Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?

    June 29, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे

    June 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    June 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?
    ललित

    आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?

    शोभा भडकेBy शोभा भडकेJune 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, दिनकररावांची नाराजी, शिव आरू प्रेमकहाणी, पूर्वी पवन प्रेमकहाणी, शिव आरूचे देवदर्शन, घाबरलेली आरू शिवला बिलगली, शिवच्या प्रेमभावना, आरूला भावाची आठवण, आरूला रामची आठवण, संयमी शिव,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 32

    शिवने गाडी स्टार्ट केली आणि दोघे गावी निघाले. शिवच्या एकदम जवळ येण्याने आरू अर्थात आराधना घाबरली होती, त्यानंतर तिने त्याच्याकडे पाहिलच नाही… खिडकीतून बाहेर बघत राहिली… खिडकी उघडी होती त्यामुळे छान हवा येत होती. आराधनाला मोकळ्या हवेची सवय होती आणि तिला छानही वाटत होतं. शिव तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहात होता… ती बाहेर हात काढून हवेला जणू धरण्याचा प्रयत्न करतेय… तिच्या या निरागसपणावर गालातल्या गालात हसत होता.

    गाडीत एकदम शांतता होती. मघाशी ज्या प्रकारे तो जवळ आला होता, तसं पुन्हा होऊ नये म्हणून आरूने आता शांत राहणंच पसंत केलं. बाहेरच्या थंड हवेसोबत खेळत प्रवासाचा आनंद घेऊ लागली.

    “मी टीव्ही पाहात नाही जास्त… पाहिल्या तरी कधीतरी न्यूज बघतो, पण…” तिचं त्याला भाव न देता स्वतःमध्येच रमून जाणं न आवडून, शांतता भंग करत शिव बोलू लागला.

    अचानक आवाज आल्याने तिने वळून त्याच्याकडे पाहिलं, तर तोही ड्राइव्ह करत तिच्याकडे पाहात होता.

    “नाही… काही नाही असंच…” त्याच्या नजरेत पुन्हा तसेच भाव जाणवून काही तरी बोलायचं म्हणून आरू म्हणाली आणि बाहेर पाहू लागली.

    हेही वाचा – शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…

    “आराधनाssss”  तिचं इग्नोर करणं त्याला खटकलं आणि पुन्हा न राहवून त्याने आवाज दिला…

    “अं… गाणं लावा ना!” म्युझिक सिस्टीमकडे पाहात ती म्हणाली.

    तिला त्याचं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं, असंच तिच्या वागण्यावरून वाटत होतं. म्हणून शिव म्हणाला, “हं लावतो… पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे…”

    “तुम्हीं दिलं होतं का माझ्या प्रश्नाचं उत्तर? कसलं वाकडं तिकडं तोंड केलं होतं… मग आता मला कशाला विचारता काही… हे बघा मला माहितेय, तुम्ही नवरे लोक ना एकदा लग्न झालं की, बायकोला तुमची गुलाम समजता. तुम्ही म्हणाल तसं तिने वागलं पाहिजे… तुम्ही म्हणाल तसंच बोललं पाहिजे… आणि नाही ऐकलं की, मारायला पण कमी करत नाहीत. माझ्या एक-दोन मैत्रिणींना मी मार खाऊन माहेरी परत आलेलं पाहिलं आहे… आमच्या गावातला तो सुऱ्या पण त्याच्या बायकोला असंच मारतो, काम नाही केलं की… पण मी त्या मुलींसारखी अजिबात नाही, चुपचाप सगळ सहन करणारी!  त्यामुळे मला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसलं तर देणारच नाही!”

    आरू एकदमात सगळं बोलून गेली आणि लगेच मान वळवून घेत बाहेर पाहू लागली… सोबत हाताची चुळबूळ करू लागली. श्वास एकदम फुलले तिचे… भीतीने अंगाची थरथर देखील वाढली होती…

    मनात आलेल्या गोष्टी… लग्नानंतर मैत्रिणींकडून सासरच्या लोकांबद्दल ऐकलेलं… नवरा कसा वागतो, अरेरावी करतो… त्यांना किती काय काय सहन करावं लागतं… हे ऐकूनच खरंतर तिच्या मनात लग्नाबद्दल भीती होती. सोबत असं काही जर आपल्यासोबत घडलं तर? तर आपण अजिबात सहन नाही करायचं… असाच ती विचार करायची.

    जेव्हा शिवने परत विचारलं, तेव्हा तिला वाटलं की, तिने उत्तर दिलं नाही याचा त्याला राग आला आणि आता तो तिला परत धाक दाखवून विचारतोय… म्हणूनच तिला वाटलेलं सगळं बोलून ती रिकामी झाली. पण आता तिला भीती वाटत होती की, खरंच शिवला राग आला आणि रागाच्या भरात मारलं तर? गाडीतून मधेच खाली उतरवलं तर? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, मी असं बोललेय म्हणून दादाला फोन करून सांगितलं, आई आणि भाऊंना बोलले तर?

    …तर आणि तर… बस हेच तिच्या मनात सुरू होतं. बोलून तर गेली होती, पण आता त्याच्याकडे बघायचीही हिंमत तिच्यात नव्हती.

