Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 27, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥738॥ कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दिठी न घाली । गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें ॥739॥ दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा । नेणवेचि पैं गा । जयापरी ॥740॥ गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे । नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न ॥741॥ तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे । हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥742॥ शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥743॥ परि बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें । तेंचि नागवणें । रूप एथ ॥744॥ संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें । लेपा स्नपन करणें । तेंचि मरण ॥745॥ पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें । तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा ॥746॥ सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा । प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥747॥ तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु । जंव जंव सुरवाडु । भोगांचा या ॥748॥ तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके । मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे ॥749॥ तैसें जीवित जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥750॥ किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा। विषयांचिया ॥751॥ तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो। न पडे गा वाटावो । आणिकांचा ॥752॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    अर्थ

    डबक्यातला मासा, हे पाणी आटणार नाही, अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही ॥738॥ अथवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पाहता, गळास लावलेले आमिष माशाने गिळावे ॥739॥ दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील, हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही. ॥740॥ जसा एखादा मूर्ख, आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे, घर जळत असले, तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख, खादाड मनुष्य, विष घालून शिजविलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो ॥741॥ त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे, हे जो रजोगुणापासून होणार्‍या सुखामुळे जाणतच नाही. ॥742॥ शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्‍याच मानतो. ॥743॥ वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय (त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे). पण त्या बिचार्‍याच्या हे काहीच लक्षात येत नाही की ॥744॥ आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री, ती मैत्री नव्हे, तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. ॥745॥ पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली, तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे, असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने (मोहित झालेले) मूर्ख लोक विषयवृद्धीतच खरी वृद्धी नसून खराखरा नाशच आहे, हे जाणत नाहीत ॥746॥ समोर असलेल्या शूळाकडे, जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यु जवळ येतो; ॥747॥ त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते, (म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात) आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल, ॥748॥ तसतसे आयुष्याला मरण अधिक अधिक जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे घासले जाईल (तसतसे विरघळत जाते) ॥749॥ त्याप्रमाणे (वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते (म्हणजे मरण जवळ येते). ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही ॥750॥ अर्जुना, फार काय सांगावे! हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही ॥751॥ हे महाबाहो अर्जुना, तो (पुरुष) अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही ॥752॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026 अध्यात्म

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    By Team AvaantarAugust 26, 2026

    अध्याय तेरावा आणिक पाहीं धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्मातें…

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जो अखंड भोग जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    हक्कसोडपत्र अन् अक्का!

    August 26, 2026

    Recipe : चटपटीत कैरीचे लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 410
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 551
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 252
    • मैत्रीण 24
    • ललित 878
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.