नीलिमा खडतकर
बेसन-काजू बर्फी साहित्य
- बेसन – 3 कप
- तूप – 2 कप
- दूध – 1 कप
- साखर – दीड कप
- काजू पूड – अर्धा कप
- वेलची पूड – अर्धा टीस्पून
- काजू-पिस्ता काप – 2 टेबलस्पून
कृती
- प्रथम एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात अर्धा कप पातळ तूप, अर्धा कप दूध घालावे.
- तूप आणि दूध हाताने पूर्ण बेसनाला छान चोळून घ्यावे. हे बेसन 15 मिनिटे बाजूला ठेवावे.
- नंतर ते बेसन चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यावे म्हणजे बेसनाचा रवा तयार होईल.
- आता कढईत एक कप तूप घ्यावे. त्यात तयार बेसनाचा रवा घालून मध्यम आचेवर बेसन भाजत राहावे. मधे मधे तूप (एक-दोन टीस्पून) घालावे.
- साधारण 20-25 मिनिटांनी बेसनाचा रंग बदलल्यावर (लाल झाल्यावर) दोन-तीन टीस्पून दूध घालावे. दूध घातल्याने बर्फी दाणेदार होते.
- हे बेसन परत थोडे परतावे आणि नंतर काजू पूड घालून बेसनात मिसळून घ्यावी.
- गॅस बंद करावा. गॅस बंद केल्यावर सुद्धा मिश्रण ढवळत राहावे.
- साखरेचा दोन तारी पाक करून घ्यावा, पाक तयार झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी.
- तयार पाक भाजलेल्या बेसनात थोडा थोडा घालून ढवळावे, गुठळ्या होऊ देऊ नये.
- नंतर बेसन-पाकाचे मिश्रण एका ताटात जाडसर पसरावे. वरून काजू -पिस्ता काप लावावे.
- थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. छान खुशखुशीत दाणेदार बर्फी तयार.
हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या
शाही ब्रेड रोल साहित्य
- ब्रेड स्लाइस – एक पुडा (ताजा ब्राऊन ब्रेड)
- काजू, आक्रोड, पिस्ता – सर्व मिळून एक कप
- डेसिकेटेड कोकोनट – 1 कप
- पिठीसाखर – अर्धा कप
- खवा – अर्धा कप
- साखर – 1 कप
- तूप – 1 टीस्पून
कृती
- बदाम, काजू, आक्रोड, पिस्ता जाडसर बारीक करून घ्या (पूड नको) आणि थोडे तूपावर परतून एकत्र करा.
- परतलेले ड्रायफ्रुट्स, पिठी साखर आणि खवा मिसळून मिश्रण तयार करा.
- ब्रेड स्लाइसच्या कडा कापून थोडी लाटून पातळ करा.
- त्यावर ड्रायफ्रुटचे मिक्ष्रण घाला आणि त्याचा घट्ट रोल करा. कडा (पाण्याने) व्यवस्थित चिटकवा.
- नंतर रोल तुपात शॅलो फ्राय करा.
- साखरेचा गोळीबंद पाक करा. रोल या पाकात बुडवून डेसिकेटेड कोकोनटमध्ये छान घोळवून घ्या.
- झाला शाही ब्रेड रोल तयार.
हेही वाचा – Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


