दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 01 कार्तिक शके 1948; तिथि : व्दादशी 14:35; नक्षत्र : पू. भाद्रपदा 21:02;
- योग : ध्रुव 22:07; करण : कौलव 26:11;
- सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ 15:03; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:11;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रकाशक मधुकाका कुलकर्णी
टीम अवांतर
प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी प्रसिद्ध असणारे प्रकाशक मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 रोजी झाला. दामोदर दिनकर कुलकर्णी हे त्यांचे मूळ नाव मात्र मराठी साहित्य वर्तुळात ते मधुकाका या नावानेच ओळखले जात. 1947 ते 1962 या काळात पुण्यातील कॉन्टीनेन्टल प्रकाशन येथे तसंच 1962 ते 1967 या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केलं.
पुढे 1968 साली त्यांनी स्वतःच्या श्रीविद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. श्रीपाद जोशी यांचे ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक या संस्थेचं पहिलं प्रकाशन होतं. नवनवीन विषयांची हाताळणी, उत्तमोत्तम पुस्तकांची निर्मिती हे त्यांच्या प्रकाशन संस्थेचे वैशिष्ट्य ठरलं. ललित आणि शैक्षणिक या विभागातील एक हजारांवर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. ‘आंबेडकरी चळवळ’, ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘काबूलनामा’, ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’, ‘मेड इन इंडिया’, ‘लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक’ ही त्यांनी प्रकाशित केलेली काही महत्वाची पुस्तकं होत.
हेही वाचा – मी शिव आहे… मी चिदानंद आहे!
मधुकाका हे केवळ प्रकाशक नव्हते तर ते कार्यकर्तेही होते. त्यामुळेच विविध समित्या, साहित्य परिषदेत त्यांनी पदाधिकारी म्हणून देखील काम केलं. प्रकाशन व्यवसायाकडे फक्त व्यवहार म्हणून न बघता त्यांनी जिव्हाळा जपला. त्यांच्या याच जिव्हाळ्यातून अनेक मान्यवर लेखक श्रीविद्या प्रकाशन संस्थेशी जोडले गेले.
पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, डॉ. य. दि. फडके, डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. अरुण टिकेकर, संजीवनी खेर, लता राजे यांच्यापासून नव्या पिढीतील अतुल धामणकर, आदित्य गोखले, डॉ. स्वाती गानू यांच्यापर्यंत अनेक नामवंत लेखकांची पुस्तके श्रीविद्या प्रकाशकडून प्रकाशित केली.
पु. लं.पासून जयंत नारळीकरांपर्यंत अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकांचे हक्क मधुकाकांकडे दिले होते. मुंबईत 3 जून 1990 रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचं अध्यक्षपद मधुकाका कुलकर्णी यांनी भूषविलं होतं. ‘प्रकाशकनामा’ हे त्यांचं आत्मचरित्र देखील प्रसिध्द झाले.
22 फेब्रुवारी 2000 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी 2018 रोजी पुणे महापालिकेच्या वतीने प्रभात रोड गल्ली क्रमांक 14 मधील आयकर भवनच्या चौकाला मधुकाका कुलकर्णी चौक असे नाव देण्यात आलं.
आजचे राशिभविष्य
मेष – आज तुमची मेहनत, शहाणपण आणि कार्यनिष्ठा यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. तुम्ही एक मोठा आर्थिक निर्णय घेण्याचा विचार कराल, जो भविष्यातील नफ्याचा पाया घालू शकतो. भागीदारीतूनही अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परिणाम मिळू शकतात. नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक नवीन संधी आशेचा किरण ठरेल. आज स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा, कारण तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेणार आहेत.
वृषभ – आज दिवसभरात एखाद्या समस्येवर हळूहळू तोडगा निघू शकतो, ज्यामुळे तुमच्यावरील भार हलका होईल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अभिमान येईल. मात्र या आनंदांमुळे तुमचे लक्ष तुमच्या ध्येयांपासून विचलित होऊ देऊ नका. आज, जर तुम्ही उत्साह आणि शिस्त टिकवून ठेवली, तर यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा सोपा होऊ शकतो.
