Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?
    फिल्मी

    Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJuly 19, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Whiplash movie, व्हिप्लॅश चित्रपट, शिक्षक विद्यार्थी नाते, गुरू शिष्य परंपरा, जाझ ड्रमर अँड्र्यू नेमान, गुरू टेरेंस फ्लेचर, गुरू टेरेंस फ्लेचर शिष्य अँड्र्यू नेमान, कठोर गुरू टेरेंस फ्लेचर, दुखावलेला अँड्र्यू नेमान
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    Whiplash (व्हिप्लॅश) हा सिनेमा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यावर असला तरी, आपल्या आजपर्यंतच्या या नात्याच्या संकल्पनांना धक्का देणारा आहे. शिक्षकी पेशाभोवती परोपकार, सद्गुण आणि सत्शीलतेच वलय असतं, अपेक्षा असते. गुरू – शिष्याच्या नात्याला आपल्या संस्कृतीत परमोच्च स्थान आहे, गुरूला देव मानले आहे.

    जाझ ड्रमर अँड्र्यू नेमान या शिष्याची आणि टेरेंस फ्लेचर या गुरूची कथा आहे. नेमान 19 वर्षांचा मुलगा असून त्याने एका सुप्रसिद्ध संगीत विद्यालयात प्रवेश घेतला आहे. फ्लेचर हा तिथला सर्वात नावाजलेला प्रतिष्ठित शिक्षक. वाद्यवृंदाचे संयोजन करणारा कंडक्टर आहे. फ्लेचर एकदा अँड्र्यूला ड्रम वाजवताना ऐकतो आणि न आवडल्याने नाराजी दर्शवतो, पण पुन्हा त्याला आपल्या वाद्यवृंदात घेतो. मुख्य ड्रमर कार्ल वाजवू शकला नाही तर, तो याला संधी देणार असतो. या भेटीत अँड्र्यूला समजते की, फ्लेचर अतिशय कठोर शिक्षक आहे. तो अपशब्द वापरून अपमान करतो, एवढेच नव्हे तर, शारीरिक इजा पण करतो! त्याला लगेच प्रत्यय येतो. फ्लेचर त्याच्या दिशने खुर्ची फेकतो… एका मुलाला अपमानीत करून बाहेर काढतो…

    हेही वाचा – Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    अँड्र्यू नेमानला उत्कृष्ट ड्रमर व्हायचे आहे. त्यासाठी तो कुठलाही त्याग करायला तयार आहे. अगदी आपले कुटुंब आणि प्रेयसी सुद्धा! फ्लेचर त्याला डिवचतो, तेव्हा तो हात रक्ताळलेले होईपर्यंत ड्रम वाजवून प्रॅक्टिस करतो. फ्लेचर अहंकारी आहे, तो विद्यार्थ्यांना इतकं वाईटसाईट बोलतो, अपमानित करतो की, काही विद्यार्थी हे सहन करू शकत नाहीत. असाच एक विद्यार्थी अवहेलना सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या करतो. पण फ्लेचर मुलांना खोटे सांगतो की, त्याचा अपघाती मृत्यू झाला. फ्लेचर तीन ड्रमरना शीघ्र गतीने वाजवायला सांगतो, त्यात अँड्र्यू यशस्वी होतो. तर, स्पर्धेच्या वेळी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो कसाबसा तिथे वेळेत पोहोचतो रक्ताळलेल्या हातांनी ड्रम नीट वाजवू शकत नाही आणि फ्लेचर त्याला वाद्यवृंदातून काढून टाकतो. इथे अँड्र्यूचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि दोघांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना घडते.

