Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् शर्वायने माफी मागितली
    ललित

    …अन् शर्वायने माफी मागितली

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यNovember 20, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या विवाह, शर्वायला आराध्याची साथ, आनंदीला माधवची फूस, तन्वीची दुहेरी खेळी, माधवच्या कटात अज्ञात व्यक्ती
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 52

    निशा आणि अन्वीला शोधत आनंदी पाठच्या अंगणात गेली… जिथे आजी त्यांना आपल्या वाड्याच्या रीती परंपरांची माहिती देत होत्या.

    “सॉरी… निशाताई, शर्वायची भेट होईल असं वाटत नाही, ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे,” आनंदी निशाकडे पाहून म्हणाली.

    “अरे बापरे …. हो का?  मग आम्ही पण निघतो.  अजून थांबण्यात काही अर्थ नाही,” निशाने उठतच उत्तर दिलं

    त्याही जणू  ही उत्तम संधी मिळाली असं जाणवून निघाल्या…

    अन्वी आणि निशा शांतपणे सुमित्रा आजींच्या खोलीत त्यांच्या समोर बसल्या होत्या . आजींचं बोलणं हळूहळू एका आठवणीच्या लयीत चाललंय.

    सुमित्रा आजीचे डोळे अंधूक चमकत होते… आपल्या वाड्याबद्दल त्या बोलत होत्या….

    “या वाड्यात पाऊल टाकल्यावर प्रत्येक स्त्री फक्त सून राहत नाही… ती एक परंपरा बनते. माझ्या वेळेस, मी जेव्हा पहिल्यांदा इथे पायघड्यांवर पाऊल ठेवलं, तेव्हा वाटलं होतं – आपण एका घरात नव्हे, तर एका चालत्या फिरत्या इतिहासात पाऊल ठेवतोय.”

    त्या थोडं हसल्या.

    “तेव्हाही प्रथा होत्या — दिव्याची वेळ, अंगणात पहाटे पहिली रांगोळी, सण कोणते आणि कसे साजरे करायचे याचेही नियम आहेत.” घराच्या सुनेने काय करावं काय करू नये याचे ही नियम आहेत…. का तर सर्व समाज त्यांच्याकडे आदराने पहात असतो… त्यांचं अनुकरण करत असतो.

    अन्वीने आतुरतेने विचारलं, “आणि आता? सगळं जसंच्या तसं चालू आहे का?”

    सुमित्रा आजी गर्वाने, आनंदीकडे बघत म्हणाल्या..

    “घरात मी आल्यावर या प्रथांना जीव दिला… पण माझ्या नंतर जर कुणी त्या अजून हिरीरीने जपल्या असतील, तर ती आहे आनंदी.”

    “ती केवळ पाळत नाही — तिने त्या प्रथांमध्ये नवा रंग मिसळला, नवा उत्साह फुंकला….कधी कधी मला वाटतं – माझ्याहीपेक्षा ती त्या जास्त उमजून चालवते.”

    सुमित्रा आजी क्षणभर थांबल्या….

    “काही लोकं परंपरा पाळतात कारण त्यांना सवय असते. पण काहीजण त्या जपतात, कारण त्यांना त्या काहीतरी सांगत असतात… आनंदी अशाच जपणाऱ्यांतली  आहे.”

    त्या क्षणी – अन्वी गुपचूप आनंदीकडे पाहत होती – कदाचित तिच्या मनात  अस्वस्थता, कदाचित स्पर्धा, किंवा एक प्रश्न होता – “हे असं आयुष्य घालवणं जमणार आहे का आपल्याला?  पद्धतीसाठी कोण असं सगळं करत बसेल? आपल्या आईने तर असं काही केलं नाही, आणि मी असं जगावं असं हिला वाटत… ” अन्वी मनातच म्हणत होती.

    सुमित्रा आजी  थोडं हसत, आवाजातील ठामपणा व्यक्त करत म्हणाल्या…

    “घरात मी आल्यावर जसं मी या प्रथांना जीव दिला, तसंच आनंदीने त्या पुढे नेल्या… आता या प्रथा पुढे नेणारी तिचीच सून असेल, यात काही वादच नाही!”

    त्यांनी मुद्दाम अन्वीच्या डोळ्यांत पाहत विचारलं….”हो ना, अन्वी?”

