Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    August 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!
    अध्यात्म

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 27, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, आद्य शंकराचार्यांची गस्त, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 1

    एकदा शांतपणे या चराचर सृष्टीकडे पाहा! अगम्य आहे ही सृष्टी! इथे आपल्याला नानाविध रूपे रंग आणि विविध आकार दिसतील. परंतु या प्रचंड विविधतेच्या मागे एकच सत्य दडलेले आहे, हे सांगण्यासाठी साक्षात भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण भारतवर्षाची पदयात्रा केली. जी गस्त म्हणून प्रसिद्ध आहे.

    शंकराचार्यांनी सुप्तावस्थेत असलेल्या मानवी चेतनेला जागे करण्याची ती एक फार फार  मोठी आध्यात्मिक जागरणाची धडपड केली होती. आज सर्व धर्मांमध्ये त्यांचे तत्त्वज्ञान अंतिम मानले जाते. अनेक संत त्यांनी जन्माला घातले. अगदी शम्स, रूमी सारखे परधर्मातील संतदेखील आचार्य शंकराचार्य यांच्या तत्वज्ञानातून संतपदाला पोहोचले. अशी किती उदाहरणे द्यावीत?

    कदाचित, आपल्याला शंकराचार्य जर समजले ना, तर आपल्याला पूर्ण अध्यात्म समजले, हे ठामपणाने आपण सांगू शकतो आणि शंकराचार्यांचे सगळे ज्ञान हे उपनिषदांच्या आधारे आहे. पण उपनिषदे कोणी वाचलीच नव्हती. खऱ्या अर्थाने जेवढे मला समजते त्यावरून मी सांगू शकतो की, शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्माला आकार दिला. त्याआधी अद्वैत तत्वज्ञान आपले ऋषीमुनी वगळता कोणालाही ठाऊक नव्हते. शंकराचार्यांनी अज्ञानाचा पडदा दूर केला. त्यासाठी प्रसंगी वादविवाद केले. संपूर्ण भारताचे भ्रमण केले. अनेक विद्वानांशी चर्चा केल्या.

    आचार्यांनी पाहिले की, लोक फक्त बाह्य अवडंबरात अडकलेत. भगवी वस्त्रे घातली म्हणजे कोणी कधी साधू होत नसते, तरीही असेच साधूसंत फार वाढले आहेत. आचार्य शंकराचार्यांनी स्पष्ट केले की –

    “ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तोच खरा साधक असतो.”  हाच विचार तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी आणि अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञान दिले.

    यथा दीपेन दृश्यन्ते

    रूपाणि विविधानि च।

    विना विचारं तद्वद्धि

    ज्ञानं नैव प्रजायते॥

    – गीताव्रत

    आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलो, तर तिथे असलेल्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत. तिथे एखादा सोन्याचा दागिना असेल तर, तोही दिसणार नाही किंवा एखादा विषारी साप असेल तरी, जोपर्यंत तिथे प्रकाश पडत नाही, तोपर्यंत आपल्याला तो सापही दिसणार नाही. म्हणजे प्रकाशाशिवाय सत्याचे ज्ञान होत नाही. अंधारामध्ये कधी दोरीला साप समजूनही मनुष्य घाबरून जातो आणि जिवाच्या आकांताने पळत सुटतो. त्याच्या मनात निर्माण झालेली भीती तर, अगदी खरी असते आणि त्या भीतीमुळे त्याच्या शरीराला दरदरून घामही फुटतो. पण जेव्हा कोणीतरी तिथे दिवा घेऊन येतो आणि लख्ख प्रकाश पडतो, तेव्हा त्या माणसाला समजते की, तिथे साप कधीच नव्हता, ती तर केवळ एक दोरीच होती. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, दिव्याच्या प्रकाशाने सापाला घालवले, मारलेले नाही! तर, प्रकाशाने केवळ अज्ञान दूर केले आहे आणि जे सत्य होते, ते उजेडात आणले.

    अगदी त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीवर अज्ञानाचा, जो अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा ज्ञानग्रहण न करण्याच्या आपल्या प्रयत्नामुळे अंध:कार पसरलेला असतो. हा अंधकार दूर करायचा असेल आणि प्रकाश ज्याला संत मुक्ताई, “उजेडी राहीन उजेड होऊन…” असं ‘उजेड’ असे संबोधतात, तो जर हवा असेल तर विवेकाचा दिवा चेतवावा लागतो. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.

