Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आराध्याचे धाडस अन् शर्वाय…
    ललित

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यJuly 31, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, शर्वायचे आराध्यावर प्रेम, आराध्या शिवाची पुन्हा भेट, शर्वाय शिवा एकच, डबीचे गूढ, छोट्या डबीचे गूढ, आराध्याचे धाडस
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 36

    सुमित्रा आजी आणि वडील दिवाकर यांनी शर्वाय आणि आराध्याचं नातं मान्य होते. शर्वाय आता एकटा नव्हता. त्याच्या पाठीशी त्याच्या माणसांची मान्यता होती — आणि त्याचं प्रेम, आराध्या… त्याची ताकद होती. त्याला ती रात्र पुन्हा डोळ्यासमोर आली…

    त्या रात्री आराध्याने हळूच हात पुढे केला. तिच्या मुठीत एक छोटी चांदीची डबी होती…

    “ही… मी खूप दिवसांपासून देणार होते तुम्हाला,” ती म्हणाली.

    शर्वाय डबी पाहतो — ती अगदी जुनी, कोरलेली, अनेक वर्षांपूर्वीची वाटली…

    “कुठून मिळाली ही?” त्याने शांत स्वरात विचारलं.

    “मी सुमित्रा आजीसोबत त्यांच्या घरी गेले होते तेव्हा…”  आराध्या सांगू लागली…

    मी पुस्तक वाचत बसली होती. इतक्यात तुमच्या आई घाईघाईने येऊन म्हणाल्या… ‘आराध्या, तू तुझ्या खोलीत जा. बाहेर फिरू नकोस. कुणीही बोलावलं तरी बाहेर यायचं नाही.’ मला काहीच कळलं नाही. वातावरणात एक अस्वस्थ थंडी पसरली होती. मी शांतपणे आपल्या खोलीत गेले. खिडकीतून पाहिलं — वाड्याच्या मागच्या अंगणात काही माणसं खडबडाट करत होती. मोठ्या मोठ्या पेट्या आत नेल्या जात होत्या, ज्या झाकलेल्या होत्या. त्यात माधव काकाही होता — काहीतरी सूचना देत. मला वाटलं, ही सामान्य गोष्ट नाही. “हे काय चाललंय?” — माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठलं. तेवढ्यात दरवाज्याबाहेर एक सावली येऊन थांबली. हलकीशी खटखट.

    हेही वाचा – आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    ‘आराध्या… दार उघड…’ — माधवचा आवाज.

    मी गोंधळली. आजी आणि आनंदीने आधीच ताकीद दिली होती. पण आता दरवाजा जोरात ठोठावला जाऊ लागला.

    “आराध्या, तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय. लगेच ये…”

    माझं ह्रदय धडधडू लागलं. आता माझ्या समोर दोन पर्याय होते —

    दार उघडणं किंवा आत गुपचूप राहणं…

    तेवढ्यात, खिडकीतून  काहीतरी चमकलं — एक लहानसं कागदाचं पुडक होतं ते… बाहेर झाडाच्या फांदीवर कोणीतरी बांधून ठेवलं होतं. मी खिडकी उघडून तो कागद घेऊन वाचला. त्यावर फक्त तीन शब्द लिहिले होते :

    “विश्वास करू नको.”

    मी धास्तावले, कुणी तरी मला सावध करत होतं… माझा जीव घाबरून गेला होता… दारावर अजूनही मधून मधून ठोठवण्याचा आवाज येत होता, पण आता माधव काही बोलत नव्हता. मी दाराजवळ दबकत गेली आणि कान लावून ऐकू लागली.

    …शांतता.

    हळूहळू, मी मागे वळली… खिडकीजवळ आली आणि पलीकडे बघू लागली. सर्व वाडा एखाद्या रहस्यमय जाळ्यात गुंतल्यासारखा भासत होता. तेवढ्यात  माझ्या लक्षात आलं — खिडकीच्या खाली एक अरूंद चोरमार्ग आहे! वयस्कर माणसांसाठी नाही, पण तिच्यासारख्या बारीक मुलीसाठी सहज मावेल असा!