    आणि शिव… शिवला तर समजायलाच किती वेळ लागला असेल काय माहीत! कारण तेवढ्या वेळात आरू इतकं सगळं बोलून मोकळी झाली होती.

    पण अचानक गाडीला ब्रेक लागला… आरू बेसावध असल्याने पुढे अदळणार तोच शिवने पुढे होऊन तिला धरून स्वतःकडे ओढलं… तिने सीटबेल्ट लावला नव्हता… आणि शिवच्याही ते लक्षात आल नव्हतं.

    “आह…” घाबरून आरूच्या तोंडातून शब्द निघाला.

    त्याने स्वतःकडे ओढल्यामुळे ती डायरेक्ट शिवच्या मिठीत गेली… तिचा चेहरा त्याच्या छातीवर दबला गेला… त्याने एका हाताने पकडून तिच्या डोक्यावरून हात फिरवला… कारण ती खूप जास्त घाबरली  होती… एखादं पिल्लू जसं आईला बिलगून जातं, तशी ती त्याला चिटकली होती… श्वासांची गती खूप जास्त वाढली होती… सोबत तिच्या ओठांची देखील थरथर होत होती… त्यामुळे त्याचं मन विचलित झालं होतं…

    पण तिच्या शरीराची हालचाल त्याला जाणीव करून देत होती की, ती खूप जास्त घाबरली आहे आणि आत्ता तिला धीर देण्याची, ती सेफ आहे याची जाणीव करून देण्याची गरज आहे… तसं त्याने हळुवारपणे तिच्या डोक्यावरून, पाठीवरून मायेने हात फिरवायला सुरुवात केली… त्याचा धीर देणारा आणि आश्वासक स्पर्श जाणवून तिही हळूहळू शांत होऊ लागली… काही वेळानंतर तिची थरथर कमी झाली आणि ती आता नॉर्मल झाली आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

    पण ती अजूनही त्याच्यापासून बाजूला झाली नाही. उलट त्याच्या अजून जवळ जात ती त्याला जास्त बिलगून गेली… शिवसाठी मात्र तिच हे वागणं अनपेक्षित होतं. तिचं असं स्वतःहून जवळ येण्याने त्याचेही हार्ट बिट्स वाढत चालले होते… त्याला स्वतः कंट्रोल करणं आता कठीण झाल होतं.

    “नाही… शिव आवर स्वतःला! ती सध्या घाबरली आहे म्हणूण तुझ्याजवळ आलीय… तिच्या कदाचित लक्षातही नाही आलेलं की, ती तुझ्या इतक्या जवळ आहे ते! सावर स्वतःला आणि तिलाही…” त्याचं मन त्याला म्हणालं आणि त्याने दीर्घ श्वास घेत श्वासांची गती कमी करण्याचा प्रयत्न केला…

    हेही वाचा – आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    “आ… आरू… आराधना…” शिवने नकळतपणे तिला आरू म्हणून आवाज दिला. पण त्याच्या ‘आरू’ म्हणण्याने आरू त्याला आणखीन बिलगली. जणू तिला त्याला सोडायचंच नाही! त्याच्या धीर देणाऱ्या आणि आश्वासक स्पर्शाला, रामचा स्पर्श समजून, त्याला  डोळे मिटून बिलगून होती. त्याने जेव्हा ‘आरू’ म्हणून आवाज दिला, तिला असं वाटलं जणू रामच तिच्या डोक्यावरून हात फिरवत, तिला प्रेमाने आवाज देतोय…

    आपल्या मिठीत तिला कायम सेफ फिल करवून देणारा प्रेमळ आणि तिच्या प्रति नेहमी काळजी करणाऱ्या भावाचा तिला भास झाला आणि ती जास्त जास्त त्याला बिलगत गेली… आयुष्यात पहिल्यांदाच तिचा दादा तिच्यावर रागावला होता आणि तिच्यासोबत बोलत नव्हता… तिला त्याची खूप खूप आठवण येत होती… शिवने तिला जवळ घेतलं, तेव्हा तिला शिवच्या स्पर्शातून मी आहे तुझ्यासोबत… घाबरण्याची गरज नाही… हे जाणवलं… तर, त्याला बिलगून आरू जणू रामला सांगत होती, तू कितीही रागव माझ्यावर, मी रागवूच देणार नाही.

    शिवने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत “आराधना” म्हणून आवाज दिला… आपल्या भावाच्या आठवणीत हरवून गेलेली आरू… ‘आराधना’ ऐकून क्षणात भानावर आली आणि तिने डोळे उघडले, पण अजूनही बाजूला झाली नव्हती ती…

    क्रमशः
    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    June 28, 2026 ललित

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026 ललित

    मारवाडी…

    June 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    By सतीश बर्वेJune 28, 2026

    आज तो इथून जाणार याचा आनंद व्यक्त करायचा की उद्यापासून तो नसणार याचं दुःख व्यक्त…

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?

    June 29, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे

    June 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    June 29, 2026

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    June 28, 2026

    सलग 131 डॉट बॉल्स…

    June 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 343
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 471
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 743
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?

    June 29, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे

    June 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जून 2026

    June 29, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.