Author: हेमा पाटील

Avatar photo

मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

भाग – 15 “बाई, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही गावातच राहता. सध्या शाळेतील कदम बाई बदलून गेल्या आहेत. त्यांच्या जागेवर नवीन कुणाची नेमणूक अजून झाली नाही. तुम्ही आत्ता सुट्टी काढण्याऐवजी अजून काही दिवस काम करता का? ही सुट्टी तुम्ही बाळंतपणानंतर घेऊ शकता. शाळेची अडचण आहे म्हणून विनंती करतोय. बघा तुम्हाला जमत असेल तर… तुमची तब्येत ठीक आहे म्हणून विचारतोय. बघा जमतंय का?”  मुख्याध्यापक पाटील यांनी विचारले. यावर उमा विचारात पडली. अजून पंधरा दिवस ती शाळेत येऊ शकली असती. ‘मी उद्या सांगते,’ असे तिने मुख्याध्यापकांना सांगितले. घरी आल्यावर तिने याबाबत महेशरावांशी चर्चा केली. त्यांचेही म्हणणे पडले की, ‘शाळेची अडचण लक्षात घेता…

Read More

भाग – 14 सासुबाईंच्या सांगण्यावरून महेशराव उमाच्या माहेरी आलेले आहेत. सकाळी उमा लवकर उठली आणि थेट स्वयंपाकघराकडे गेली. आईचे काम चालले होते. तिने आईला सांगितले की, “मीही आज परत जाणार आहे. सकाळीच गेले तर, आजची सुट्टी पडणार नाही. इथूनच डबा घेऊन थेट शाळेतच जाईन.” आई म्हणाली, “ठीक आहे.” आईने स्वयंपाकाची तयारी सुरू केली. मामी मदतीला होत्याच. उमा आणि महेशरावांचे आवरून झाल्यावर ते दोघे सोबत निघाले. आईचा आणि मामीचा निरोप घेताना उमाला जड गेले. डोळे पाणावले. हात हलवत ती महेशरावांच्या मागे गाडीवर बसली. महेशरावांनी एसटी स्टँडवर गाडी थांबवली आणि तिला बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर ते आपल्या गाडीवरून पुढे निघाले. बसमध्ये बसल्या…

Read More

भाग – 13 सासुबाईंच्या सांगण्यावरून महेशराव आले असल्याचे उमाला समजले आणि म्हणून उमा फुरंगटून बसली. आईने कोंबडी वडे बनवले होते. आता तर काय तिचे लाडके जावईबापू आले होते, त्यामुळे तिची लगबग वाढली होती. तर, वंदू आणि उमा तिच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसल्या होत्या. वंदू तिला म्हणाली, “बघ, दाजी तुझ्यासाठी धावतपळत इथवर आले. तुझ्यावर किती माया आहे त्यांची.” “माझ्यासाठी नाही आले ते, त्यांच्या आईने सांगितले की, तिची तब्येत कशी आहे ते बघून ये म्हणून आलेत.” “तू जरा चक्रमच आहेस उमा. हे नुसते सांगायचे असते. त्यांनी सांगितले आणि तू लगेच विश्वास ठेवलास? जरा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं असतंस, तरी तुला…

Read More

भाग – 12 वंदूची झालेली भेट आणि तिची चाललेली परवड ऐकून उमा हतबुद्ध होऊन बसली होती. पूर्णपणे विचारमग्न होती… आई वंदूच्या घरी जाऊन ‘तिला जेवायला पाठवा,’ असे सांगून आली तरी, उमा तिथेच विचारात गढून बसलेली होती. मामीने आत जाऊन चहा बनवला होता व त्या चहाची कपबशी घेऊन उमाच्या समोर उभ्या राहिल्या. “उमा, चहा घे, बरं वाटेल तुला.” उमा सोबत असल्याने मामींना उमाच्या उद्विग्न मनःस्थितीची जाणीव झाली होती. उमाने चहाची कपबशी हातात घेतली आणि ती कपाने चहा पिऊ लागली. अजूनही तिची नजर कुठेतरी अज्ञातातच होती. मामी आता आत स्वयंपाकात मदत करण्यासाठी निघून गेली. चहाचा घोट घेतल्यावर उमाला जरा बरे वाटले. तेवढ्यात…

Read More

भाग – 11 मामीसह उमा थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडली. रस्त्यात वंदना भेटली. तिच्याबरोबर तीन वर्षांची मुलगी शरयू होती. वंदनाचे अनुभव ऐकून उमा अस्वस्थ झाली. शरयूचा जन्म झाला, त्यावेळी वंदनाला बघायला अगर भेटायला सासरचे कुणीही आले नव्हते. आले ते थेट बारशालाच. तिचा नवराही आठ दिवसांनंतर आला होता! “असं कसं वंदू? तुझ्या नवऱ्याला जाणीव नाही का आपल्या बायकोची? लग्नाच्या वेळी जे विधी केले जातात ती वचने जपण्याचे काम फक्त स्त्रीचेच आहे का?” “उमा, लग्नाच्या वेळी किंवा त्यानंतरचे काही दिवस आपल्याभोवती भिरभिरत फिरणारा नवरा पाहून आपण सुखावतो, पण नवऱ्याची खरी ओळख अशा प्रसंगी होते. कुठल्याही स्त्रीला जर नवऱ्याचा पाठिंबा असेल तर ती सगळ्या…

