Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव
    अवांतर

    विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव

    Team AvaantarBy Team AvaantarJune 18, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, TC, Without_ticket, railway_fine, Central_Railway
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अजित गोगटे

    गेल्या आठवड्यात मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काहीजण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर, सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे, हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल?

    रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी खाली काही अनुभव देत आहे. यातील काही अनुभव प्रत्यक्ष माझ्याबाबतीत घडलेल्या घटना आहेत.

    बच्चों का Fine नही लेते!

    Jurassic Park हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हाची गोष्ट. त्या चित्रपटाच्या जाहिराती वृत्तपत्रात यायच्या आणि त्यात डायनोसॉरचे चित्र ठळकपणे असायचे. माझा मुलगा तेव्हा लहान होता. त्याला सफाईदारपणे वाचता येत नव्हते, पण चित्र पाहून त्याला समजायचे. त्याने ती जाहिरात पाहिली आणि ते काय आहे? असे विचारले. मी त्याला चित्रपटाविषयी माहिती दिली. तो चित्रपट पाहण्यासाठी मागे लागला. परंतु चित्रपट हॉलिवूडचा असल्याने त्याला त्यातील इंग्रजी संवाद कळणार नाहीत, असा विचार करून मी त्याची समजूत काढली.

    काही दिवसांनी हिंदीमध्ये ‘डब’ केलेला तो चित्रपट प्रदर्शित झाला. असा हिंदीमधील चित्रपट कल्याणजवळील विठ्ठलवाडी येथील श्रीराम टॉकिजमध्ये लागला होता. रविवारी सुट्टी होती, तेव्हा तो हिंदी चित्रपट दाखवायला मुलाला न्यायचे मी ठरविले.

    हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन

    रेल्वेने अंबरनाथ, कर्जत लाइनवर गेल्यास विठ्ठलवाडी हे कल्याणनंतरचे लगेचचे स्टेशन. स्टेशनवर गेलो तर तिकिटाला प्रचंड मोठी रांग होती. रांगेत उभे राहून तिकीट काढले तर, लोकल जाईल आणि चित्रपटही चुकेल, हे लक्षात आले. ‘एकच स्टेशन जायचे आहे. जाऊ या विनातिकिट. ‘टीसी’ आला तर भरू दंड’, असा विचार करून मुलाला घेऊन धावत लोकल पकडली. दोनच मिनिटांचा प्रवास असल्याने गर्दीतून डब्यात आत न जाता पॅसेजमध्येच उभा राहिलो. लोकल सुरू झाली आणि माझ्या बाजूलाच उभ्या असलेल्या ‘टीसी’ने तिकीट विचारले. मी तिकीट नसल्याचे सांगून 100 रुपयांची नोट त्याच्या हाती दिली.

    तेवढ्यात विठ्ठलवाडी स्टेशन आले. ‘टीसी’ आम्हाला सोबत घेऊन खाली उतरला. त्याने दंडाची पावती बनवून माझ्या हाती दिली. ती 52 रुपयांची होती. (50 रुपये दंड आणि दोन रुपये प्रवासाचे भाडे)

    यावेळी मी आणि टीसी यांच्यात काहीसा असा संवाद झाला :

    मी : गाडी व्हीटी से आयी थी. फिर भी आपने सिर्फ कल्यान से विठ्ठलवाडीतकही किराया क्यों लिया?

    टीसी : गाडी व्हीटी से आयी थी, पर आप तो कल्यान में गाडी में चढे!

    मी : आप या पॅसेंजर कुछ भी कहें. लेकिन रूल के मुताबिक आप को गाडी जहाँ से आयी वहाँ से किराया लेना चाहिये. आप उतना किराया लीजिये.

    टीसी : आप जंटलमन है, इसलिये यह कह रहे हे. लेकिन आप मेरे साथही कल्यान से गाडी में चढे, यह मैंने खुद देखा है. इसलिये मैं आपसे व्हीटी से किराया नहीं वसूल कर सकता.

    मी : आपने सिर्फ मेरा फाइन लिया है. लेकिन मेरा लडका भी मेरे साथ है. उसका भी पूरा फाइन और आधा किराया आप लीजिये.

    टीसी : बच्चा छोटा और नासमझ है. आपने बिनाटिकट लाया इसलिये वह आया. अपने मर्जी से वह बिनाटिकट नहीं आया.

    मी : आप कह रहे हैं वह बिलकूल सही हैं. इसीलिए बच्चे का भी फाइन और किराया ले लो, ऐसा मेरा कहना है.

    टीसी : आपने कहा ठीक है. लेकिन मैं बच्चे का फाइन नहीं ले सकता.