    कर्मकांड करून मन एकाग्र होईल, समाधान वाटेल, पण खरे ज्ञान मिळत नाही. त्यासाठी विचारांची नितांत आवश्यकता असते. विचार म्हणजे तर्क नव्हे, तर मी कोण आहे? हे जग काय आहे? आणि माझे या जगातील अस्तित्व काय आणि कसे आहे? आणि माझ्या जन्म घेण्याचा उद्देश काय? या प्रश्नांचा अत्यंत खोलवर शोध घेणे म्हणजे ज्ञान, म्हणजे उजेड होय!

    हेही वाचा – रामरक्षेचे चिलखत

    असे म्हणतात, समुद्रात जसजसे खोल जावे, तसतसे मौल्यवान मोती सापडतात. तसे विचारांच्या मंथनातूनच ज्ञानाचे नवनीत बाहेर पडते. जसा दिवा अंधारातील वस्तूंना प्रकाशित करतो, तसा विचार आपल्या अंतर्यामी लपलेल्या खऱ्या स्वरूपाला प्रकाशित करतो. जोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत उत्तरे मिळण्याची प्रक्रिया सुरूच होत नाही. म्हणून शंकराचार्यांनी विचाराला आणि चिंतनाला ज्ञानाचे एकमेव साधन मानले आहे.

    अज्ञाननिर्मितं सर्वं

    ज्ञानेन प्रविलीयते।

    स्वच्छे मनसि संशुद्धे

    ब्रह्मज्ञानं प्रकाशते॥

    – गीताव्रत

    आपल्याला जीवनात जे काही दुःख भीती किंवा आसक्ती वाटते आहे, त्याचे मूळ केवळ आणि केवळ अज्ञानात आहे. आपण वर दोरी आणि सापाचे उदाहरण पाहिले. हे अध्यात्मातले सर्वश्रेष्ठ उदाहरण असल्यामुळे ते वारंवार आपण विचारात घेतले पाहिजे. तो साप कुठून आला? तो साप बाहेरून नाही आला, तर तो आपल्या अज्ञानातून निर्माण झाला होता. जसा तिथे प्रकाश येतो तसा तो साप विरून जातो; कारण तो मुळात तिथे नव्हताच. हे संपूर्ण जग आणि त्यातील मी आणि तू हे जे द्वैत आपल्याला दिसते, ते सर्वस्वी अज्ञाननिर्मित आहे. जेव्हा खऱ्या ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा हे द्वैत विरून जाते आणि सर्वत्र एकच चैतन्य भरून राहिलेले आहे, याची प्रचिती येते. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, हे ज्ञान कोठे प्रकट होते? त्यासाठी आपले मन अगदी आरशासारखे स्पष्ट दिसणारे प्रकाशाचे परिवर्तन करणारे, जे जसे स्पष्ट आहे, ते ते तसेच्या तसे दाखवणारे स्वच्छ हवे असते. आरसा जर धुळीने माखलेला असेल तर त्यात आपले प्रतिबिंब कधीच स्पष्ट दिसत नाही. आपण दररोज अंघोळ करून बाह्य शरीराची स्वच्छता अत्यंत काळजीपूर्वक राखतो पण आपल्या मनावर साचलेली वासना, क्रोध आणि मत्सर यांची धूळ झटकणे आपण सोयीस्करपणे विसरतो.

    एका जुन्या कथेनुसार, एका राजाने दोन चित्रकारांना समोरासमोर भिंतीवर चित्र काढायला सांगितले. मधे एक पडदा होता. एका चित्रकाराने अतिशय सुंदर चित्र काढले. दुसऱ्या चित्रकाराने मात्र चित्र काढण्याऐवजी ती भिंत घासून घासून इतकी लख्ख केली की, ती आरशासारखी चमकू लागली. जेव्हा मधला पडदा काढला तेव्हा पहिल्या चित्रकाराचे सुंदर चित्र दुसऱ्या भिंतीवर जसेच्या तसे प्रतिबिंबित झाले आणि ते अधिकच जिवंत वाटू लागले. आपले मनही त्या दुसऱ्या भिंतीसारखे आहे. जेव्हा ते विचारांच्या, अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या साधनेने पूर्णपणे शुद्ध होते, तेव्हा त्यात परमज्ञान आपोआप प्रकट होते.

