Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026

    अमनजोतची कमतरता जाणवेल… अमोल मुजुमदार

    May 4, 2026

    मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    May 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!
    फूड काॅर्नर

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेMay 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, स्वादिष्ट सुशीला, न्याहारीतील वैविध्य, मराठमोळी न्याहाळी, चुरमुऱ्यांची सुशीला, कुरमुऱ्यांची सुशीला, सकाळची न्याहारी सुशीला, मनात घर करणारी सुशीला, सुशीला खाद्यपदार्थ, फोडणीचे चुरमुरे, फोडणीचे कुरमुरे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    एकदा न्याहारी करायला ऑफिसमधली मंडळी बसलेली असताना मी एकाला विचारलं, “काय आणलंय रे बाबा डब्यात?”

    ‘माणिक पैंजण’ आहे म्हणाला. पैंजण रुणझुणले अगदी कानात आणि मी मनात म्हटलं, काहीतरी खास चीज आता पोतडीतून… नाही डब्यातून बाहेर पडणार बहुतेक! माझी आणि इतरांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आणि त्याने डबा उघडला… एकाने डब्यात डोकावून पाहिलं आणि म्हणाला, “अरे, हा तर ‘मनोहरा’! आम्ही त्याला ‘मधुबाला’ पण म्हणतो.”

    एक जण म्हणाला, “अरे, हा तर चपातीचा कुस्करा.” मी म्हणालो, “ही तर आमची ‘फोपो’, म्हणजे फोडणीची पोळी.”

    दृष्टिहीन माणसांनी, हत्तीचं जसं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन केलं, तसंच एकाच पदार्थाची ही वेगवेगळी संबोधनं ऐकून मी अवाक् झालो.

    घरी गेल्यावर बायकोला म्हणालो, “कधीतरी आपल्याकडे ‘माणिक पैंजण’ कर की, सकाळी खायला.”

    ‘बरा आहेस ना?’ अशा नजरेने बायको बघतच राहिली माझ्याकडे… “अगं म्हणजे, आपली फोडणीची पोळी गं,“ असं म्हटल्यावर जीव भांड्यात पडला तिचा.

    एकदा एक जण डब्यात ‘सुशिले’ला घेऊन आला… हे पण काहीतरी नवं होतं माझ्यासाठी. आवडलं खूप, हे नाव पण आणि पदार्थ पण!

    घरी आल्यावर बायकोकडे तगादा लावला, “सुशीला कर”, “सुशीला कर म्हणून.”

    “काय एकएक नवीननवीन पदार्थ खाऊन येतो रे, मला कामाला लावायला?  नसता ताप उगाच… करीन जमेल तेव्हा! शांत रहा जरा. आधीच का कटकटी कमी आहेत? त्यात तुझी ही भुणभुण… पाचवीला पूजलेली माझ्या…” हे उद्गार तर सवयीचे, अंगवळणी पडलेले इतक्या वर्षांच्या सहवासानंतर!

    हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!

    नंतरचे दोन शनिवार, रविवार असेच भाकड गेले. सुशीला स्वप्नातच राहिली माझ्या… अवतरलीच नाही प्रत्यक्षात. मी म्हणालो तिला, “अगं, चुरमुऱ्याचा हा साधासा पदार्थ करून घालायला, किती अंत बघतेस माझा? जरा दयामाया आहे का नाही तुला?”

    हा घाव मात्र वर्मी बसला होता… “करूया या शनिवारी,” असं आश्वासन मिळवलंच मी, खनपटीला बसून.

    शनिवार उजाडला. भीतभीत, हळूच आठवण करून दिली, आश्वासनाची! “आहे लक्षात माझ्या, चुरमुरे घेऊन ये जाऊन. बाकी जिन्नस आहेत घरात.”

