. अनेक जणांच्या मायेच्या ओलाव्याचे क्षण या शेव-चिवड्याच्या भातकांमधे सामावलेले आहेत. दर आठवड्याला आई-बाबा बाजारातून हे भातकं घेऊन कधी घरी येतात, त्याची आतुरतेने लहान मुलं वाट पाहात असायची. त्या काळात शेव-चिवडा खायला मिळणे म्हणजे खूप मज्जा असायची!

    हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!

    थोड्या-थोडक्या गोष्टींमध्ये, साध्या साध्या वस्तूंमध्ये खूप मोठं सुख सामावलेले असायचे… मगे ते फुगेवाल्याकडे मिळणारे प्लास्टिकचे घड्याळ असो अथवा कागदाची विशिष्ट घडी मोडली की आरसा असणारा आणि वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र बदलवणारा कागद असो किंवा भिंगरी, लाडीलप्पा असो… यामध्ये मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा. त्यात या आठवडी बाजारात जर ‘बाईस्कोप’ पहायला मिळाला तर, अजूनच बहार येत असे. हा बाईस्कोप पाहताना लहानपणी आम्ही अनेक शहरे त्या पंधरा मिनिटांत फिरून येत असू! तसेच आवडत्या फिल्मी कलाकारांचे फोटो त्या बाईस्कोपमधे पाहून त्या नट-नट्यांना जणू प्रत्यक्ष भेटल्याचा आविर्भाव जागृत व्हायचा.

    या शेव-चिवड्याच्या भातकाशी कैक लोकांची नाळ जुळलेली असेल. वयाने कितीही मोठे झाले तरी हे लोक गावाकडे गेले की, त्यांना हा आठवडी बाजार आणि त्या बाजारात मिळणारी ही भातकं पाहिली की मनाने ते अगदी लहान मुलासारखे होऊन ही शेव-चिवड्याची भातकं आवर्जून खरेदी करत असतील…

    आता काळानुसार ग्रामीण भागातील या आठवडी बाजारांचे स्वरूप थोडे बदलले असेल, परंतु कुठल्याही गावातल्या आठवडी बाजारांना तुम्ही भेट दिली तर, आजही ही शेव, चिवडा, जिलेबीची भातकं मिळणारी दुकान तुम्हाला तिथे दिसतात आणि त्या भातकांची खरेदी विक्रीदेखील पहिल्यासारखीच मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या दुकानांच्या आजूबाजूला कचोरी, समोसे, आलुवडे, तर्री पोहे, चहाच्या टपऱ्या असतीलही, परंतु या सर्वांमध्ये शेव-चिवड्याचे भातक बाजी मारते! खाऊंच्या नामावलीमध्ये भातकाने आपले एक वेगळे ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे.

    आजही आम्ही जर कुठल्या ग्रामीण भागात गेलो आणि तिथे जर हे भातकाची दुकानं असतील तर आवर्जून हे शेव-चिवड्याचे भातकं घेऊन येतो. आठवडी बाजारातून विकत घेतलेल्या त्या भातकाची चव घरात तयार होणाऱ्या शेव-चिवड्याला येत नाही, याचं कारण काय असाव? हे आजपर्यंत लक्षात आलेले नाही. तरीही या भातक्यातील शेव घरी करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. घरी तयार केलेली शेवही चवीला छानच होते, परंतु भातक्यामधील गावरान प्रेमाची सर या शेवेला येत नाही हे खरं!

    हेही वाचा – विदर्भातील आठवीची पूजा!

    कदाचित, याचे कारण एकच असावे की, गिऱ्हाईकाला देव मानून गावातील लोक आपले उद्याोग धंदे करत असतात… गिऱ्हाईकाचे समाधान झाले की, त्यांच्या वस्तूंची विक्री जोरदार होणार असते… हे ध्यानी ठेवून ते आपल्या पदार्थांची चव, क्वालिटी, ताजेपणा जपण्याचा अतोनात प्रयत्न करतात… त्यामुळेच त्यांच्या पदार्थांना एक वेगळी लज्जत येत असावी, नाही का? दिवाळीला मी दरवर्षी फराळासाठी इतर पदार्थ करते, तेव्हा शेवपण आवर्जून करते आणि दरवर्षी ही शेव करत असताना माझ्या डोळ्यासमोर ग्रामीण भागातील आठवडी बाजाराचे चित्र उभे राहते अन् त्या आठवणींमुळे मी घरी केलेली शेवही कुरकुरीत आणि चविष्ट होते, हे मात्र 100% खरं!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Most Popular

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.