    ते ज्ञान कुठे बाहेरून येत नाही. हे ज्ञान केवळ अनुभवाने आणि अनुभूतीने मिळते, असे अध्यात्म सांगते. कारण आपण माहिती तर गोळा करू शकतो, थेरॉटिकल ज्ञान घेऊ शकतो, पण प्रयत्न करून ते ज्ञान आपले आपल्यालाच मिळवावे लागते. कारण ते अनुभवाने मिळते. कारण ते आपण केलेल्या ध्यानातून आणि मिळालेल्या दृष्टांतातून मिळते. जे ज्ञान आपल्याला प्राप्त करायचे आहे, ते तर आपल्या चिंतनातूनच मिळणार असते. ते आपल्यातच असते, पण फक्त ते आपल्याच अज्ञानाच्या धुळीने झाकलेले असते.

    आत्मा न गृह्यते केन

    नापि त्याज्यः कथंचन।

    स्वीकारं वा निराकारं

    न करोति स तत्त्वतः॥

    – गीताव्रत

    खरे ज्ञान म्हणजे नेमके काय, हे समजून घेताना आत्मानुभवाकडे वळले पाहिजे. आपला आत्मा हा असा आहे की, त्याला कोणीही स्वीकारू शकत नाही आणि त्याला कोणीही नाकारूही शकत नाही. या जगात शरीर येते आणि जाते, अनेक प्रकारचे विचार येतात आणि जातात, सुखदुःखाच्या लाटा येतात आणि विरून जातात; पण जो या सर्वांचा केवळ साक्षीदार आहे, तो आत्मा अचल आणि स्थिर आहे. आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा स्वीकार करू, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी होती आणि आता आपण तिला जवळ करत आहोत. पण आत्मा तर सर्वव्यापी आहे, तोच मुळात सगळीकडे भरून राहिलेला आहे. मग तो कशाला स्वीकारणार आणि कशाला नाकारणार? तो स्वतःलाही नाकारू शकत नाही, कारण नाकारणारा सुद्धा तोच असतो.

    जसे एखाद्या माठामध्ये आकाश दिसत असते. आपण तो माठ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, पण आपण त्या आकाशाला नाकारू शकत नाही. माठ हलवू शकतो. अगदी माठ फुटला तरी आकाशाला धक्का पोहोचत नाही, आकाशावर काहीच फरक पडत नाही.

    आपला आत्मा हा त्या आकाशासारखा आहे. हे जे निर्विकार अस्तित्व आहे, तेच खरे ज्ञान आहे. जगातील इतर सर्व भौतिक गोष्टी आपण स्वीकारू किंवा नाकारू शकू, पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी आपण काहीही तडजोड करू शकत नाही. हे तत्व एकदा का नीट समजले की, माणसाचे अर्ध्याहून अधिक कष्ट आणि दुःख तिथेच संपतात, कारण मग तो बदलणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही. तर, न बदलणाऱ्या सत्यावर आपली निष्ठा ठेवतो.

    न सत्यात् पावकं किञ्चिद्

    गुह्यं वेदेषु गीयते।

    असंयताय नो देयं

    दातव्यं शुचये सदा॥

    – गीताव्रत

    सत्यज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काहीही नाही. ते ज्ञान सर्व वेदांचे अंतिम सार आहे आणि देवांचेही ते परम रहस्य आहे. पण हे अत्यंत मौल्यवान ज्ञान सर्वांना अगदी सहजपणे दिले जात नाही. देऊ नये हे सुद्धा बरोबर आहे. पण स्वतःहून आपण ते ज्ञान घ्यावं, अशी बुद्धी आपल्याला होत नाही. अमृताचा एक कण जिभेवर कोणी ठेवल्यानंतर ती गोडी आपल्याला समजू शकते आणि ती गोडी पुढे लागूही शकते. आपल्यापर्यंत पोहोचणारे ज्ञान हे एक थेंब अमृतासारखे ठरू शकते.

    हे आध्यात्मिक ज्ञान सहजपणाने देऊ नये, असे का असावे? याचे उत्तर शोधताना आपल्याला मानवी स्वभावाचा विचार करावा लागतो. कारण ज्याच्याकडे संयम नाही, ज्याचे स्वतःच्या इंद्रियांवर आणि मनावर अजिबात नियंत्रण नाही, अशा व्यक्तीला जर हे ज्ञान दिले तर, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्याला त्याचे महत्त्वच कधी कळणार नाही.

    ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान मुलाच्या हातात अतिशय मौल्यवान असा हिरा देत नाहीत, देणारही नाहीत. कारण त्याला त्याची किंमत अजून कळत नाही. कदाचित, तो त्या हिऱ्याला एखादा दगड समजून फेकूनही देईल. आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत नेहमी असे होते, असे बहुतेक सगळे संत मानतात. या परमोच्च आध्यात्मिक ज्ञानाचे हेच एकमात्र दुःख आहे. याची उदाहरण देताना अध्यात्मामध्ये, एखाद्या मूर्ख माणसाच्या हाती धारदार तलवार दिली, तर तो स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकतो, असे स्पष्टीकरण दिलेले आहे.

    हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    आध्यात्मिक ज्ञान केवळ अशाच शिष्यांना, व्यक्तींना द्यावे जे वासनाशून्य आहेत, ज्यांच्या मनात आता जगातील आणखी कशाचीही हाव उरलेली नाही आणि जे पूर्णपणे आज्ञाधारक आहेत. पूर्वीच्या काळी गुरू आपल्या शिष्याची अनेक वर्षे परीक्षा पाहात असत आणि जेव्हा त्याची पात्रता सिद्ध होई, तेव्हाच त्याला केवळ उपदेश करत असत. ज्याचे चित्त पूर्णपणे शुद्ध झाले आहे आणि ज्याच्या मनात अहंकाराचा लवलेशही उरलेला नाही, त्यालाच या परम गुह्य ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि ते ज्ञान त्याच्या जीवनात फळाला येते.

    अहमेव परं ब्रह्म

    सच्चिदानंदविग्रहः।

    देहोऽहं नैव चानित्यं

    सत्यज्ञानमिदं विदुः॥

    – गीताव्रत

    ज्ञानी लोक ज्याला सत्यज्ञान म्हणतात, ती म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होय. आपण नेहमी व्यवहारात बोलताना म्हणतो “हा माझा देह आहे.” पण जर, हा माझा देह आहे, असे आपण म्हणत असू तर हा देह ‘माझा’ म्हणजे नक्की कोणाचा आहे? आपण म्हणतो “हे माझे हात आहेत, हे माझे डोळे आहेत.” हे माझे हात, डोळे आहेत, म्हणजे नक्की कोणाचे आहेत? जेव्हा आपण एखादी ‘गाडी माझी आहे’ असे म्हणू, तेव्हा आपण ती गाडी नसतो आपण त्या गाडीचे मालक असतो आणि गाडी आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. याचाच अर्थ असा की, “मी या देहापेक्षा नक्कीच वेगळा आहे. तरीही आपण आयुष्यभर या देहालाच मी मानून जगत असतो. हेच तर मानवी जीवनातील सर्वात मोठे अज्ञान आहे.”

    मी वास्तवतः आहे कारण मी सम आहे, मी नेहमी शांत आहे आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हे शरीर तर आज आहे आणि उद्या नाही, ते पूर्णपणे असत्य आणि अनित्य आहे. जो जन्माला येतो तो केवळ देह असतो आणि जो मरतो तोही केवळ देहच असतो, पण जो या जन्माचा आणि मृत्यूचा साक्षीदार आहे, तो मी आहे. मी कधीच जन्माला येत नाही आणि मी कधीच मरत नाही. मी हा जड देह मुळीच नाही, तर मी तो शुद्ध आणि प्रकाशमान चैतन्य आहे. या भावनेवर जेव्हा आपली घट्ट पकड बसते आणि ही केवळ माहिती न राहता जेव्हा ती आपली प्रत्यक्ष अनुभूती बनते तेव्हा त्यालाच वेदान्तामध्ये खरे ज्ञान म्हटले जाते.

    हे ज्ञान माणसाला मृत्यूच्या भयापासून कायमचे, अगदी कायमचे मुक्त करते.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026 अध्यात्म

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    By Team AvaantarAugust 27, 2026

    अध्याय तेरावा अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा ।…

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    August 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    हक्कसोडपत्र अन् अक्का!

    August 26, 2026

    Recipe : चटपटीत कैरीचे लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 411
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 551
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 252
    • मैत्रीण 24
    • ललित 878
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    August 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.