Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    हक्कसोडपत्र अन् अक्का!

    August 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 27, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 05 भाद्रपद शके 1948; तिथि : चतुर्दशी 09:08; नक्षत्र : धनिष्ठा 26:15;
    • योग : शोभन 07:54; करण : विष्टि 21:31;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मकर 13:34; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 18:59;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    नारळी पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ सकाळी 09:08

    शुक्ल यजु श्रावणी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    गूढ कथालेखक नारायण धारप

    टीम अवांतर

    मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांमध्ये ज्यांचे नाव अग्रगण्य आहे त्या  नारायण धारप यांचा जन्म 27 ऑगस्ट 1925 रोजी नागपूर येथे झाला. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बी.एस्सी.टेक पदवी मिळवली. नोकरीच्या निमित्ताने ते काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते. काही काळ त्यांनी अध्यापन देखील केले. मात्र खरी ओढ ही लेखनाकडेच होती. त्यामुळे पूर्णपणे त्यांनी लेखनाला वाहून घेतले आणि भयकथांच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

    सर आर्थर कॉनन डायल यांचं ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स्‌’ हे पुस्तक धारपांच्या वाचनात आलं, आणि तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. सस्पेन्स, हॉरर साहित्याकडे ते इथूनच आकृष्ट झालो. स्टीफन किंग आणि पीटर स्ट्रॉट हे त्यांचे आवडीचे लेखक होते.

    हेही वाचा – हक्कसोडपत्र अन् अक्का!

    1951-52 साली धारपांनी ‘दार उघड ना गं आई’, ‘हिरवे फाटक’, ‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘सदूचे मित्र’ या चार भयकथा धारपांनी पहिल्यांदा लिहिल्या. त्या नागपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या सुषमा मासिकात प्रकाशित झाल्या. याशिवाय ‘ऐसी रत्ने मेळवीन’, ‘पारंब्यांचे जग’ , ‘दुहेरी धार’, ‘काळगुंफा’ या  चार विज्ञानकथा देखील त्यांनी लिहिल्या. मात्र त्यांना फारसे वाचक लाभले नाहीत. म्हणून धारप परत भयकथांकडे वळले.

    1965 मध्ये ‘वाङमयशोभा’ या मासिकामधून आलेली ‘चंद्राची सावली’ ही धारपांची पहिली भयकादंबरी तर ‘अनोळखी दिशा’ हा पहिला भयकथासंग्रह ठरला. समर्थ, आप्पा जोशी, कृष्णचंद्र, पंत आणि जयदेव या त्यांच्या कथा किंवा कादंबऱ्यांमध्ये अनेकदा आढळणारी मुख्य पात्रे. ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या तत्त्वानुसार ही मुख्य पात्रे कथानकातील वाईट शक्तींवर विजय मिळवताना दिसतात.

    धारप यांची साधारपणे 100 पुस्तके प्रकाशित झाली आहे. यात प्रामुख्याने भयकथांचाच समावेश आहे. याशिवाय ‘देवकी’, ‘सरिता’, ‘कृष्णा’ इत्यादी सामाजिक कादंबऱ्या,‘24 तास’ हे नाटक, ‘कंताचा मनोरा’सारखं बालवाङ्मय असे साहित्यिक प्रकारही धारपांनी हाताळले.

    नारायण धारप यांच्या गूढकथांवर आधारित, तसेच त्यांच्या एका गूढकथासंग्रहाचेच नाव असलेली “अनोळखी दिशा” नावाची दूरचित्रवाहिनी मालिका 2011 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर झाली. या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. याशिवाय त्यांच्या ग्रहण या कादंबरीवर आधारित मालिका झी मराठीवर 2018 मध्ये प्रसारित झाली होती. धारप यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला “तुंबाड” हा हिंदी चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राही बर्वे यांनी  तर निर्मिती आनंद एल. राय यांनी केली. 18 ऑगस्ट 2008 रोजी पुणे येथे धारप यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज कामाच्या ठिकाणी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद झाल्यास त्याचा तुमच्या बढतीवर किंवा प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपले विचार व्यक्त करताना शब्दांकडे विशेष लक्ष द्या. स्वतःच्या आरोग्याबाबत थोडी चिंता वाटेल, त्यामुळे निष्काळजीपणा टाळा. आज दुसऱ्याचे वाहन चालवणे टाळा. कायदेशीर बाबींमध्ये प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी बाळगा.

    वृषभ – महत्त्वाच्या कामांकडे आज बारकाईने लक्ष द्यावे लागेल, थोडासा निष्काळजीपणासुद्धा अडचणी निर्माण करू शकतो. संततीला कामाच्या निमित्ताने दूर राहायला जावे लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे भावनिक व्हाल. कुटुंबासोबत एखादी पार्टी किंवा स्नेहसंमेलन होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड सुधारेल. मात्र, याच काळात एखादा जुना कौटुंबिक मुद्दा पुन्हा उफाळून येऊ शकतो आणि तणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे परिस्थिती चिघळू देऊ नका.

