Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 1, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 01 ऑगस्ट 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 10 श्रावण शके 1948; तिथि : तृतीया 23:07; नक्षत्र : शततारका 20:44;
    • योग : शोभन 23:22; करण : वणिज 10:52;
    • सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठी कवी आणि विद्वान महादेव मोरेश्वर कुंटे

    टीम अवांतर

    मराठी कवी आणि विद्वान महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1835 रोजी सांगली जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर आणि मुंबई येथे झाले. पुढे 1864 साली ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले. पुढे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कराची, कोल्हापूर, पुणे येथे नोकरी केली. काही काळ ते मुंबईला संस्कृतचे प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते. अहमदाबाद येथील एका महाविद्यालयाचे काही काळ प्राचार्यपदही त्यांनी भूषविले.

    मराठीबरोबरच इंग्रजी, संस्कृत, सिंधी, गुजराथी या भाषांवर देखील प्रभुत्व असल्यामुळे ते त्या भाषांमधून अस्खलित भाषण करीत असत. ग्रीक, पर्शियन आणि  लॅटिन भाषांचेही ते जाणकार होते. “रोमॅंटिक स्टाइल’मध्ये काव्य लिहिणारे त्या काळातील ते एकमेव कवी होते.

    हेही वाचा – कहाणी सकिना अन् खुशबूची

    राजा शिवाजी या काव्याने त्यांचे नाव विशेष गाजले. इंग्रजी साहित्यातील हिरोइक एपिक म्हणजे वीररसप्रधान महाकाव्य मराठीत आणण्याचा हा पहिला प्रयत्न होता. या काव्याच्या इंग्रजी प्रस्तावनेमधील काव्यविषयक विचारसरणी महत्त्वाची आहे. आपल्या काव्यात त्यांनी नित्याच्या व्यवहारातील भाषा आवर्जून वापरली आहे. आधुनिक मराठी काव्याच्या दृष्टीने हा प्रयोग क्रांतिकारक होता. त्यांनी बहिर्जींची नारदमुनींबरोबर तुलना केली. बहिर्जी एखाद्याची माहिती देताना त्या ठिकाणचे वर्णन, व्यक्‍तीचे गुणदोष, त्याची दुखरी ‘नस’ यांचा अभ्यास करून मग ती माहिती राजांकडे पोहोचती करीत असत. अशाच प्रकारे महाराजांच्या इतर अनेक शिलेदारांच्या कर्तृत्वाचे त्यांनी वर्णन ‘राजा शिवाजी’ या खंडकाव्यात केले आहे. पूर्वी शालेय क्रमिक पुस्तकात ‘बहिर्जी नाईक’ या नावाने कवितेचा समावेश होता. याशिवाय राजाराम महाराज छत्रपति, मन नावाची कविता ही त्यांची इतर काव्यरचना देखील प्रसिद्ध झाली. मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजी काव्यरचनाही केली, ज्यात ऋषी आणि फॅमिश्ड व्हिलेज यांचा समावेश आहे. इटलीच्या विद्वत्परिषदेने घेतलेल्या स्पर्धेसाठी  व्हिसिसिट्यूड्‍स ऑफ आर्यन सिव्हिलिझेशन इन इंडिया हा प्रबंध पाठवून त्यांनी पारितोषिक मिळविले. 1877 साली षड्‍दर्शनचिंतनिका हे मासिक काढून त्यांनी  इंग्रजी-मराठीतून प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. 8 ऑक्टोबर 1888 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान आणि समाधानाची भावना मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने प्रतिमा उंचावेल. संपत्तीचा काही भाग धर्मादाय संस्थेला दान करण्याचा विचार मनात येईल. मात्र मालमत्तेसंबंधी घाईने निर्णय घेणे टाळा.

    वृषभ – तुमचे नेतृत्व कौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापनात यात सुधारणा दिसून येईल. अनोळखी लोकांपासून अंतर राखणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत लहान सहलीचा आनंद घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे खानपान शक्यतो टाळा. व्यवसाय किंवा गुंतवणुकीसंबंधीचे जुने प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा.

    मिथुन – व्यवसायात अनपेक्षित लाभ आणि त्यामुळे होणारा आनंद मोठा असेल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर  झाल्याने नात्यातील अडचणी संपतील. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने प्रतिष्ठा वाढेल.

    कर्क – संमिश्र अनुभवांनी भरलेला असा दिवस असेल, पण तो फलदायी ठरेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यासोबत वाटाघाटी करण्याची संधी मिळेल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने खूप आनंद होईल. मात्र त्यावेळी घाईने कोणताही  निर्णय घेणे टाळा.

    सिंह – आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला जाणार आहे. अनावश्यक आश्वासनांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. संततीच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल शिक्षकांशी चर्चा करू शकता. स्वतःचे छंद आणि मनोरंजन यासाठी खर्च कराल.

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आणि सुखद अनुभव देणारा असेल. तुमची ऊर्जा आणि अनुभव कामात फायदेशीर ठरतील. बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता राखा. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. त्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची संधी मिळू शकते.

    तुळ – आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी काही ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि बऱ्याच काळापासून रखडलेली कामे गती घेतील. घराची दुरुस्ती किंवा सुशोभीकरण सुरू करू शकता. काही जुने शत्रू अचानकपणे मित्रत्वाचा हात पुढे करतील, जे तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकते.

    वृश्चिक – जोडीदाराच्या समस्यांवर तोडगा सापडेल. कुटुंबातील सर्वजण एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये व्यग्र असतील. संततीसोबत बऱ्याच दिवसांनी मौजमजा करण्यात काही वेळ घालवाल. व्यवसायात तोटा झाला असेल तर तो भरून निघण्याची शक्यता आहे. याआधी कोणाला काही रक्कम उधार दिली असेल तर, ती व्याजासकट परत मिळाल्याने आनंद होईल.

    हेही वाचा – आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    धनु – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आणि उत्साहवर्धक असेल. संततीला त्यांच्या परीक्षेत किंवा कामात चांगले यश मिळू शकते. नोकरदारांना आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठांसोबत पदोन्नतीबद्दल चर्चा करू शकता. एखाद्याला महत्त्वाची माहिती देताना सावधगिरी बाळगा.  कौटुंबिक समस्या चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा.

    मकर – संपूर्ण दिवस संयम बाळगावा लागेल. विचारपूर्वक उचललेली पावले कामे पूर्ण करण्यास मदत करतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादामध्ये यश मिळेल. पैसे उधार घेतले असतील, तर ते आज परत करावे लागतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी जास्त प्रयत्न करा. वाहन चालवताना किंवा सहकाऱ्याकडून मदत घेताना सावधगिरी बाळगा.

    कुंभ – जोखमीचे उपक्रम टाळा. नशीबाची मोठी साथ मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यासोबत अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे सावध रहा. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.

    मीन –  काळजीपूर्वक विचार करून मगच निर्णय घेण्याची गरज आहे. संततीच्या करिअरबद्दल  काळजी वाटू शकते. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत एखाद्या लहान प्रवास करण्यासाठी दिवस चांगला आहे.  या प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जुलै 2026

    July 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026

    July 29, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 31, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 09…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जुलै 2026

    July 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026

    July 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 जुलै 2026

    July 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती

    July 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 379
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 513
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 819
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑगस्ट 2026

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.