    थोड्याशा धडधडत्या मनाने मी तो चोरमार्ग निवडला. हळूहळू  मी  बाहेर आली… मागच्या अंगणाच्या दिशेने जाऊ लागली. तिथे अजूनही मोठ्या पेट्या हलविण्यात येत होत्या. एका कोपऱ्यात, माधव दोन अनोळखी माणसांबरोबर काहीतरी कुजबुजत होता. मी सावधपणे झाडांआड लपून ऐकू लागली…

    “गुरुजींना अजून काही दिवसांमध्ये सगळं सेट करायचं आहे,” माधव म्हणत होता.

    “शर्वाय आलाय तरी काही फरक नाही पडणार. आराध्या — या मुलीचं काम महत्त्वाचं आहे…”

    माझं रक्त च गोठून गेलं… “मुलीचं काम?”

    ते पुढे म्हणाले :

    “तिचं भविष्य, तिचं आयुष्य — सगळं आपल्या हातात येणार आहे. तिचा उपयोग करायचा आहे, मोठ्या योजनेसाठी.”

    मी हादरले. माझ्या भोवतीचं सगळं विश्व एकदम कोसळल्यासारखं वाटलं. मी सावधपणे मागे वळायला सुरुवात केली… पण पायाखालील वाळू सरकली आणि “खस्स” असा आवाज झाला. माधव आणि त्याचे साथीदार दचकून मागे वळले.

    “कोणी तरी आहे!” माधव जोरात ओरडला.

    मला धावण गरजेचं होतं… मी वेगाने झाडांआडून धावत सुटली… मागून पायांचे आवाज येऊ लागले, कोणी तरी माझ्या मागे लागलं होतं! मी जीवाच्या आकांताने धावत होती. वाऱ्याने झाडांची पाने जोरात सळसळत होती. मागे धावणाऱ्या पावलांचा आवाज प्रत्येक श्वासाला जड करत होता…

    सामोर एका जुनाट वाड्याचा पडका भाग दिसला — मी  तेथून आत घुसली. आत अंधार होता, धुळीचा वास आणि अस्ताव्यस्त पडलेल्या जुनाट वस्तू… मी एका मोडकळीस झालेल्या कपाटाच्या मागे दडली. मी श्वास रोखून बसले होते.

    बाहेर माधवचे शब्द घुमले – “ती सापडायलाच पाहिजे. नाही तर सगळं बिघडेल!”

    त्याचे साथीदार वेगवेगळ्या दिशेने पसरले. त्यांच्या टॉर्चच्या उजेडात मी डोळे मिटले. तेव्हा माझ्या हाताला कपाटाच्या आत काहीतरी गार गुळगुळीत वस्तू लागली. हळूच हात फिरवला…

    कसली तरी जुनी  डबी! ती उघडल्यावर आत एक छोटा कोड्यातला नकाशा आणि काही श्लोक लिहिलेले कागद दिसले.

    ती माणसं दूर गेले  तेव्हा मी तिथून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी गुरुजींना मी सांगितलं, तेव्हा त्यांनीच सांगितलं, “ती डबी तूच शर्वायला दे…”

    शर्वाय शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. तिच्या स्वरात कधी हलकी थरथर, कधी थांबलेला श्वास, कधी एखादा विस्मरणाचा प्रयत्न… आणि मध्येच ती डबी त्याच्या हातात ठेवताना आलेली ती नजरा नजर टाळण्याची धडपड — हे सगळं पाहताना त्याचं अंतर्मन हलून गेलं.

    आराध्या सांगत होती —

    सुमित्रा आजींसोबत वाड्यात गेलेला तो दिवस, त्या जुन्या पडक्या कोपऱ्यात मिळालेली ही डबी, तिच्यात असलेला गूढ स्पर्श, आणि ती गुपचूप आपल्याजवळ ठेवून ती आठवण जपणं. हे करताना ना कोणता आवाज केला तिने, ना मदत मागितली — फक्त वाट बघत राहिली योग्य क्षणाची!

