Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी
    ललित

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारSeptember 6, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता हवालदार, डॉ अस्मिता हवालदार, Bookshelf, नॉट विदाऊट माय डॉटर, बेट्टी महमूदीची सकारात्मक कहाणी, लेखिका बेट्टी महमूदी, इराणी डॉक्टर मूडी, बेट्टी महमूदी फसवणूक, डॉक्टर सय्यद बोझोर्ग महमूदी, अनुवाद लीना सोहोनी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन स्त्रीची कहाणी आहे. बेट्टी महमूदी या लेखिका आणि विल्यम हॉफर सहलेखक असून लीना सोहोनी यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. बेट्टीने अमेरिकेत राहणाऱ्या इराणी डॉक्टर सय्यद बोझोर्ग महमूदीशी (मूडी) विवाह केला आणि पाच वर्षांच्या मुलीला घेऊन ती त्याच्याबरोबर इराणला गेली, तेव्हा तिला पंधरा दिवसांनी अमेरिकेत परत जायचे आहे, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ती तिथे गेल्यावर कुटुंबाच्या नजरकैदेत राहिली. या संकटातून तिने अपरिमित धैर्य दाखवून वाट शोधली आणि स्वतःची सुटका करून घेतली. ही अशक्यप्राय वाटणारी घटना होती; कारण इराणमधले कायदे फार कडक होते.

    ती घटस्फोट घेऊन परत जाऊ शकत होती; पण मग तिला मुलीला इराणमध्येच सोडून जायला लागलं असतं… कारण मुले ही पतीची संपत्ती मानली जात होती. मुलीला सोडून जाण्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. इथे संघर्ष सुरू झाला! म्हणून या पुस्तकाचे नाव ‘नॉट विदाऊट माय डॉटर’!

    मूडी भूलतज्ज्ञ आणि अस्थीतज्ज्ञ होता. इराणमध्ये विमानतळावर उतरण्यापूर्वीच मूडीने, दोघींचे पासपोर्ट काढून घेतले. त्याच्या घरी गेल्यावर तिथली अस्वस्थता, ओंगळपणा पाहून तिला आणि मोहताबला (मुलीला) जीव नकोसा झाला. पण पंधरा दिवसांत परत जायचे आहे, या आशेवर त्या दिवस कंठत होत्या. मूडीच्या कुटुंबीयांना स्वच्छता, नीटनेटकेपणा वगैरे गोष्टींशी सोयरसुतक नव्हतं. अगदी भातातले पोरकिडे सुद्धा काढलेले नसायचे. झुरळांचा सुळसुळाट होता. घाणेरड्या न धुतलेल्या चादरी, अभ्रे असायचे. एक दिवस तिला कळून चुकलं की, तिला इथे कायमच राहावं लागणार आहे. तिची फसवणूक झाली आहे. स्त्रियांसाठी असणाऱ्या कडक कायद्यांचं पालन करावं लागणार आहे. तिचा नवरा पूर्ण बदलून गेला आहे… तिच्यावर आभाळ कोसळतं. पण ती ठरवते की, तीच स्वतःची मदत करणार आणि या नरकातून सुटका करून घेणार!

    नजरकैदेतून सर्वांची नजर चुकवून ती अमेरिकन दूतावासात जाते. तिथली अधिकारी स्त्री तिला सांगते, तू मुलीला सोडून एकटी परत जा. ती नकार देते, तेव्हा ती स्त्री सांगते की, दोघींना अमेरिकेला पाठवणे फार कठीण आहे. इराणी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे ती आता इराणी नागरिक झाली आहे आणि त्या कायद्यांचे पालन करावे लागेल. अशा बऱ्याच स्त्रिया अडकल्या आहेत, असेही ती सांगते. बेट्टीचा आई-वडील आणि पहिल्या नवऱ्यापासूनच्या मुलांशी संपर्क सुटलेला असतो. तरी आई आणि आजारी वडील आपल्या परीने प्रयत्न करत असतात. तिथल्या काही स्त्रिया आणि पुरुष सुद्धा तिला मदत करायला पुढे येतात; पण सतत भीती असते. मूडीला समजले तर तो मारून टाकेल, याची तिला खात्री असते. तो तिला मारहाण करत असतो, कोंडून ठेवतो. कुटुंबीय आणि परिचितांपैकी कोणीच तिला मूडीपासून वाचवत नाहीत.

    हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी

    शेवटी ती पळून जाण्यात यशस्वी होते. तिला काही चांगली माणसे भेटतात. पलायनाच्या आठवड्याची कहाणी विस्मयकारक आहे. इराण ते तुर्कस्तान प्रवासात तिने मृत्यूला आव्हान दिले. हा सर्वात अवघड मार्ग… कारण बर्फाळ पर्वतरांगा असलेली सीमा आहे. वाचताना सुद्धा भीती वाटते. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून जीव धोक्यात घालावा लागला – तिचा आणि मुलीचा सुद्धा! केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने हे घडले. लेखिका म्हणते, याच देशात मूडीसारखी वाईट माणसे भेटली आणि हमीद, अमाल, हेलनसारखी चांगली माणसे भेटली. माणसाचे चांगले-वाईट असणे देशावर नाही, केवळ त्या व्यक्तीवर अवलंबून असते. अमेरिकन नागरिक असूनही बेट्टीला मदत मिळायला इतका त्रास झाला. सरकारी यंत्रणा हलवणे सोपे नसतेच.

    पुस्तक वाचताना लेखिकेचे एक वाक्य मनात घर करून राहते – ‘स्वातंत्र्य अत्यंत मौल्यवान असते आणि त्याची खरी किंमत पारतंत्र्यात गेल्यावर कळते.’ व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या, स्त्री-पुरुषांना समान मानणाऱ्या देशात राहणाऱ्याला कदाचित त्याचं मोल लक्षात येणार नाही, पण अशा हृदयद्रावक कहाण्या वाचल्यावर आपल्या भाग्याची जाणीव होते. स्वातंत्र्य मूल्यवान असतं म्हणून ते झगडूनच मिळवावं लागतं, सहज कोणी हातात आणून देत नाही. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना?

    जगभरातल्या स्त्रियांनी अनेक वर्षं त्रास सहन केला आहे. त्यांना समान अधिकार मिळायला 20वे शतक उजाडावे लागले आणि हे प्रगत वाटणाऱ्या, व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या देशांत सुद्धा घडले. मग ज्यांनी आधुनिकता नाकारली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगावे? आजही काही स्त्रियांना हेच भोगावे लागत आहे.

    हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!

    दुसरी एक गोष्ट तितकीच मनावर ठसते – संकट कितीही भयंकर असो, त्यावर मात करण्यासाठी लढावे लागते. हार मानून चालत नाही. एकदा दृढनिश्चय केला की, मार्ग निघण्याची शक्यता वाढते. एक आई आपल्या मुलांसाठी निष्ठूर, बलाढ्य ताकदीशी लढू शकते… मनाची ताकद मोठी असते!

    लेखिकेने शेवटी लिहिले आहे की, तिला आणि तिच्या मुलीला मूडीपासून कायम धोका आहे. मोहताबला पळवून नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अर्थात, हे तितकेसे सोपे नाही. आता तर मोहताब मोठी झाली आहे. तिनेही एक पुस्तक लिहिले आहे. तिच्या मुलाखती युट्यूबवर आहेत.

    ही कहाणी वाचताना कित्येकदा डोळे भरून येत असले तरी, ही सकारात्मक कहाणी आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. यावर सिनेमा सुद्धा आहे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026 ललित

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026 ललित

    मैत्रीण

    September 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कलियुगातील श्रावणबाळ

    By सतीश बर्वेSeptember 7, 2026

    मला तो पहिल्यांदा भेटला मोरगावला. आलिशान मोटारीतून आला होता… बहुतेक आपल्या आजीला घेऊन. मला का…

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 424
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 569
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 902
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.