Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न
    ललित

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलAugust 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, हेकेखोर सासू पारूबाई, उमाची सासू पारूबाई, उमाचे माहेरपण, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, उमा आणि अनघा मामी, उमा मामी मैत्रिणी, उमा अनघा मैत्रिणी
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 8

    उमा माहेरी आलेली आहे. तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवतील की नाही, याबाबत काकी साशंक आहे…

    “मग मी आता परत जातच नाही बाळंतपण होईपर्यंत. मग काय करतील आत्याबाई?” उमा म्हणाली.

    “असं वेड्यासारखं का बोलतेस? त्यांनी दोन दिवस तुला बरं वाटावं म्हणून पाठवलंय ना. तू जर हट्टीपणा करून परत गेली नाहीस, तर महेशरावांना ते आवडणार नाही, याचा विचार केला आहेस का?” बाबांनी आपले म्हणणे सांगितले.

    रात्री भिंतीकडे तोंड फिरवून झोपलेला नवरा तिच्या नजरेसमोर आला. आपण एक वाक्य बोललो, तर त्यांना इतका राग आला, मग असे वागलो तर कायमची माहेरीच रहा, असे म्हणायला ते कमी करणार नाहीत, असे तिला वाटले. तिचा चेहरा झर्रकन उतरला. आईच्या लक्षात ही गोष्ट आली, पण सगळ्यांसमोर ती काहीच बोलली नाही.

    जेवणे आटोपून मागली आवराआवर झाल्यावर आई तिच्या खाटेजवळ आली.

    “झोपली न्हाईस पोरी अजून? काय झोप लागंना का?” या आईने विचारलेल्या प्रश्नावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली.

    “कसला एवढा इचार करतीयास? आल्यापासून बगतीया मी. तिकडं समदं ठीक हाय ना? जावयबापू काळजी घेतेती ना?” आईने विचारले.

    तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी पाहून उमा चपापली. आपल्या गप्प बसण्याचा वेगळाच अर्थ निघू शकतो, हे तिच्या ध्यानात आले नव्हते.

    “सगळं ठीक आहे गं. दोन दिवस जरा धावपळ झाली ना, त्यामुळे थकवा आलाय जरासा. जावईबापू अगदी व्यवस्थित काळजी घेतात…” हे ऐकून आईने निःश्वास सोडला.

    हेही वाचा – उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    आईपाशी मन मोकळे करावे, तर तिला काळजी लागून राहील म्हणून तिने या विषयावर आईशी बोलणे टाळले; पण तो प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. त्याचे उत्तर कुणाकडून मिळेल याचे कोडे तिला पडले होते.

    दुसऱ्या दिवशी सकाळी दारात फटफटीचा आवाज आला तशी आई म्हणाली,

    “मामा आन् मामी आली वाटतं.” हे ऐकून उमाला आनंद झाला.  ती बाहेर आली तेव्हा मामी गाडीवरून उतरत होती.

    “मामी, तुम्ही? तुम्हाला कसं कळलं मी आलेय ते?” हे ऐकून मामी गाल्यातल्या गालात हसल्या.

    “कळलं असंच. वाऱ्यानं बातमी पोहोचवली…” यावर उमा हसली. जवळ आलेल्या अनघा मामींनी तिला आपल्या मिठीत घेतले. तीही प्रेमाने त्यांच्या कुशीत शिरली.

    आत गेल्यावर दोघींचा चिवचिवाट सुरू झाला. मामाचे लग्न झाले तेव्हापासूनच तिच्यात अन् मामीत सख्य जुळले होते. तिच्या लग्नाची सगळी खरेदी करायला तिला मामी सोबत लागायची. मामीचा सल्ला घेऊनच तिने आपल्या लग्नाच्या साड्या खरेदी केल्या होत्या. तिच्यासोबत पाठराखीण म्हणून मामीच राहिली होती. त्यामुळे सर्वांपेक्षा मामीच तिच्या सासरच्या माणसांना ओळखायची.

    बोलता बोलता मामीने पिशवीतून लाटी वडी, अळूची वडी, चपात्या काढल्या. एका डिशमध्ये काढून उमाच्या समोर ठेवले.

    “अय्या, मामी अळूची वडी?” असे म्हणत उमाने त्यातील एक वडी उचलून पटकन तोंडात टाकली. त्यातील वाटलेल्या हिरव्या मिरचीची चव तिच्या जीभेवर पसरली. न राहवून तिने अजून दोन वड्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या.

    “मामी, मस्त झाली आहे वडी.” हे ऐकून मामीही सुखावली.

    “मामा, मामीला राहूदे आजचा दिवस…” तिने फर्मान सोडले. मामाने हसतच बायकोकडे पाहिले आणि म्हणाला, “तुझी मामी कापडं घेऊनच आली या संगट.  तिला बी राह्याचं हुतं.”

    हेही वाचा – उमाच्या मनात नवी शंका

    दोघीही हसल्या. मामी नणंदेला स्वयंपाकात मदत करायला आत शिरली. उमा बाहेर मोगऱ्याच्या वेलापाशी आली. मोगऱ्याची फुले तोडत असताना तिला दोन पानांमधून हळूच डोकावत असलेली एक नाजूक कळी दिसली. फुले तोडता तोडता ती थबकली.

    ती कळी वाऱ्यावर हळूवारपणे डोलत होती. तिला फूल म्हणून या जगात जन्म घ्यायला अजून वेळ होता, पण कळीच्या रूपात ती जिवंत होती. तिने अलगद आपल्या पोटावर हात फिरवला. पोटातील बाळाची जाणीव होऊन तिचे अंग शहारले. ‘काय असेल पोटात? मुलगा की मुलगी?’ असा प्रश्न मनात येताच ती चमकली.

    क्रमशः

    असा प्रश्न तिच्या मनात का आला असावा? तिच्या मनाची चाललेली घालमेल आणि तो प्रश्न याचा काही संबंध आहे का? हे पाहूया पुढील भागात…

    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026 ललित

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026 ललित

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शार्वीची वेगळी खेळी

    By Team AvaantarAugust 13, 2026

    पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 10 पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचं त्याच्यावर…

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सुधीरचे वास्तव अन् जुई!

    August 12, 2026

    एआयच्या पलीकडे…

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 394
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 531
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 847
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.