    चुरमुरे साधे, का भडंगाचे यावर चर्चा झडली. दोनचार व्हीडिओ बघितले आणि सर्वानुमते साधे चुरमुरे आणायचं मुक्रर झालं. मी लगोलग निघालो, मोहिमेवर… चुरमुरे, चिरमुरे, कुरमुरे का मुरमुरे, हा मला छळत आलेला, अनादी प्रश्न आहे. ‘बालदी’ का ‘बादली’ हा जसा न सुटणारा घोळ, तसाच हा! मी आपला चुरमुरे म्हणत आलोय आणि तेच म्हणत राहीन आजन्म.

    पूर्वी हे चुरमुरे ज्याच्याकडे मिळायचे त्याला ‘भडभुंजा’ म्हणायचे. हल्ली हा शब्द, आणि ही अशी दुकानं पण नामशेष झालीत. नाही म्हणायला, कल्याणला टिळक चौकात, एक तत्सम दुकान अजूनही तग धरून आहे… आमच्या वाण्याकडे, प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेले चुरमरे होते. भली मोठी पिशवी होती अगदी. मी घेतली ती आणि आलो मिरवीत घरी. ती पोत्यासारखी दिसणारी चुरमुऱ्याची पिशवी बघताच बायकोचा फ्यूज उडाला…

    “गोडबोल्यांच्या सात पिढ्या खातील यात,” असं म्हणत माझ्या व्यवहारज्ञानाच्या चिंधड्या उडवल्या तिने   आणि माझी दातखीळच बसली. ‘दे रे वाणी, घे रे प्राणी’ ही म्हण तंतोतंत लागू आहे तुला,” हे ऐकतच माझ्या शनिवारची सुखद सुरुवात झाली.

    “आणा इकडे,” म्हणत त्या पोत्याचा ताबा घेतला गेला आणि आवश्यकतेएवढे चुरमुरे काढून घेतल्यावर, उरलेला ऐवज बघून तिच्या बोलण्याची सत्यता कळली मला. “जाऊदे, भेळ वगैरे करून संपवू आता,” असं म्हणून तह झाल्यावर, मी निवांत झालो.

    मग चुरमुरे चाळणीत घेतले… वाहत्या पाण्यात, गिचका न होईल अशा बेताने भिजवून घेतले आणि मग आपण पोहे करतो तीच पद्धत वापरून फोडणीस टाकले… सढळ हाताने डाळं आणि शेंगदाणेही घातले, मला आवडतात म्हणून! या ‘सुशिले’ला मग खोबरं आणि कोथिंबीर घालून मस्त सजवली आणि ती आमच्या खाद्यदरबारात पेश केली गेली.

    हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!

    पहिलाच घास… बायकोची उत्सुकता, ती शमवणारी माझी उत्स्फूर्त दाद… आणि आणखी एक बशीभर सुशीला पोटात गेल्यावरच माझा आत्मा तृप्त झाला! बायकोची मिनतवारी करून तोंडी लागलेली सुशीला, मनात अगदी घर करून बसली.

    “बरं झालं हो, एक छान पदार्थ सापडला न्याहारीला” म्हणत, मलाही पोचपावती मिळाली आणि माझा शनिवार सत्कारणी लागला. कोकणात नाही, पण मराठवाडा आणि सोलापूर वगैरे भागात अगदी सर्रास होणारा हा पदार्थ नावाप्रमाणेच अगदी ‘सुशील’ वाटला मला. बघा तुम्ही सुद्धा खाऊन एकदा. नक्की आवडेल, खात्री आहे मला!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    By माधवी जोशी माहुलकरMay 1, 2026

    ‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे…

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026

    अमनजोतची कमतरता जाणवेल… अमोल मुजुमदार

    May 4, 2026

    मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    May 4, 2026

    Dnyaneshwari : कैसें चहूं भुजांचें सांवळें, पाहतां वोल्हावती मन डोळे

    May 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 287
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 407
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 203
    • मैत्रीण 18
    • ललित 602
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026

    अमनजोतची कमतरता जाणवेल… अमोल मुजुमदार

    May 4, 2026

    मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    May 4, 2026
    Most Popular

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.