Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026

    July 22, 2026

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, July 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 22, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 जुलै 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 31 आषाढ 1948; तिथि : नवमी अहोरात्र; नक्षत्र : स्वाती 23:02;
    • योग : साध्य 18:41; करण : बालव 18:05;
    • सूर्य : कर्क; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक गोविंद तळवलकर

    टीम अवांतर

    ज्येष्ठ पत्रकार, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचा जन्म 22 जुलै 1925 रोजी डोंबिवलीत झाला. ज्येष्ठ कवी आणि लेखक गोपीनाथ तळवलकर तसेच ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर हे त्यांचे काका. पदवीधर झाल्यानंतर गोविंदराव ‘नवभारत’सारख्या नियतकालिकातून लेखन करू लागले. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपळ गणेश आगरकर, एम. एन. रॉय आदींच्या विचारांचा आणि लेखणीचा गोविंदरावांवर प्रभाव होता. हाच वारसा घेऊन ते पत्रकारितेत आले. जवळपास 12 वर्षे त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकात उपसंपादक म्हणून ह. रा. महाजनींसमवेत काम केले. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाल्यानंतर ते तेथे सहसंपादक म्हणून रुजू झाले. तेव्हा तेथे द्वा. भ. कर्णिक संपादक होते.

    याच काळात तळवळकर सतत काही ना काही वाचत किंवा लिहीत राहिले. त्यांनी स्वतःचा व्यासंग वाढविला. कर्णिकांच्या नंतर तळवलकर मुख्य संपादक झाले आणि त्यांच्या लेखणीला बहर आला. राजकीय घडामोडींचा अभ्यास आणि निरीक्षण करून लिहिलेले त्यांचे अग्रलेख गाजू लागले. त्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास तर होताच, पण त्यांना सामाजिक भानही होते. त्यामुळे अग्रलेखांमधून ते समाजातील अपप्रवृत्तींचा समाचार घेऊ लागले.

    हेही वाचा – अंतर्मनातील विठ्ठल

    ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला परिपूर्ण आणि दर्जेदार वृत्तपत्र म्हणून ओळख देण्यासाठी तळवलकर यांनी सर्वार्थाने प्रयत्न केले. मराठीतील ख्यातनाम लेखक, तसेच इतरही क्षेत्रातील नामवंत यांना तळवलकरांनी लिहिते केले. पु. ल. देशपांडे शांतिनिकेतनात राहून परत येताच ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवार पुरवणीत त्यांचे ‘वंगचित्रे’ हे सदर प्रसिद्ध होऊ लागले. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा कविवर्य कुसुमाग्रजांची कविता दैनिकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्याचा प्रयोग तळवलकरांनीच केला.

    पुस्तके आणि पुस्तकांचे जग हा तर त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून देणारे सदर दर आठवड्याला त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे तर ‘वाचता वाचता’ या सदरातून त्यांनी स्वत:देखील वाचस्पती या टोपणनावाने अनेक इंग्रजी पुस्तकांची ओळख मराठी वाचकांना करून दिली.

    तळवलकरांनी केवळ मराठीतच नव्हे तर टाइम्स ऑफ इंडियासह एशियन एज, टेलिग्राफ, फ्रंटलाइन आदी इंग्लिश नियतकालिकांतूनदेखील वेळोवेळी प्रासंगिक लेखन केले. जगाचा इतिहास, साहित्य आणि पत्रकारिता या विषयात त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन केले असून त्यापैकी सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 ते 4), नियतीशी करार, सत्तांतर 1947 (खंड 1 ते 3), भारत आणि जग, वैचारिक व्यासपीठे हे काही उल्लेखनीय ग्रंथ म्हणता येतील. त्यांची एकूण 25 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

    पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक, उत्कृष्ट पत्रकारितेसाठी बी. डी. गोएंका आणि दुर्गा रतन पुरस्कार,  सामाजिक न्यायासाठी रामशास्त्री पुरस्कार, यशवंतराव चव्हाण अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ‘सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त’ पुस्तकासाठी न. चिं. केळकर पुरस्कार तर, 2007 साली जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 22 मार्च 2017 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आशा आणि संधी घेऊन आला आहे. अनेक महिन्यांपासून अपेक्षित असणारे बदल आता स्पष्टपणे दिसू लागतील. व्यवसायात योग्य मार्गदर्शनामुळे उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल राहील. विद्यार्थी शिक्षणासाठी घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात.

    वृषभ – दिलासा आणि संतुलन घेऊन येणारा दिवस आहे. शासकीय कामातील यशामुळे आनंद मिळेल.  उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. भविष्यातील योजनांबद्दल कुटुंबासोबत गंभीर चर्चा होऊ शकते. जुन्या मतभेदांचे निराकरण होईल. गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. वाहनाशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

    मिथुन – आज तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होईल. कौटुंबिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील. किरकोळ आरोग्य समस्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो, म्हणून तब्येतीकडे लक्ष द्या. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ द्या. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    कर्क – नवीन संधी उपलब्ध होण्याचा आजचा दिवस असेल.  मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दिवस अनुकूल आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेसंबंधीचा एखादा महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळेल.

    सिंह –  कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांना आज महत्त्व दिले जाईल.  कौटुंबिक बाबी हुशारीने हाताळू शकाल. विरोधक सक्रिय असू शकतात, त्यामुळे सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. संततीच्या करिअरची चिंता वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. बोलण्यात संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

    कन्या – जे काम हाती घ्याल, त्याचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने वाटचाल करतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. एखादी जुनी समस्या पुन्हा डोकं वर काढेल, त्यामुळे सतर्क रहा.

    तुळ – अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुमची व्यग्रता आज वाढू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा आणि सर्व महत्त्वाच्या गोष्टी लेखी स्वरूपात ठेवा. आधी केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

    वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल. संततीकडून चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल, त्याने मनःशांती मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

    हेही वाचा – आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    धनु – आजचा दिवस तुम्हाला कामात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देईल. कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे किरकोळ मतभेद संभाषणातून मिटतील. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नका, वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या.

    मकर – आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आज आवश्यक असेल. इतरांच्या सल्ल्यानुसार कोणताही मोठा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायात सावधगिरी बाळगा, कारण कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकते. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम आणि धीर धरा.

    कुंभ – दिवस थोडा आव्हानात्मक असेल, पण मेहनतीमुळे हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. कामात घाई टाळा आणि प्रत्येक काम विचारपूर्वक करा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवू शकतात, जी तुम्हाला पूर्ण समर्पणाने पार पाडावी लागेल. उसने दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळेल.

    मीन – खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. शिवाय भागीदारीही फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    July 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जुलै 2026

    July 20, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 21, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 30…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जुलै 2026

    July 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026

    July 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026

    July 22, 2026

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 367
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 500
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 793
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जुलै 2026

    July 22, 2026

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.