    अन्वी क्षणभर गडबडली. पण लगेच  स्वतः ला सावरत ती तोंड थोडं वाकडं करत निशाकडे पाहत, आणि हलक्याच स्वरात म्हणाली… “नाही म्हणजे… प्रथा पाळायचं म्हणजे वेळ लागतो, संयम लागतो… आणि…” तिला खरं तर उत्तर द्यायला काही सुचतं नव्हतं आणि जपून ही बोलावं लागत होतं..

    नशीब तितक्यात आनंदी तिथे आली आणि अन्वीने सुटकेचा निश्वास सोडला…. नाही तर आजींनी चांगलाच क्लास लावला होता…

    सगळ्यांशी निरोपाच्या औपचारिक गप्पा चालू होत्या, पण त्या गप्पांच्या आवाजातही काहीतरी हरवल्यासारखं होतं.

    सुमित्रा आजींना दोघींनी नमस्कार केला, त्यांच्या डोळ्यांत प्रेमही होतं, पण त्याच वेळी एक अनामिक ताण दाटून आलेला होता – जणू काहीतरी सांगायचं राहून गेलं होतं.

    “नंतर कधी तरी वेळ मिळेल तेव्हा या पुन्हा…” आजींनी शांतपणे म्हटलं. पण त्यांच्या स्वरात आग्रह नव्हता…

    अन्वीने स्मित केलं, पण ते स्मित ओठांपुरतंच होतं. तिच्या डोळ्यांतून एक प्रश्न ओघळत होता, तर तिचं मन गोंधळलेलं होतं, पण तिने चेहऱ्यावरची शालीनता तुटू दिली नव्हती.

    निशा मात्र खूप शांत होती. जणू मनात बरंच काही स्पष्ट झालं होतं, पण आता बोलून काही फरक पडणार नाही, हे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होतं.

    ती वळून एकदा वाड्याकडे पाहिलं – त्या जुन्या भिंतींना, त्या आठवणींच्या गंधाला – आणि नकळत तिचं मन भूतकाळाच्या एखाद्या दारात अडकल्यासारखं थांबलं.

    “शर्वाय भेटला असता तर बरं वाटलं असतं,” आनंदी म्हणाली, आवाजात खंत होती.

    पण त्या वाक्याला अन्वीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त हलकेचं डोकं हलवत ‘हो’ केल्यासारखं काहीसं केलं आणि ती निशाकडे वळली.

    गाडी तयार होती. अन्वीने पर्स घेतली, आणि दोघी गाडीकडे वळल्या.

    त्या वळण्यात, त्या चालण्यात एक निश्चितपणा होता – पण त्याच वेळी तुटलेलं काहीतरी मागे राहतंय याची जाणीवही होती… गाडीत बसताना अन्वीने एकदा मागे वळून पाहिलं –

    वाड्याच्या त्या उंची पाठी दूर होतं जाणारं घर, आणि त्या घरासोबत पाठी  पडत जाणारे काही नात्यांचे धागे…

    हेही वाचा – आजींनी आराध्यावर सोपविली नवीन जबाबदारी

    गाडी निघाली. धुळीचा एक हलकासा पडदा मागे राहिला. वाड्याच्या पायऱ्यांवर सुमित्रा आजी, आनंदी आणि  आराध्या  अजूनही उभ्या होत्या…. गाडी दूर गेली आणि आराध्याच्या फोनची मेसेज ट्यून वाजली….

    शर्वायचा मेसेज आला होता – “Just got free. Where are you?”

    शर्वायचा मेसेज आल्यानंतर आराध्या क्षणभर स्तब्ध झाली.

    “Just got free. Where are you?” या साध्याशा प्रश्नामागे खूप काही होतं –

    त्याचं कामात अडकून जाणं,..तिचं वाट पाहणं, आणि मधे निघून गेलेल्या वेळातली  भेटींची सल…

    ती हळूच हसली….. एकदम लहान मुलीसारखी लाजलीही –

    फोन हातात घेत तिने स्क्रीनकडे पाहिलं.

    त्याच्या नावाखाली दिसलेलं “online”, यामुळे तर तिला काहीतरी खास वाटून गेलं.

    तिने टाईप करायला सुरुवात केली — “वाड्यावर सोडून गेला आहात, विसरला की काय?”

    अगदी छोटा प्रश्न. पण त्यात एक गोड रुसवा, एक लपलेला तक्रारीचा स्वर, आणि एक नात्यात  वाट पाहणारी भावना होती.

