Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. शिरीष कुलकर्णी
डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
माया / भाग – 3 अहंकारविनाशेन कर्मराशिश्च दह्यते। न कर्ता न च भोक्ता च परज्ञानं हि बुध्यते॥ – गीताव्रत खरे आणि परिपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनात नक्की काय करते, हा आपल्यासाठी आणि अध्यात्मामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर देताना आद्य शंकराचार्य सांगतात की, सत्यज्ञान माणसाच्या अहंकाराचे समूळ उच्चाटन करते. आपण आयुष्यभर जे काही करत असतो, त्यामागे ‘मी करतो’ हा एक अत्यंत प्रबळ भाव लपलेला असतो. या ‘मी करतो’ या भावनेलाच वेदांतामध्ये ‘अहंकार’ असे म्हटले आहे. जोपर्यंत हा अहंकार जिवंत आहे, तोपर्यंत माणसाने कितीही चांगली किंवा वाईट कर्मे केली तरी त्या कर्मांचे फळ त्याला भोगावेच लागते आणि हेच…
माया भाग – 2 भानूद्गमे यथा लोके दिङ्भ्रमो नश्यति ध्रुवम्। सत्यानुभूतौ तद्वद्धि अज्ञानं नश्यति ध्रुवम्॥ – गीताव्रत रात्रीच्या घनदाट अंधारात आपण एखाद्या अनोळखी जंगलात रस्ता चुकलो आहोत अशी कल्पना आपण क्षणभर करूया. चारही बाजूंनी केवळ काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे आणि आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांचा कोणताही बोध होत नाहीये. आपण दिशाभूल होऊन सैरावैरा धावत सुटलोय आणि दुर्दैवाने एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहिलोय. मनात प्रचंड भीती आहे आणि मार्ग न सापडल्याने आलेली हतबलता जाणवते आहे. आपण आपल्या मर्यादित बुद्धीने रस्ता शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय पण अंधारामुळे आपला गोंधळ अधिकच वाढत जातोय. अखेर रात्र संपतेय. पहाटे पूर्वेकडून सूर्याचा उदय…
माया / भाग – 1 एकदा शांतपणे या चराचर सृष्टीकडे पाहा! अगम्य आहे ही सृष्टी! इथे आपल्याला नानाविध रूपे रंग आणि विविध आकार दिसतील. परंतु या प्रचंड विविधतेच्या मागे एकच सत्य दडलेले आहे, हे सांगण्यासाठी साक्षात भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण भारतवर्षाची पदयात्रा केली. जी गस्त म्हणून प्रसिद्ध आहे. शंकराचार्यांनी सुप्तावस्थेत असलेल्या मानवी चेतनेला जागे करण्याची ती एक फार फार मोठी आध्यात्मिक जागरणाची धडपड केली होती. आज सर्व धर्मांमध्ये त्यांचे तत्त्वज्ञान अंतिम मानले जाते. अनेक संत त्यांनी जन्माला घातले. अगदी शम्स, रूमी सारखे परधर्मातील संतदेखील आचार्य शंकराचार्य यांच्या तत्वज्ञानातून संतपदाला पोहोचले. अशी किती उदाहरणे द्यावीत? कदाचित, आपल्याला…
कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा… निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा… परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा… हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा… – ग. दि. माडगूळकर गदिमांच्या सिद्धहस्त आणि प्रासादिक लेखणीतून अवतरलेले हे गीत आपल्या कानांवर पडले की, विलक्षण असा सात्विक शहारा हमखास येतो… आणि अलौकिक अशा चैतन्यमयी प्रवासाची सुरुवात होते. पंढरीचा सावळा पांडुरंग भक्तासाठी अजूनही विटेवर उभा असलेला देव! पुंडलिकाची आठवण देत कोट्यावधी वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या हृदयाची धडधड सांभाळत तो आपल्या सर्वांच्या श्वासात मिसळलेला…
रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति। तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥ – गीताव्रत ज्यांचे चित्त रामनामाच्या अमृतात न्हाऊन निघते आणि राम स्मरणामुळे प्रसन्न होते, त्याच्या जीवनाचे रक्षण या भवसागरात साक्षात प्रभू श्रीराम करतात. ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ हे अगदी बालपणापासून आपल्या मनावर कोरले गेलेले स्तोत्र. आपल्या सामर्थ्य देणाऱ्या भावविश्वाचा ते एक अविभाज्य भाग बनले आहे. साक्षात श्रीरामांनी आपले रक्षण करावे, त्यांनी आपल्या आयुष्याचे सारथ्य करावे आणि आपण आपले जीवन ध्येय पूर्ण करावे. आपण अनेक प्रकारच्या चिंता, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनांनी वेढलेले असतो. वादळी भवसागराच्या संघर्षमय लाटांविरुद्ध मार्गक्रमण करताना अनेकदा आपले मन सैरभैर होते. अशावेळी आपल्याला रामनामाच्या भक्कम आधाराची आवश्यकता असते. हा आधार मानसिकही…
संत एकनाथ महाराजांचे ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले’ हे भारूड अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक ठेवा आहे. नाथांना यातून प्रपंचातील ‘भास’ आणि परमार्थातील ‘अनुभव’ यांची सांगड घालायची आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले | आधी कळसू मग पाया रे | देव पुजू गेले तव देऊळ उडाले | खेळिया सद्गुरुराया रे || नाथांनी इथे मानवी देहाचे वर्णन ‘चिंचेच्या पानावर’ असे केले आहे. चिंचेचे पान हे लहरी आणि चंचल असते. आपला हा देह देखील पंचमहाभूतांच्या एका लहरीवर उभा आहे. ‘आधी कळसू मग पाया’ गर्भाश्रमात असताना माणसाचे ब्रह्मरंध्र, मस्तक आधी तयार होते आणि मग इतर देह! माणसाचा ‘अहंकार’ हा कळसासारखा उंच दिसतो. जेव्हा सद्गुरूंच्या कृपेने आपण अंतरात्म्यातील…
आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली हनुमान चालीसा ही रोज पठण करण्याची प्रार्थना आहे. आपण ही हनुमानभक्ती हृदयातून एक-एक मोती वेचून चिंतन करूया. श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि। बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि॥ श्रीगुरूंच्या चरण कमलांच्या धुळीने आपल्या मनाच्या आरशाला स्वच्छ करून, आपण आता श्री रघुनाथांच्या, प्रभू श्रीरामांच्या त्या पवित्र आणि शौर्यसंपन्न विजयाचे चिंतन, मनन वर्णन करूया, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थाचे फळ देणारे आहे. हनुमान चालीसा वाचताना तुलसीदासांच्या रचनेतील अफाट मानसशास्त्रीय खोली आपल्या लक्षात येईल. हनुमान चालीसाची सुरुवात ‘श्री…
वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत संत कान्होपात्रेचे स्थान मला अत्यंत आपलेसे वाटणारे आणि हृदयस्पर्शी असे आहे. तिचे मरण तिचे जीवन उजळवून टाकणारे आहे. एका अभागी जीवाचे ईश्वराच्या चरणी झालेले संपूर्ण समर्पण आहे. मंगळवेढ्याची एक तेजस्वी, अनन्य सुस्वरूप कन्या, जिच्या अफाट सौंदर्याने जगाला वेड लावले होते. पण जिचे मन मात्र त्या पाषाणाच्या काळ्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांशी एकाग्र, एकरूप झाले होते. कान्होपात्रेचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग ईश्वराला दिलेली तिची अखेरची प्राणांतिक आर्त हाक आहे. जेव्हा सहनशक्तीचे सगळे दोर तुटतात, आणि चोहोबाजूंनी संकटांचा विळखा पडतो, तेव्हा जी आर्तता निर्माण होते, ती या अभंगाच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. हृदय हेलावून टाकणारा हा सर्वश्रेष्ठ…