    शेवटी त्या टीसीने आधीची पावती रद्द करून नवी बनवायला लागेल, अशी सबब सांगून, होती तीच पावती आणि राहिलेली रक्कम मला दिली. माझ्या एकूण बोलण्यावरून कुतूहल वाटल्याने त्याने मला, ‘आप क्या करते हो?’, असे विचारले. ‘मै इंडियन एक्स्प्रेस ग्रुप के मराठी अखबार का रिपोर्टर हूँ,’ असे मी उत्तर दिले. तो टीसी सिंधी होता आणि उल्हासनगरला राहणारा होता. माझे उत्तर ऐकून तो म्हणाला, ‘मेरे साले भागू तरनेजा इंडियन एक्स्प्रेस के उल्हासनगरके रिपोर्टर है. आप पहले बताते तो मैं बनाया वो रिसीट भी नहीं बनाता.’

    यावरून त्या टीसीने मी पैसे द्यायला तयार असूनही नियमानुसार दंडवसूली न करून रेल्वेचा महसूल बुडविला, हे स्पष्ट दिसते. शिवाय ‘मी प्रेस रिपोर्टर आहे’, असे सांगितले असते तर विनातिकrट असूनही माझ्याकडून अजिबात दंड न घेण्याचीही त्याची तयारी होती.

    हेही वाचा – नातवंडांचे वजन करणारे आजोबा!

    नियम बाजूला ठेवून मनमानी

    विनातिकीट प्रवास करण्याच्या 12 वर्षांच्या कालखंडातच एकेवर्षी देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी मी ऑफिसला जाताना तशाच पद्धतीने कल्याण ते व्हीटी हा प्रवास केला. लोकल रिकामी होती आणि दादरच्या पुढे तर डब्यामध्ये मी एकटाच प्रवासी होतो. गाडी मस्जिद बंदर स्टेशनमधून सुटत असताना टीसी डब्यात चढला. त्याने मला तिकीट विचारले. मी पाकिटात बाजूला काढून ठेवलेली 100 रुपयांची नोट त्याला दिली. तोपर्यंत व्हीटी स्टेशन आले. आम्ही दोघे गाडीतून खाली उतरलो.  आधीच्या प्रसंगाप्रमाणे याही वेळी टीसीने मला 54 रुपयांची पावती बनवून हातात दिली. त्याने 50 रुपये दंड आणि दादरपासूनचे तिकिटाचे पैसे अशा रकमेची पावती बनविली होती. गाडी कर्जतहून आली होती. त्यानुसार कर्जतपासूनचे भाड्याचे पैसे घ्यावे, असा मी आग्रह धरला. परंतु टीसीने तसे केले नाही.

    या टीसीच्या शर्टावर ‘नेम बॅज’ लावलेला नव्हता. त्यामुळे मी त्याचे नाव विचारून घेतले. ऑफिसात जाऊन मध्य रेल्वेच्या मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांच्या (Chief Divisional Commercial Manager) नावे, तुमच्या टीसीने रेल्वेचा महसूल कसा बुडविला याचा तपशील देऊन त्याच्यावर कारवाई करण्यची मागणी करणारा अर्ज तयार केला. दुसर्‍या दिवशी तो अर्ज रेल्वेच्या संबंधित ऑफिसात देऊन रीतसर पोच घेतली. त्यानंतर सहा महिने मी पाठपुरावा केला. परंतु त्या टीसीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

    प्रवाशाने सांगूनही न ऐकणे

    एकदा बोरिबंदर स्टेशनमधून बाहेर पडत असताना टीसीने मला तिकिट विचारले. अर्थात, माझ्याकडे तिकीट किंवा पास नसल्याने मी दंडाची रक्कम त्याला दिली. या टीसीने मात्र 68 रुपयांची पावती बनविली. यात 50 रुपये दंड आणि गाडी अंबरनाथहून आली होती म्हणून तिथपासूनचे दुसर्‍या वर्गाचे भाडे 18 रुपये होते. मी पहिल्या वर्गाने आलो, त्यामुळे दंडाखेरीज माझ्याकडून पहिल्या वर्गाचे भाडे घ्या, असे मी सांगूनही टीसीने तसे केले नाही.

    (क्रमश:)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026 अवांतर

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026 अवांतर

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    By तृप्ती देवAugust 20, 2026

    हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या…

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    स्वत:ला सांभाळूया…

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 ऑगस्ट 2026

    August 25, 2026

    अनपेक्षित

    August 24, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – घोटाळे, निवृत्ती, भाग्यवृद्धी

    August 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 408
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 549
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 874
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु

    August 25, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.