    तिने मेसेज पाठवला.

    क्षणभर हसतच फोन बाजूला ठेवला…पण काही सेकंदांनी परत उचलला — “Seen” झालं होतं.

    ती पुन्हा लाजली… आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली.

    आता तिच्या चेहऱ्यावर लाजेत लपलेलं हास्य होतं, आणि मनात कुठेतरी पुन्हा एकदा त्याची पावलं वाड्याकडे वळतील अशी आशा होती…

    आराध्याने मेसेज पाठवून काही क्षण झाले. फोन स्क्रीनवर “seen” केलेलं कळलं होतं, पण टायपिंग सुरू नव्हतं. क्षणभर तिला वाटलं – कदाचित उशीर झाला…

    तेवढ्यात फोन वाजला…… शर्वायचा कॉल होता… तिने पटकन उचलला.

    ” हॅलो?”

    पलीकडे क्षणभर शांतता होती. मग त्याचा हलकासा श्वास ऐकू आला.

    ” आरु…” शब्द हलकेच उच्चारलेले, पण सोज्वळ अन आर्त वाटलं ते नाव घेणं …. असं त्याने पहिल्यांदाच तिला संबोधलं होतं.

    “माफ करशील ना?”

    तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं.

    “माफी मागितलीत? म्हणजे चूक झाल्याचं मान्य आहे तुम्हाला?”

    ” हो… आणि शिक्षा ही मान्य आहे. पण फक्त एक अट – ती तू द्यायची”

    आराध्याचं मन एक क्षण थबकलं.

    ” कसली अट? शिक्षा ही दे म्हणताय आणि अट ही घालताय?? ”

    “मी येतो आहे. वाड्याजवळ आलोय. पण भेटलीस, तरच पुढे बोलणार…”

    ती क्षणभर गोंधळली….काहीही न बोलता फोन कट झाला… शर्वायला नक्की काय सुचवायचं होतं हे तिला कळलंच नव्हतं.

    त्याच्या मते तिला राग येणं स्वाभाविक होतं … बायको असूनही त्याने तिला तो असं अचानक का?  आणि  कुठे? जातोय  याबाबत काहीच सांगितलं नव्हतं.

    घरातून निघतानाचा त्याचा आवेश संतापलेला असावा, असाच वाटत होता, कारण ज्या पद्धतीत त्याने लूक दिला होता ते पाहूनच आराध्या घाबरली होती आणि माधवची बोलती बंद झाली होती …. त्यामुळे पुढे काय? कुठे? विचारायची सोय नव्हती.

    हेही वाचा – शह-काटशहचा खेळ सुरू…..

    आराध्या थोडीशी चकित झाली. तिने खिडकीबाहेर पाहिलं…

    वाड्याच्या मुख्य गेटजवळ एक गाडी थांबलेली दिसली. गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्यातून शर्वाय उतरला — त्याच्या हातात एक छोटसं box होता, आणि चेहऱ्यावर शांत हसू.

    आराध्या पायऱ्यांवरून धावत खाली आली. त्याने ते बॉक्स तिच्या हातात दिलं. “आपण वाड्याच्या मागच्या बागेत जाऊन बसू”

    बॉक्समध्ये तिच्यासाठी त्याने  मोत्याचा सर मागवला होता. जो तो तिला सकाळी देणार होता … पण सगळंच अचानक बदल्याने द्यायचं राहिलं.

    ती क्षणभर काही बोलू शकली नाही. फक्त त्याच्याकडे पाहात राहिली.

    शर्वाय पुढे आला, आणि हलकेच तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला —

    “माफ करशील  ना…?”

    “खरं सांगू, मला राग आलाच नव्हता आणि वाईटही नव्हतं वाटलं… मग तुम्ही माफी मागायचा प्रश्नच येत नाही… ” आराध्याने डोळे मिटून हलकेच मान हलवली.

    मग दोघंही वाड्याच्या मागच्या बागेकडे वळले… दोघांत आता पुन्हा एक नाजूक नवा बंध तयार होत होता.

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026 ललित

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026 ललित

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    By सुधीर करंदीकरNovember 20, 2026

    बरेच जण सकाळी फिरायला बाहेर पडतात, त्यावेळी सगळ्यांच्या एका हातात मोबाईल हा असतोच असतो. आधी…

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    अंजू

    November 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अन् शर्वायने माफी मागितली

    November 20, 2026

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.