    शर्वायचं मन सुन्न झालं….

    “तू… हे सगळं एकटीने केलंस?” त्याने विचारलं. त्याला थोडासा धक्का बसल्याचं जाणवत होतं.

    आराध्याने फक्त मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर एक अबोल पण ठाम शांतता होती…

    शर्वाय पुढे आला. डबी त्याच्या हातात असली तरी त्याचं लक्ष आता तिच्या डोळ्यांत. “आराध्या, तू इतका वेळ हे सारं स्वतःवर घेतलंस आणि मला काहीच सांगितलं नाहीस?”

    ती थोडा वेळ गप्प राहिली. मग तिने हळूच उत्तर दिल, “म्हटलं, हे असंच द्यायचं होतं तुम्हाला… कोणासमोर देऊ नये म्हणून थांबले.”

    त्याच्या काळजाला कोणीतरी हात घातला होता — ती जेव्हा एकटी झुंजत होती, तेव्हा तो कुठेच नव्हता!

    शर्वायने तिचे दोन्ही हात आपल्यात घेतले. “आराध्या, यापुढे काहीही एकटं पेलायचं नाही… ना तू, ना मी!”

    आराध्या ने हळूच डोकं हलवलं… आणि त्यांच्यामधली ती नाजूक पण अखंड झालेली जवळीक त्या संध्याकाळच्या ओलसर हवेसारखी त्यांच्यावर विसावली.

    शर्वायला आता हेही उमगत होतं — ही मुलगी फक्त त्याच्या प्रेमाची नव्हे, तर त्याच्या लढ्याची साक्षीदार ठरणार होती. ती त्याच्याही आधी एक लढवय्या झाली होती!

    तितक्यात दारावर बारीक टकटक ऐकू आली…

    आराध्याने दार उघडलं आणि एक क्षण थांबली — समोर दत्ता उभा होता. त्याचा चेहरा नेहमीसारखा शांत, पण डोळ्यांत एक तेज  आणि खुशीची किनार जाणवली. हातात एका साध्या बॅगेत कपडे — शर्वायसाठी.

    “बॉसचे कपडे… ते ओले झाले होते ना, म्हणून त्यांनी पाठवायला सांगितले,” तो म्हणाला. स्वरात नेहमीचा आदर, पण एक बारीक हास्य  विलसत होतं.

    आराध्याने हळूच विचारलं, “आत या? चहा, कॉफी  काही घ्याल?” इतक्या पावसातही कार्यमग्न असलेल्या दत्ताला थोडा विसावा मिळेल म्हणून तिने विचारलं.

    हेही वाचा – आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    दत्तानं फक्त एक क्षण तिच्याकडे पाहिलं, आणि मग नकारार्थी मान हलवत म्हणाला, “नको. मला जायचंय. बॉसना सांगा… पोहोचवले.”

    तो वळून निघून गेला — कुठेही थकवा नाही  ना कंटाळा, पण काहीसा विचारांत गढलेला…

    आराध्या दाराजवळ काही क्षण तशीच उभी राहिली. त्या बॅगेकडे बघत तिच्या मनात एक वेगळी जाणीव उमटत होती — शर्वायच्या जगातली प्रत्येक व्यक्ती आता जणू त्यांच्या नात्याच्या अस्तित्वाला आपापल्या पद्धतीनं स्वीकारू, पाहात होती…

    कदाचित दत्ता काहीतरी जाणत होता… किंवा जाणूनही तो शांत राहू पाहात होता.

    आराध्या हातात बॅग घेऊन आत वळली, पण मनात दत्ताचा  हसरा चेहरा  आणि  काही न बोलेले शब्द घुमत राहिले…

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026 ललित

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026 ललित

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    By डॉ. विवेक वैद्यJuly 31, 2026

    त्यादिवशी खुशबू माझ्याकडे आली तेव्हा तिच्याबरोबर एक लहान चणीची मुलगी होती. चेहरा ओढणीने झाकलेला होता.…

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती

    July 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 379
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 512
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 819
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.