    मिथुन – इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप टाळणे आज तुमच्यासाठी उत्तम ठरेल. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणे टाळा. व्यवसायातील सध्याचे चढ-उतार हळूहळू कमी होतील. वडिलांकडून एक महत्त्वाची जबाबदारी मिळेल, जी तुम्हाला गांभीर्याने पार पाडावी लागेल. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढेल, मात्र वाढत्या खर्चावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

    कर्क – आजचा दिवस थोडा गुंतागुंतीचा असू शकतो. वाढलेल्या कामाच्या दबावामुळे अस्वस्थता येऊ शकते, मात्र संयम आणि समजूतदारपणाने परिस्थिती नियंत्रणात येईल. संततीच्या अभ्यासाची चिंता वाटू शकते. अशा परिस्थितीत, त्यांच्या शिक्षकांशी बोलणे फायदेशीर ठरेल. आईच्या आरोग्याबाबतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या पुढे ढकलण्याऐवजी, वेळेवर उपचार आणि सल्ला घेणे चांगले.

    सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. परदेशातील एखाद्या प्रकल्पाबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल, जिथे तुम्ही नवीन लोकांशी ओळख वाढवू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. संयम बाळगा आणि कोणताही निर्णय घाईने घेण्याचे टाळा.

    कन्या – आज आर्थिक दिलासा मिळण्याची प्रबळ चिन्हे आहेत. आर्थिक लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होण्याची शक्यता आहे. भावंडांच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुने वैर विसरून नात्यांना नव्याने सुरुवात करणे फायदेशीर ठरेल.  एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थता जाणवेल. स्वतःला व्यस्त ठेवल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने परिस्थिती सुधारेल.

    तुळ – आज तुमचा कल सेवा, दानधर्म आणि धार्मिक कार्यांकडे अधिक झुकेल. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातही धार्मिक वातावरण निर्माण होऊ शकते. मात्र वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचे वादात रूपांतर होऊ नये यासाठी, शांत संभाषणाद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात समोरच्या पार्टीला दिलेली कोणतीही वचने वेळेवर पूर्ण करण्याचे प्रयत्न करा.

    वृश्चिक – आज मालमत्तेसंबंधी एखादा मोठा निर्णय घ्याल. नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. बँकेचे एक महत्त्वाचे कामही पूर्ण होऊ शकते. आवडत्या व्यक्तीची भेट झाल्यामुळे खूप आनंद होईल. मात्र स्वतःच्या मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतःची मेहनत आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून रहा.

    हेही वाचा – हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    धनु – आजचा दिवस सकारात्मक असेल. प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आपल्या सभोवतालच्या लोकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. जर एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल, तर यावर वडिलधाऱ्यांचा सल्ला खूप उपयुक्त ठरू शकतो. प्रवासादरम्यान, तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. घरगुती जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हाला वडीलधाऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.

    मकर – आज उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. भूतकाळातील चुकांमधून शिकणे महत्त्वाचे आहे. सध्या कोणालाही पैसे उधार देणे टाळा. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यातील धोक्यांचा काळजीपूर्वक विचार करा. जोडीदारासोबत प्रवास करण्याची किंवा घराबाहेर वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे  नातेसंबंध अधिक दृढ होतील. केवळ दिखाव्यासाठी अवाजवी खर्च करणे टाळा.

    कुंभ – आज, जशा तुमच्या गरजा वाढतील, तसा तुमचा खर्चही झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे, आगाऊ अंदाजपत्रक तयार करणे शहाणपणाचे ठरेल. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर त्याची परतफेड होण्यास विलंब होऊ शकतो, म्हणून सध्या त्या रकमेवर अवलंबून राहणे टाळावे. स्वतःची बुद्धिमत्ता आणि रणनीती विरोधकांच्या योजना हाणून पाडू शकते. पालकांचे आशीर्वाद आणि पाठिंबा यामुळे प्रलंबित प्रकल्प पुढे जातील.

    मीन – आज स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कामातील यशामुळे आत्मविश्वास वाढेल. तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या नवीन मार्गांचा विचार करू शकता. बचत मजबूत करण्यासाठी एक नवीन योजना देखील बनवू शकता. संततीला दिलेले वचन पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात हलगर्जीपणा टाळावा, कारण लक्ष विचलित झाल्यास मेहनतीवर परिणाम होऊ शकतो. शिस्त आणि एकाग्रता राखल्यास चांगले परिणाम मिळतील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 26, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 ऑगस्ट 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 04…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    हक्कसोडपत्र अन् अक्का!

    August 26, 2026

    Recipe : चटपटीत कैरीचे लोणचे आणि भोकरांचे लोणचे

    August 26, 2026

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 409
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 551
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 252
    • मैत्रीण 24
    • ललित 878
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑगस्ट 2026

    August 27, 2026

    अशीही एक भाऊबीज… उत्तरार्ध

    August 26, 2026

    हक्कसोडपत्र अन् अक्का!

    August 26, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.