Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नर्मदेSS हर हर.. माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडविणारा अनुभव

    August 16, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…
    फिल्मी

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीAugust 16, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, सदाबहार उमराव जान, उमराव जानमधील सदाबहार गाणी, उमराव जानमधील रेखाची अदा, उमराव जान रेखा, मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा, शहरयार यांचे जादुई शब्द, संगीतकार खय्याम, आशा भोसलेंचे स्वर्गीय स्वर, रेखा आणि फारुख शेख,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
    आवारगी मै हमने जमाने की सैर की।

    काबे में जा के भूल गया राह दैर की,
    ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की।

    बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दूचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदिरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्‍या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दू शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ–तांदूळ बांधून आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा चकितच झालो. ज्या कुणी शायराने हे लिहिलं होतं, “कमाल की उमदा चीज लिखी थी, फिर भी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था…”

    ‘काबे में जा के भूल गया राह दैर की’ इथपर्यंत ठीक होतं, पण ‘ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की’ या ओळी मला गोंधळात टाकत होत्या. मी थेट मौलवीसाहेबांना गाठलं…

    “चचाजान, मैं समझ नहीं पा रहा हूं, इतना उमदा कलाम लिखने वाला शख्स आखीर में इस तरहा, क्यों शिकायत कर रहा है? काबा जाकर मंदिर की, गिरिजाघर की राह भूल जाना मैं समझ सकता हूं, लेकिन ‘मंदिर या गिरजाघर में जाकर किसी का ईमान खराब हो जाये’ ये बात मुझ से हजम नहीं हो रही हैं…”

    हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!

    मौलवीसाहब हसले आणि हसून म्हणाले, “बेटेजी, जशी तुमची मराठी आहे ना, तशीच उर्दूही आहे. तुम्ही काढाल तितके अर्थ निघतात शब्दांतून… और यहां तो लिखने वाला एक बहोत ही उमदा शायर है। या ओळींचा अर्थ शब्दशः घेऊ नकोस रे! मंदिर किंवा गिरीजाघर हे इथे कवीने मूर्तीपूजा किंवा कर्मकांडाचे प्रतीक म्हणून वापरले आहे, तर ‘काबा’ हे ‘निराकार परमेशाचे’ स्वरूप म्हणून वापरले आहे. आता इथे लिहिणारा मुस्लीम आहे, त्यामुळे त्याने आपल्याला हवी तशी लिबर्टी घेतलीय एवढंच. त्याच्या जागी एखादा इतर धर्मीय शायर असता तर कदाचित शब्द वेगळे असते. पण जर अर्थच काढायचा झाला तर, सरसकट अर्थ असा आहे की, जेव्हा निराकार स्वरूपातील ईश्वराच्या पायावर लीन झालो, तेव्हा मला कर्मकांडातला, अवडंबरातला फोलपणा कळून चुकला. बरं झालं, नाहीतर भलतीकडेच भरकटत गेलो असतो.”

    “वाह, है कौन ये शायर? कोण, आहे तरी कोण हा शायर?”

    “बेटेजान, ये बात तो आजतक कोई दिल पर हाथ रख के बता नहीं पाया, क्योंकी कुछ लोग मानते हैं कि, ये एक ‘शायर’ का कलाम हैं, जहां कुछ लोग यह भी मानते है कि, ये एक ‘शायरा’ की नज्म हैं! लेकिन जहां तक मैं जानता हूं और मानता हूं, इस शायरा का असलीयत में कोई वजूद नहीं हैं. लेकिन शायर मियाँ ने जिस तरह से इस किरदार को शख्सियत दी हैं कि शायरी के दीवाने इस किरदार को भी सच मानते हैं! वे आज भी मानते हैं कि…

    ‘हां… उमराव जान असल में हुआ करती थी और ये उन्ही की नज्म के कुछ शेर हैं!’ ‘उमराव जान’ की गझलों में ‘अदा’ उनका तखल्लुस हुआ करता था’,

    मगर जहाँ तक मैं जानता हूं ‘उमराव जान’ ‘मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा’ साहब का सबसे खुबसूरत और ताकतवर शाहकार है! और जहाँ तक मेरा खयाल हैं, यह लाइनें भी मिर्झा हादी रुस्वासाहब की ही लिखी हुयी हैं. यह अलग बात हैं कि, उमराव के चाहने वाले आज भी इसे ‘उमराव जान’ की नज़्मही मानते हैं…”

    मी चाट पडलो. मी स्वतः ‘उमराव जान’ दोन-तीन वेळा पाहिला होता. त्यातली गाणी पुन्हा-पुन्हा वेड्यासारखी ऐकली होती. खरेतर, मी देखील तोपर्यंत असेच समजत होतो की, ‘उमराव जान’ हे पात्र सत्यकथेवरच आधारीत आहे. खरं खोटं मिर्जा हादीसाहेबच जाणोत, पण एवढी अर्थपूर्ण शायरी करणारा हा माणूस किती ग्रेट असेल!

    असो, फेसबुकवर पोस्ट केलेलं ‘उमराव जान’मधलं एक गाणं पाहिल्यानंतर हे सर्व आठवलं…

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें….

    जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें
    ये जमीं चाँद से बेहतर नजर आती हैं हमें

    सूर्ख फूलों से महक उठाती हैं दिल की राहें
    दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमें

    याद तेरी कभी दस्तक, कभी सरगोशी से
    रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमें

    हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों हैं
    अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमें

    ‘शहरयार’ साहेबांच्या लेखणीतून उतरलेले जादुई शब्द, त्याला खय्यामसाहेबांचा वेड लावणारा स्वरसाज. अजून काय हवं हो रसिकाला? शायर म्हणतो की – जिंदगी, हे आयुष्य जेव्हा जेव्हा मला तुझ्या सहवासाचा लाभ मिळवून देतं, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुझ्या सहवासात असतो तेव्हा ही धरती मला चंद्रापेक्षाही सुखकर वाटायला लागते!

    हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…

    या ओळी वाचल्या की मला राहून राहून ‘मोमीन’साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात…

    “तुम मेरे पास होते हो गोया जब, कोई दूसरा नहीं होता…”

    तसं तर ‘उमराव’ची सगळी गाणी अफाटच होती. मुळातच ‘शहरयार आणि खय्याम’ या दोन अल्लाहच्या माणसांनी या चित्रपटाच्या संगीताला खूप वरच्या स्थानावर नेऊन ठेवलं होतं, त्यात रेखाचं मादक सौंदर्य, अप्रतीम अदाकारी आणि आशाबाईंचे खुळावून टाकणारे स्वर! ‘उमराव जान’च्या संगीताने सगळे विक्रम तोडले नसते तरच नवल.

    पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या ‘तलत अझीज’ने आणि तो कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना!

    ‘सोने पें सुहागा’ म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ पाहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाच्या चेहर्‍यावरचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं, की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं, हेच कळत नाही.

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026 फिल्मी

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026 फिल्मी

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    By डॉ. अस्मिता हवालदारAugust 9, 2026

    ‘One Life’ हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रागमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. निकोलस विनटन…

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    शूटिंगच्या सेटवरील भाज्यांचं करतात काय?

    July 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    नर्मदेSS हर हर.. माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडविणारा अनुभव

    August 16, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 205
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 854
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    नर्मदेSS हर हर.. माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडविणारा अनुभव

    August 16, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.