    त्याला कॉलेजमधून काढून टाकले जाते… तो ड्रम वाजवणे बंद करतो. तो आत्महत्या केलेल्या मुलाच्या वकिलाला फ्लेचरविरुद्ध साक्ष देण्याचे कबूल करतो…

    फ्लेचर असे का वागतो? याचे कोडे शेवटी उलगडते. तो म्हणतो, जोपर्यंत विद्यार्थ्याला त्याच्या सर्व शक्ती पणाला लागेपर्यंत स्फूर्ती दिली जात नाही, तोपर्यंत त्याच्यातले सर्वोत्कृष्ट बाहेर येत नाही… मी हेच करत होतो. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, कारण सर्वोत्कृष्ट वादक तयार करणे, हे माझे कर्तव्य आहे. गुरुकूल परंपरेत गुरू शिष्याला कठोर परीक्षा द्यायला लावतात किंवा योद्ध्याला रथाचा सारथी! योद्ध्याला असेच अपमानास्पद बोलून चिडवत असे, जेणेकरून त्याने त्वेषाने लढावे. परंतु फ्लेचर स्फूर्ती देताना इतके विक्षिप्त वागतो की, त्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल खच्ची होते. वादकात आत्मविश्वास असलाच पाहिजे, यासाठी तो आग्रही असतो. म्हणून, तो सतत मुलांवर आरोप करत असतो. फ्लेचर माणुसकीच्या मापदंडात हीन दर्जाचा आहे; पण तो शिक्षकी पेशाच्या कसोटीत तसा नाही. तो विद्यार्थ्यांची सहनशक्ती अति ताणतो, तुटेपर्यंत ताणतो, पण तो दर्जेदार वादक तयार करत असतो.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    ही शिक्षकाची भूमिका आपल्याला चक्रावून टाकते. फ्लेचरचे वागणे एकीकडे पटत नाही आणि दुसरीकडे तो केवळ कर्तव्य करतो आहे, असे वाटत राहते. पण माणसाच्या जीवापेक्षा असे यश श्रेष्ठ आहे का? जीवन उरले नाही तर, ते यश तरी आहे का? फ्लेचरच्या अत्यंत कठोर परीक्षेला अँड्र्यू खरा उतरतो का? तो उत्कृष्ट ड्रमर होतो का? अप्रतिम वादन करतो का? फ्लेचरला अँड्र्यूमुळे नोकरी गेल्याचे कळते का? अँड्र्यूने केलेल्या अपमानाचा बदला तो घेतो का? या प्रश्नांची उत्तरे सिनेमा देतो. पण तरीही आपण जितका विचार करू तितके यात अडकत जातो. हा सिनेमा स्फूर्ती देणारा आहे, असे म्हटले तर, उत्कृष्ट कलाकार निर्माण करण्यासाठी इतका जीवघेणा मार्ग घ्यावा लागेल, असा अभिप्राय यातून निघतो; जो घातक आहे. जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन? हा आपल्याकडचा एक जुना वाद आहे. त्यावर अनेक मते मतांतरे आहेत. सिनेमा पाहताना हाच वाद मनाशी येत राहतो.

    अँड्र्यू आणि फ्लेचर दोन्हीची भूमिका करणारे नट कसलेले आहेत. दोघांची जणू जुगलबंदी आहे. अँड्र्यूज नायक आहे, पण फ्लेचर पूर्णतः खलनायक नाही; त्यात एक ग्रे छटा आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे खरे असेल तर टाकीचे घाव देणारा शिल्पकार खलनायक कसा? ही उपमा देताना माणूस म्हणजे निर्जीव दगड नाही, हेही विसरता येत नाही. असा सगळा अजब गुंता आहे!

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    July 19, 2026 फिल्मी

    कालातीत कलाकृती…

    July 14, 2026 फिल्मी

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    By विशाल कुलकर्णीJuly 19, 2026

    मुंबई हे शहर एखाद्या जुन्या, ढगांनी झाकलेल्या दीपस्तंभासारखे वाटते. दूरुन तेजस्वी, जवळ गेल्यावर गूढ, आणि…

    कालातीत कलाकृती…

    July 14, 2026

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें

    July 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जुलै 2026

    July 20, 2026

    Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    July 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 365
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 498
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 239
    • मैत्रीण 24
    • ललित 789
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.