Read More

भाग – 10 “मामी, एकदम भारी झालीय भेळ. थोडी आणखी द्या.” “नको, जास्त खाल्ली तर रात्री जेवण जाणार नाही. तुझी इच्छा होती म्हणून बनवली. पित्त वाढेल याने. तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, नाही तर आजारी पडलीस तर तुझ्या सासरची माणसं म्हणतील, माहेरी गेली आणि आजारी पडून आली…” मामीचं हे बोलणं  ऐकून उमाने हात आवरता घेतला. दोघींनी चहा घेतला आणि थोडे चालण्यासाठी त्या बाहेर पडल्या. चालत पुढे गेल्यावर वंदना भेटली. उमाला फार आनंद झाला, कारण वंदनाचे लग्न झाल्यापासून दोघींची भेट कधीमधीच व्हायची. अवघडलेल्या वंदनाच्या बोटाला पकडून तिची साधारण तीन वर्षांची मुलगी चालत होती. तिच्याशी बोलत वंदना चालत होती. उमाला पाहून तिलाही खूप…

Read More

भाग – 9 मोगऱ्याच्या वेलापाशी विचारात गढलेली उमा आपल्या पोटात काय असेल, मुलगा की मुलगी? या विचाराने त्रस्त झाली आहे. “उमा, कुटं हायंस?  चल की जेवायला….” अशी हाक मारत आई बाहेर आली म्हणून उमा विचारांच्या आवर्तातून बाहेर आली. आई जर अचानक तिच्यासमोर येऊन उभी राहिली असती, तर आपली पोरगी कसल्या भीतीने एवढी त्रासली आहे, याचे तिला कोडे पडले असते. ती आईच्या मागोमाग आत गेली. जेवण झाल्यावर मामा परत गेला. मामी आणि आईने मागचे सगळे आवरले. नंतर आई शेताकडे गेली. आता मामी आणि उमा दोघीच घरात होत्या. दोघींच्या गप्पा रंगल्या. गप्पांच्या ओघात उमाने मामीला विचारले, “तुम्हाला काय वाटते मामी, मला मुलगा…

Read More

भाग – 8 उमा माहेरी आलेली आहे. तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवतील की नाही, याबाबत काकी साशंक आहे… “मग मी आता परत जातच नाही बाळंतपण होईपर्यंत. मग काय करतील आत्याबाई?” उमा म्हणाली. “असं वेड्यासारखं का बोलतेस? त्यांनी दोन दिवस तुला बरं वाटावं म्हणून पाठवलंय ना. तू जर हट्टीपणा करून परत गेली नाहीस, तर महेशरावांना ते आवडणार नाही, याचा विचार केला आहेस का?” बाबांनी आपले म्हणणे सांगितले. रात्री भिंतीकडे तोंड फिरवून झोपलेला नवरा तिच्या नजरेसमोर आला. आपण एक वाक्य बोललो, तर त्यांना इतका राग आला, मग असे वागलो तर कायमची माहेरीच रहा, असे म्हणायला ते कमी करणार नाहीत, असे तिला वाटले. तिचा…

Read More

भाग – 7 दोन दिवस माहेरी जा, असे पारूबाई म्हणाल्या खऱ्या, पण उमाला आपल्या सासूबाईंच्या वागण्यातील बदल पाहून आश्चर्य वाटले. रात्री उशिरा जेव्हा महेशराव झोपायला खोलीत आले तेव्हा ती जागीच होती. आत्याबाईंनी माहेरी जा, असे सांगितल्याचे तिने महेशरावांना सांगितले. “जा की मग. दोन दिवस जरा बदल होईल.” “हो, पण घरात एवढे पाहुणे आलेत आणि मी माहेरी निघून जायचे हे बरे दिसत नाही ना.” उमा म्हणाली. “आईने सांगितले आहे ना, मग मागची काळजी तू करू नकोस. ती बघून घेईल,” हे ऐकूनही उमाच्या मनाची रूखरूख कमी झाली नव्हती. “माझ्या पोटात घराण्याचा वंशज वाढतोय म्हणून अलिकडे आत्याबाईंच्या वागण्यात बदल झाला आहे, असे मला…

Read More

भाग – 6 मानसिक ताणामुळे उमाला चक्कर आली. मावस सासूबाई जे बोलल्या ते ऐकून आपल्या भावाची काय प्रतिक्रिया येतेय असे वाटून उमा अधिकच घाबरली. आपल्या बहिणीकडे तोंड वळवत पारूबाई म्हणाली, “काय कवतिक सांगती सुनंच, एकदा फतकाल घालून बसली, तर बसला जागी उटवतो का तिला? कधी यळंवर खाया मिळालंय का तुमास्नी? आली कवतिक करनारी. माजी सून रानात जात न्हाई, पर दर मैन्याला करकरीत नोटा आनती. तुजी दोन पोरं तू कशी सांभाळली, त्ये मी बगीतलं हुतं. ही साळंत लोकाची यवडी पोरं दिसभर सांभाळती अन् घरातलं समदं काम तीच करती. म्या काडीला बी हात लावत न्हाय.”   विषय करंडे सोडून भलतीकडेच गेला आहे, हे…

Read More