Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण
    फिल्मी

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारAugust 9, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, English Movie, One Life, हिटलरचा मुलांवर अत्याचार, दुसऱ्या महायुद्धातील पीडित, प्रागमधील सत्य घटना, नायक निकोलस विनटन, लंडनचा स्टॉकब्रोकर निकोलस विनटन, 699 मुलांची सुटका, हिटलरचा मुलांवर अत्याचार, निकोलसला मित्रांची साथ, निकोलस विनटनची माणुसकी, निकोलस विनटनला आईची साथ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘One Life’ हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रागमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. निकोलस विनटन नावाचा लंडनमध्ये राहणारा स्टॉकब्रोकर प्रागमध्ये येतो, तेव्हा हिटलरच्या आक्रमणामुळे घाबरलेले लोक चेकोस्लोव्हाकियामधून निर्वासितांच्या छावण्यांत राहत असलेले तो पाहतो. लहान मुले थंडीत जिवंत राहणार नाहीत, या काळजीने तो आणखी तीन मित्रांबरोबर त्यांना मदत करायचे ठरवतो. या मुलांना इंग्लंडचा व्हिसा मिळवून देऊन लोकांना तात्पुरते दत्तक देण्याची योजना बनवतो. मुलांना ट्रेनमधून इंग्लंडला पाठवायचे आणि कुटुंबांना सांभाळायला द्यायचे. पण यात अनेक अडचणी असल्याने असंभव वाटत असते. निकोलसची आई त्याला सर्वतोपरी मदत करते… व्हिसा मिळवून देण्यापासून फोस्टर पॅरेन्टस मिळवून देण्यापर्यंत! निकी आणि त्याची टीम मिळून 669 मुलांना वाचवतात.

    हिटलरने पकडून नेलेल्या 15,000 मुलांपैकी फक्त 200 मुले जिवंत राहतात त्या तुलनेत 669 हा आकडा फार मोठा आहे. सरकारी यंत्रणा, मग ती इंग्लंडमधली का असेना, हलवणे मुश्किल. इथे निकीच्या आईचे कसब पणाला लागते. ती इंग्लिश अधिकाऱ्याला म्हणते, तीस वर्षांपूर्वी मी या देशात आले. या देशाने मला जी मूल्यं शिकवली, ती मी माझ्या मुलाला दिली; ज्याचा वापर तो आता प्रागमध्ये करतो आहे. तूही त्याच मूल्यांचा वापर करावास, एवढीच विनंती आहे. तो अधिकारी व्हिसा मिळवून देण्यापासून सर्व कामांत मदत करतो.

    सामान्य लोक मुले दत्तक घेतील, याबद्दल साशंक असलेली मुलगी निकीला विचारते, ’’तुझा सामान्य माणसांवर इतका विश्वास आहे?’’ त्यावर तो म्हणतो, “हो आहे, कारण मीही सामान्य आहे.” सामान्य माणसांनी माणुसकीच्या नात्याने उभारलेली फौज निष्ठूर शक्तिशाली हिटलरच्या पंज्यातून मुलांना वाचवते.

    हेही वाचा – Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    सिनेमाची सुरुवात वयस्क निकी आणि त्याच्या पत्नीच्या संवादातून होते. ती त्याला जुनी कागदपत्रे टाकून द्यायला सांगते. पण या मुलांचे फोटो, नावे आणि फोस्टर पॅरेन्टसची यादी असलेले स्क्रॅपबुक तो एका पत्रकाराकडे घेऊन जातो. तो त्याला छापायला नकार देतो. एक इतिहास संशोधिका याचे मूल्य ओळखते आणि ही कथा जगासमोर येते.

    जेव्हा ही आता मोठी झालेली मुले निकीला भेटतात, तो प्रसंग इतका हृद्य आहे की, डोळ्यांतून पाणी वाहू लागते. निकी आणि त्या मुलांच्या एकमेकांबद्दलच्या भावना शब्दातीत आहेत. निकोलसला आयुष्यभर एक दुख आहे – शेवटची अडीचशे मुलांची ट्रेन हिटलरच्या ताब्यात सापडली आणि मुले इंग्लंडला येऊ शकली नाहीत.

    हेही वाचा – Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    तो इतका साधा आहे की, त्याने काही फार मोठे काम केले आहे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे तो याबद्दल कोणाला सांगत नाही. या मुलांना कायम उत्सुकता असते की, त्यांना वाचवणारी व्यक्ती कोण आहे? प्रसिद्ध वर्तमानपत्राचा पत्रकार जे समजून घेऊ शकत नाही, ते टीव्हीवर एक दर्जाहीन पण लोकप्रिय कार्यक्रम करणारी निवेदिका समजून घेते.

    ‘Whoever saves one life saves entire world’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. एक आयुष्य इतकी आयुष्य वाचवते, तेव्हा ते अर्थपूर्ण होते… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण आहे. आयुष्य सार्थकी लावण्यासाठी दुसर्‍याच्या आयुष्याची किंमत करायला हवी… असे अर्थ यातून निघू शकतात. मला पु. ल. देशपांडे यांच्या एका वाक्याची आठवण झाली – ‘जीवन म्हणावे असे एखादेच आयुष्य असते.’

    तेच हे One life!

    मुख्य अभिनेता अँथनी होप्किंसचा अभिनय सहज सुंदर आहे. बाकीच्यांचा अभिनय भूमिकेला न्याय देणारा आहे. Prime वर हा सिनेमा उपलब्ध आहे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026 फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026 फिल्मी

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    By विशाल कुलकर्णीSeptember 20, 2026

    अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे…

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 942
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.