Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उमाच्या मनात नवी शंका
    ललित

    उमाच्या मनात नवी शंका

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलAugust 6, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, उमाचा सासुरवास, हेकेखोर सासू पारूबाई, सासू पारूबाई सून उमा, उमाचे माहेरपण, उमाचे चक्कर येणे, उमा गेली माहेरी, उमाच्या मनात शंका, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण
    फोटो सौजन्य- - चॅटदीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 7

    दोन दिवस माहेरी जा, असे पारूबाई म्हणाल्या खऱ्या, पण उमाला आपल्या सासूबाईंच्या वागण्यातील बदल पाहून आश्चर्य वाटले. रात्री उशिरा जेव्हा महेशराव झोपायला खोलीत आले तेव्हा ती जागीच होती. आत्याबाईंनी माहेरी जा, असे सांगितल्याचे तिने महेशरावांना सांगितले.

    “जा की मग. दोन दिवस जरा बदल होईल.”

    “हो, पण घरात एवढे पाहुणे आलेत आणि मी माहेरी निघून जायचे हे बरे दिसत नाही ना.” उमा म्हणाली.

    “आईने सांगितले आहे ना, मग मागची काळजी तू करू नकोस. ती बघून घेईल,” हे ऐकूनही उमाच्या मनाची रूखरूख कमी झाली नव्हती.

    “माझ्या पोटात घराण्याचा वंशज वाढतोय म्हणून अलिकडे आत्याबाईंच्या वागण्यात बदल झाला आहे, असे मला राहून राहून वाटते.” उमाने शेवटी मनातले ओठांवर आणलेच.

    ते ऐकून महेशराव चिडले.

    “या बायकांना कसंही असलं तरी त्यात काय खोट आहे, हेच शोधायचं असतं. वागतेय ना ती  चांगली, मग बाकीचा विचार कशाला करायचा? झोप आता मुकाट्यानं अन् मला पण झोपू दे. मला शाळेत जायचंय उद्या.” असे म्हणत भिंतीकडे तोंड करून ते झोपले. उमाला मात्र बराच वेळ झोप लागली नाही.

    हेही वाचा – उमाला आलं होतं टेन्शन…

    सकाळी लवकर उठून तिने महेशरावांचा डबा बनवला. चहाचे पातेले चुलीवर ठेवले. “न्याहरीला काय बनवायचे?” असे आत्याबाईंना विचारले.

    “त्या करंड्यात हाय की, शिल्लक कानावलं, लाडू अन् सजुऱ्या. त्येच खातील समदी. तुझं आटापलं की, आपलं निघा येरवाळीच. पावन्यास्नी पन दे च्या बरूबर कानावलं.”

    चहा पिऊन झाला की, ती काकीसोबत निघाली. प्रवासात काकी तिला काय काय प्रश्न विचारत होती, त्याची उमा तेवढ्यापुरती उत्तरे देत होती, अन् परत गप्प होत होती. तिला जो प्रश्न पडला होता, त्याचे उत्तर आपल्याला बाळंतपणानंतरच मिळेल, असे तिला वाटत होते.

    माहेरी गेल्यावर तिला पाहून आईला खूप आनंद झाला. लेकीकडे भरल्या नजरेने पाहतच तिने तिच्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकला आणि तिला घरात घेतले. तिच्याकडे समाधानाने बघत आईने तिची चौकशी करणे सुरू केले. माहेरी गेल्यावर तिच्या चित्तवृत्तीत बदल झाला. ती घरभर फुलपाखरासारखी स्वच्छंदपणे बागडू लागली. मागच्या दाराला जाऊन पेरूच्या झाडाकडे तिने एक कटाक्ष टाकला.  तिला तयार झालेला पेरू दिसला, तिने दाद्याला हाक मारली.

    दाद्याने आकडीने चार रशरशीत पेरू काढले आणि तिच्यासमोर ठेवले. तेवढ्यात काकी मागच्या अंगणात आली.

    “लै पेरू खाऊ नगंस. पित्त खवाळलं तर परत चक्कर बिक्कर यील.” आईच्या तीक्ष्ण कानांनी हे ऐकले.

    “परत म्हणजे काय गं सुमे? हिला चक्कर आली हुती?”

    आता खरे सांगितल्यावाचून पर्याय नव्हता. तेव्हा तिने काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला आणि त्यामुळे विहिणबाईंनी उमाला दोन दिवस माहेरी पाठवले आहे, हेही सांगितले. आईच्या डोळ्यात उमटलेली काळजी पाहून उमा म्हणाली,

    “काय नाही गं, दोन दिवस जरा शाळेत पण जनगणनेचे काम होते, अन् घरात पण काम जास्त पडले. त्यामुळे चक्कर आली होती. आम्ही दोघं गेल्या आठवड्यातच डॉक्टरांकडे चेकअपला जाऊन आलोय. सातव्या महिन्यातील सोनोग्राफी केलीय. बाळाची वाढ, वजन सगळे व्यवस्थित आहे…” हे ऐकून तिला बरे वाटले.

    उमा आलेली कळताच वाड्यातल्या, गावातल्या तिच्या मैत्रिणी गोळा झाल्या. त्यांच्याशी गप्पा मारण्यात दिवस कसा निघून गेला, हे तिला कळले नाही. तिला आता खूप मोकळे मोकळे वाटत होते. बरं झालं आत्याबाईंनी माहेरी पाठवलं असं तिला वाटलं.

    आईनं रात्री तिला आवडते म्हणून हरभऱ्याची ओली भाजी केली होती. तेवढ्यासाठी आईने शेतात जाऊन भाजी खुडून आणली होती ‌पुढ्यातील भाजी पाहून ती चित्कारली,

    “घोलाना? आन् पावट्याची आमटी? मला तूप वाढ पावट्याच्या आमटीत.”

    हेही वाचा – उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    “तुला तूप कधीपासून आवडायला लागलं?” आईने तूप वाढताना विचारले.

    “आत्या रोज आमटीत तूप घ्यायला लावतात. आता चार महिने झाले रोज तूप खायची सवय लागली आहे.”

    “सासूबाई चांगलीच काळजी घेतेती की मग! बाळंतपणाला माहेरी धाडणार आहेत ना?” आईने विचारले.

    “त्यांनी नाही पाठवले तरी मी येणारच,” उमा म्हणाली.

    “का पाठवणार नाहीत? पैलं बाळंतपण माहेरीच असतं, हे काय त्यांना माहीत नाही का?” एवढा वेळ त्यांची चर्चा शांतपणे ऐकणारे आबा जेवता जेवता म्हणाले.

    “बघा, नायतर आता दोन दिस पाटीवलंय, बाळातपण तिकडचं करतो म्हणायची,” सुमी काकी म्हणाली.

    हे ऐकून आता उमाच्या मनात वेगळीच चिंता निर्माण झाली.

    क्रमशः

    खरंच तिच्या सासूबाई तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवणार नाहीत का? पाहूया पुढील भागात…

    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026 ललित

    वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!

    August 5, 2026 ललित

    विकेट

    August 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    By तृप्ती देवAugust 6, 2026

    “अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी…

    वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!

    August 5, 2026

    विकेट

    August 4, 2026

    अफवा आणि सत्य

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    वास्तव… जुईला कळली स्वप्नीलची तडजोड!

    August 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 386
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 521
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 245
    • मैत्रीण 24
    • ललित 831
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.