Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑक्टोबर 2026

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… घनुले!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरSeptember 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, लेखिका माधवी जोशी, लेखिका माधवी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, विदर्भ स्पेशल रेसिपी, विदर्भ स्पेशल घनुले, कृष्णजन्म नैवेद्य, कृष्ण नैवेद्य घनुले, तिखट चटपटीत घनुले
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गोकुळातल्या नंद आणि यशोदामातेकडे वाढणारे वासूदेव-देवकीचे बाळ, श्रीकृष्ण आपल्या लीलांनी सर्वांचे मन मोहून घेत होते. यशोदेला तर ते बाळ मिळताच आभाळ ठेंगणे झाले. त्याच्या वाढत्या वयासोबत त्या बाळाचे कोडकौतुक करता करता तिला दिवस पुरेनासा झाला. दही, दूध, लोणी तर त्याचे अत्यंत प्रिय पदार्थ त्यासोबत विविध प्रकारचे पोह्यांचे प्रकार, शिरा, सातू, रवा-बेसनाचे लाडू हेपण त्याला प्रियच! या गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थही त्याच्या आवडीचेच! कधीतरी एखाद्या गोपगोपिकेच्या घरी त्याचे असले चमचमीत पदार्थ खाणे होतच असे, घनुले हा तसाच प्रकार! बालगोपाळांना तो आवडतो म्हणून कणकेपासून केला जाणारा आणि चविष्ट असा प्रकार त्या काळात केला जात असावा, असं मला वाटत. आमच्या विदर्भात हे तिखट, मसालेदार रसरशीत चवदार ‘घनुले’ खास करून जन्माष्टमीच्या पारण्याला नैवेद्यात असतात, सुंठवडा, गोपालकाला, विविध प्रकारचे लाडू, खीर, करंज्या, पापड्या यासोबत हे घनुले आणि गावरान हरभऱ्याची उसळ हेपण नैवेद्याच्या थाळीत स्थानापन्न असतात. घननिळ्या कृष्णाला आवडणारा हा पदार्थ म्हणून त्याचे नाव घनुले पडले असावे, असही मला वाटतं बरं! नाहीतर, गोल गोल चक्रीसारख्या घनघडीसारखे आकार असणारे म्हणूनही त्यांना घनुले म्हटले जात असावे! ते काहीही असो परंतु हा पदार्थ आहे मोठा चविष्ट! श्रावणातल्या जन्माष्टमीच्या दिवसात बरसणाऱ्या पावसात हे रसदार, मसालेदार घनुले खायला असे काही मस्त लागतात की, कढईभर कधी संपतात त्याचा पत्ताच लागत नाही. चला तर मग जाणून घेऊ याची रेसिपी!

    साहित्य

    • गव्हाचे पीठ – दोन वाट्या
    • बेसन – अर्धा वाटी (ऐच्छिक आहे, मी वापरते कारण चव तर चांगली येतेच शिवाय घनुले मऊसर शिजतात.)
    • दही – दोन ते तीन चमचे
    • आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट – चवीनुसार
    • हळद – एक चमचा
    • लाल तिखट – दोन ते तीन चमचे
    • तीळ – एक टीस्पून
    • ओवा – एक टीस्पून
    • गरम मसाला – एक चमचा
    • कांदा – एक (बारीक चिरेला)
    • टोमॅटो – बारीक चिरलेला एक (ऐच्छिक)
    • हिंग – एक छोटा चमचा
    • तेल – एक ते दीड पळी
    • मीठ – चवीनुसार
    • पाणी – दोन ग्लास
    • कढीपत्ता – पाच ते सहा पाने
    • कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर

    हेही वाचा – Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा

    कृती

    1. गव्हाच्या पीठात अर्धी वाटी बेसन टाकून त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही, आले- लसूण- हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा तिखट, तीळ, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा. त्याला वरून तेलाचा हात लावून दहा मिनिटे मुरत ठेवावा.
    2. फोडणीसाठी जरा पसरट आणि खोल असे भांडे घेऊन त्यामधे दीड पळी तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून हिंग टाकावा.
    3. नंतर त्यामध्ये कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत परतावा.
    4. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये आले- लसूण- हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकून तीपण थोडी परतावी.
    5. नंतर त्यात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून त्यात दोन ग्लास पाणी टाकावे.
    6. हा रस्सा पातळसरच असतो, तरीपण त्याला घट्टपणा हवा असेल तर थोड्या बेसनाची पाण्यात पेस्ट करून ती या फोडणीत सोडावी.
    7. चवीनुसार मीठ टाकावे आणि रस्सा मध्यम आचेवर उकळत ठेवावा.
    8. आता भिजवलेल्या पीठाचे लांबट पातळसर तुकडे करून ते गोल गोल फिरवून त्यांना चकली किंवा जिलेबीसारखा आकार द्यावा आणि त्या सर्व जिलेब्या त्या मसाल्याच्या उकळत्या पाण्यात सोडाव्यात. वरून कोथिंबीर घालावी.
    9. भांड्यावर झाकण अर्धवट उघडे ठेवून हे सर्व घनुले शिजवून घ्यावेत. दहा ते बारा मिनिटांनी हाताने एखादा घनुला दाबून मऊ शिजला की नाही ते पहावा. नरम झाला असेल तर घनुले शिजले, असं समजावे आणि गॅस बंद करावा.
    10. वरुन परत एकदा कोथिंबीर टाकून या मसाल्यांनी परिपूर्ण अशा पाणीदार घनुल्यांचा पावसाळी हवेत आनंद घ्यावा!

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    By Team AvaantarSeptember 21, 2026

    चिंचेच्या ठेच्यासाठी साहित्य ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या) ओल्या मिरच्या – 20…

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026

    विदर्भ स्पेशल… वाटीभर मुगाच्या दाण्यांची कढईभर आमटी!

    August 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑक्टोबर 2026

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 459
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 616
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 973
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑक्टोबर 2026

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.