Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 7, 2026Updated:July 7, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 जुलै 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 16 आषाढ शके 1948; तिथि : सप्तमी 13:24; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 16:23;
    • योग : शोभन 14:30; करण : बालव 24:58;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    कालाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर

    टीम अवांतर

    भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत वाढलेल्या आणि सूक्ष्मजीवशास्त्रात पदवीधर असलेल्या पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी झाला. त्यांनी संगीत क्षेत्रातील कारकीर्द निवडली. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय (ख्याल , ठुमरी , टप्पा इत्यादी) आणि सुगम लोकप्रिय प्रकार ( गझल , गीत , भजन इत्यादी) दोन्ही गातात.

    पद्मजा यांनी गायक पंडित जसराज यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. नंतर सारंगी वादक पंडित राम नारायण आणि संगीत दिग्दर्शक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून पुढील प्रशिक्षण घेतले.

    हेही वाचा – संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!

    ही शुभ्र फुलांची ज्वाला,  रंग बावरा श्रावण आणि घर नचले नाचेला या त्यांच्या तीन अल्बममध्ये कुसुमाग्रज, इंदिरा संत,  विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी,  सुरेश भट, ग्रेस आणि शांता शेळके या कवी-कवयित्रींनी लिहिलेल्या मराठी कवितांचा समावेश आहे. त्यांचे मराठी गझलांचा अल्बम तसेच ‘हे गगना’,  ‘हे स्पर्श चांदण्यांचे’ आणि ‘मेघा रे’ नावाचे अल्बम देखील आहेत. तर, ‘गीत नया गाता हूँ’ नावाच्या अल्बममध्ये पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता गायल्या आहेत. माजी पंतप्रधान  व्ही. पी. सिंह यांच्या कविता देखील संगीतबद्ध करून गायल्या आहेत.

    त्यांचा ‘जिंदगी की जुबान’ हा गझल अल्बम आणि भक्तीगीत गायक अनुप जलोटा यांनी संगीतबद्ध केलेला ‘मंगलदीप’ नावाचा हिंदी भजनांचा अल्बम आहे. त्यांच्या ‘रंग’ या अल्बममध्ये हिंदीतील सुफी शैलीतील गाण्यांचा समावेश आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष – तुमची खरी क्षमता ओळखा आणि त्यातून तुमचे महत्त्व अधोरेखित होईल. कामाचा ताण असला तरी, कार्य-क्षेत्रात तुमचा आवाका पाहायला मिळेल. निर्धारित वेळेच्या आधीच काम पूर्ण करू शकता. पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानलालसेने नवीन मित्र जोडाल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा.

    वृषभ – शारीरिक तसेच मानसिक सुदृढतेसाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. भाऊ-बहिणींपैकी कुणी तुमच्याकडे उधार मागू शकतात. सहभागी झालेल्या सामाजिक कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. ही यात्रा मानसिक तणावही देऊ शकते. नोकरदारांनी विरोधकांच्या कारस्थानांपासून सतर्क रहावे.

    मिथुन – नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी काही काळ केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल. सहकारी फार काही मदत देऊ शकणार नाहीत. कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, हे लक्षात ठेऊन रागावर नियंत्रण ठेवा. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर घरच्यांसोबत बोलू शकता. तुमच्या काही गोष्टी घरच्यांना चिंतीत करू शकतात; परंतु, यातून मार्ग नक्कीच निघेल.

    कर्क – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आजच्या दिवशी मोठी गुंतवणूक करणे टाळा. आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावले जाणार नाही, याची दक्षता घ्या. तुमच्या कामगिरीमुळे वरिष्ठ खूश होतील. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी येण्याची शक्यता आहे.

    सिंह – अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक टाळा. तुमच्या उदार वागणुकीचा नातेवाईक फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा. नवीन नोकरी शोधत असाल तर, चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायासाठी प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल.

    कन्या – मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. कोणाला तरी उधार दिलेला पैसा किंवा आधी गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळू शकतो. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबीयांसमवेत संवाद साधा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर द्विधावस्था देखील दूर होईल.

    तुळ – अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत आनंद साजरा कराल. संततीच्या यशामुळे अभिमान वाटेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाईल आणि तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल. व्यवसायात नवे करार होतील, पण कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. कामच्या धबडग्यात स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा.

    वृश्चिक – कलात्मक छंदांमुळे आनंद मिळेल. जवळच्या मित्राच्या मदतीने काही जातकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन बऱ्याच समस्या दूर करू शकते. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्याचे आज टाळा. त्याबाबत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण इष्ट ठरेल.

    हेही वाचा – कन्हैय्या आणि त्याच्या आठवणी…

    धनु – या राशीच्या जातकांना आज स्वतःला समजून घेण्याची आवश्यकता आहे. जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहात, असे वाटत असेल तर, स्वत:साठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे आकलन करा. अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालविताना काळजी घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल.

    मकर – इतरांना दुखवू नका. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. चांगल्या कामगिरीबद्दल नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे करार होतील. पण समोरच्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता, कागदपत्रे नीट तपासून घ्या.

    कुंभ – आजचा दिवस अनुकूल आहे, कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. रिकामा वेळ कुठल्या तरी अनावश्यक कामात खराब होऊ शकतो. त्यामुळे कोणालाही मदतीसाठी हो म्हणताना, विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखीम असलेली गुंतवणूक टाळा किंवा जाणकाराच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा. अन्यथा नुकसान होऊ शकते.

    मीन – नोकरीच्या ठिकाणी आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल, त्याने वरिष्ठ खूश होतील. जे जातक मित्र किंवा नातेवाईकांसोबत मिळून व्यवसाय करत आहेत, त्यांनी आज खूप विचार करून निर्णय घ्यावेत, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल, यासाठी वैद्याकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    July 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 जुलै 2026

    July 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 05 जुलै 2026

    July 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 6, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 15 आषाढ शके 1948; तिथि : षष्ठी 13:46 ; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 16:06; योग : सौभाग्य 15:50…

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 जुलै 2026

    July 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 05 जुलै 2026

    July 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 जुलै 2026

    July 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026

    पित्याचा निर्णय!

    July 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन

    July 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 352
    • अवांतर 193
    • आरोग्य 127
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 480
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 24
    • ललित 764
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    राज यांची निवृत्ती अन्…

    July 7, 2026

    संकर्षण… पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात…

    July 7, 2026

    पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    July 7, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.