Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 13, 2026Updated:July 13, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 13 जुलै 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 22 आषाढ शके 1948; तिथि : चतुर्दशी 18:50; नक्षत्र : आर्द्रा 26:51;
    • योग : ध्रुव 16:00; करण : विष्टि 08:40, चतुष्पाद 29:00;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:20;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    सोमवती अमावस्या सायंकाळी 06:50 पासून

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भावकवयित्री इंदिरा संत

    टीम अवांतर

    प्रसिद्ध मराठी भावकवयित्री इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी इंडी (जि. विजापूर) या गावी झाला. त्यांचे शिक्षण बेळगाव, कोल्हापूर आणि पुणे येथे झाले. मराठी आणि मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापिका म्हणून तसेच बेळगाव येथील ‘मराठी ट्रेनिंग कॉलेज’च्या प्राचार्या म्हणून त्यांनी काम केले.

    बालपणापासून त्यांना लेखनाची आवड होती. कुटुंबातूनच झालेले स्त्रीगीतांचे आणि ओव्यांचे संस्कार त्यांच्यातील कवयित्री घडताना उपयुक्त ठरले. 1932 सालापासून त्या जाणीवपूर्वक लेखन करू लागल्या. लघुनिबंधकार ना. मा. संत ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्याच्या कविता ‘सहवास’ या नावाने प्रसिद्घ झाल्या. बालकवी, माधव ज्युलियन, अनिल आणि अनंत काणेकर यांचा प्रभाव या संग्रहातील कवितांमध्ये जाणवतो.

    हेही वाचा – प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    पतीच्या अकाली निधनानंतर एकलेपणाची तरल, अंतर्मुख भाववृत्ती घेऊन त्यांची कविता वेगळ्या रूपाने बहरली. शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, चित्कळा, गर्भरेशमी, वंशकुसुम, निराकार हे त्यांचे काव्यसंग्रह तर मृद्‌गंध हे आत्मकथन, मालनगाथा हे स्त्रियांच्या ओव्यांचे संपादन (2 खंड) तसेच, कदली, चैतू हे कथासंग्रह अशा त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत.

    जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर श्रद्धा असणाऱ्या इंदिराबाईंनी लिहिलेली भावकविता, ही मराठी साहित्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. स्वानुभवाचा संयत पण रेखीव आविष्कार, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. भूतकाळाच्या जाणिवेला सतत वर्तमानकाळात आविष्कृत करणे, स्त्रीसुलभ साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादलय, ही त्यांच्या कवितेची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.

    इंदिराबाईंना अनेक मानसन्मान लाभले. शेला, मेंदी आणि रंगबावरी या काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार लाभले.  याशिवाय, गर्भरेशमी  या काव्यसंग्रहाला 1984 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार तसेच अनंत काणेकर पुरस्कार प्राप्त झाला. साहित्य कला अकादमीकडून घुंघुरवाळा या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला. नासिकच्या कुसुमागज प्रतिष्ठानने त्यांना ‘जनस्थान’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती दिली होती. 13 जुलै 2000 रोजी त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा असा आजचा दिवस ठरू शकतो. कष्टाचे पूर्ण फळ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. वाहनासंबंधी अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरू होऊ शकते.

    वृषभ – व्यक्तिमत्त्वाची आणि कामाची आज प्रशंसा होईल, तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचा व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्नही यशस्वी होऊ शकतात. मात्र, व्यावसायिकांनी नवीन लोकांवर आंधळा विश्वास ठेवणे टाळावे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते.

    मिथुन – आज थोडा संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण एखादा शब्दही गंभीर रूप घेऊ शकते. चर्चेद्वारे कौटुंबिक वाद मिटवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांमुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील आणि तुमची प्रशंसाही होऊ शकते.

    कर्क – आजच्या दिवशी पाठिंबा आणि संधी दोन्ही मिळतील. प्रत्येक टप्प्यावर वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, त्यामुळे चांगल्या संधी हातातून निसटू देऊ नका. काही अपूर्ण कामांमुळे अस्वस्थता येऊ शकते. काही आवश्यक खर्च अनपेक्षितपणे उद्भवू शकतात.

    सिंह – घाई आणि धोका पत्करणे टाळणे आज शहाणपणाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही एखाद्या नव्या प्रकल्पाची आखणी करत असाल, तर वडिलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज नवीन मोबाइल फोन, कपडे किंवा एखादी आवडती वस्तू खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते.

    कन्या – आजचा दिवस समाधान आणि आनंदाने भरलेला असेल. घरी नवीन सदस्याचे आगमन होणार असल्याची बातमी  मिळेल, ज्यामुळे घरगुती आनंदात भर पडेल. व्यवसायातील उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संधी शोधाल. आज पैसे उधार घेणे टाळा. अफवा किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका.

    तुळ – गुंतवणुकीच्या बाबतीत आज नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुमचा आनंद द्विगुणित होईल. प्रवास होण्याचीही शक्यता आहे, परंतु अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे टाळा.

    वृश्चिक – आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. वरिष्ठांसोबतच्या एका महत्त्वाच्या संभाषणातून तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. प्रवासातून अशी माहिती मिळू शकते जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेवाईक तुमच्या घरी  येतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमहीचेही आयोजन कराल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.

    हेही वाचा – तुळस माझी भाग्याची!

    धनु – आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. संततीच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे किंवा वाद घालणे टाळा. कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो.

    मकर – कुटुंबाचा पाठिंबा हीच तुमची आज सर्वात मोठी ताकद असेल. अनेक जबाबदाऱ्या असल्या तरी तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. तब्येतीचीह काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.

    कुंभ – प्रगतीची नवी दारे आज उघडू शकतात. तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता इतरांना प्रभावित करेल. एकापाठोपाठ एक मिळणाऱ्या चांगल्या बातम्यांमुळे आनंदी असाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोखीम असलेल्या योजनेत गुंतवणूक करण्याचे टाळा. गुंतवणुकीबाबत जाणकारांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

    मीन – नफा आणि यशाच्या नव्या आशा घेऊन आजचा दिवस येणार आहे. तुमची मेहनत तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. कुटुंबाकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली जबाबदारी मिळाल्याने उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अभ्यासाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    By प्राजक्ता काथेAugust 16, 2026

    मेष हा आठवडा सुखदायी आणि आरामदायी आहे. नोकरदारांना नवीन गृहवास्तू खरेदी करण्याचा योग आहे. आईचे…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑगस्ट 2026

    August 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.