मिथुन – अनुभवी कुटुंब सदस्यांचा सल्ला यामुळे आज कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे शक्य होईल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेण्याऐवजी प्रत्येक पैलूचा विचार करणे फायदेशीर ठरेल. संततीशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडताना, त्यांच्या विचारांची आणि भावनांची जाणीव ठेवा. व्यावसायिकांसाठी, नवीन योजना आणि नवनवीन कल्पना फायदेशीर संधी निर्माण करू शकतात. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, तुमची समज आणि इतरांबद्दलची तुमची संवेदनशीलता यामुळे आज तुम्हाला पुढे जाण्यास मदत होईल.
कर्क – आजच्या उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या एखाद्या प्रकल्पाला गती मिळेल. यामुळे तुमच्यात नवीन उत्साह निर्माण होईल. जोडीदारासोबत घालवलेले सुंदर क्षण तुमच्या नात्यातील प्रेम आणि जवळीक वाढवतील. नकारात्मक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास दिलासा मिळेल. संततीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, रागाने किंवा कठोरपणे बोलण्याऐवजी प्रेमाने बोला.
सिंह – आज काहीजण तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, पण संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यातून मार्ग काढाल. आपले लक्ष फक्त आपल्या ध्येयावर ठेवा. मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. काहीतरी नवीन सुरू करण्याची कल्पनाही दृढ होऊ शकते. पुढे जाण्यापूर्वी आपल्या हातातील साधनसामुग्रीचे नियोजन आणि मूल्यांकन नक्की करा. आज, तुमचा विजय केवळ तुमच्या विरोधकांना मागे टाकण्यात नाही, तर स्वतःच्या ध्येयावर सतत लक्ष केंद्रित करण्यातही आहे.
कन्या – आज तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही व्यस्त राहाल, पण जर तुम्ही तुमच्या योजनेनुसार काम केले, तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. मात् आर्थिक बाबींमध्ये थोडासा निष्काळजीपणा देखील नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो, म्हणून कोणतेही आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि आपली प्रतिभा विकसित करण्याची प्रेरणा मिळू शकते. अभ्यासावर नियमितपणे लक्ष केंद्रित केल्याने त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल.
तुळ – उत्पन्नाचे नवीन मार्ग आज खुले होऊ शकतात. तुम्ही अनावश्यक वादांमध्ये तुमची ऊर्जा वाया घालवू नका. स्वतःच्या विवेकबुद्धीने योग्य संधी ओळखण्यास आणि त्यांचा फायदा घेण्यास मदत होईल. कुटुंबातील एक जुना गैरसमज दूर होऊन नात्यांमधील जवळीक पुन्हा निर्माण होऊ शकते. कोणत्याही वादावर घाईघाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी, तथ्यांच्या आधारावर निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी खास प्रयत्न करणे आवश्यक आहे.
वृश्चिक – आर्थिक बाबींमध्ये आज दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटेल. तुम्हाला कोणतीही जबाबदारी दिल्यास, ती पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचोटीने पार पाडाल. सरकारी कामासाठी कागदपत्रे आणि नियमांकडे आज दुर्लक्ष करू नका. आर्थिक लाभाच्या शक्यतेसोबतच, आज जबाबदाऱ्याही वाढू शकतात. निर्णय घेताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. स्वतःच्या यशाचा उपयोग मजबूत पाया तयार करण्यासाठी करा.
हेही वाचा – मानवी मेंदूची खरी क्षमता किती?
धनु – आजचा दिवस तुमची परीक्षा बघणारा असेल. मात्र संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही त्यातून मार्ग काढाल! कामाशी संबंधित एखाद्या निर्णयाबद्दल तुम्ही साशंक असाल. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी, आवश्यक माहिती गोळा करा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. बँकेकडून कर्ज किंवा आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एखाद्या प्रकल्पावर पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकेल. संततीच्या दिनचर्येकडे आणि मित्रांच्या संगतीकडे लक्ष देणे आज महत्त्वाचे ठरेल.
मकर – आज प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुमच्या मेहनतीमुळे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वाढू शकते. तुमच्या कार्यनिष्ठेचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवेल. व्यावसायिकानी नवीन वाटाघाटींमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनोळखी व्यक्तीच्या प्रस्तावावर लगेच विश्वास ठेवू नका आणि आवश्यक कागदपत्रे व अटींची खात्री करून घ्या. योग्य लोकांसोबत काम करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे तितकेच महत्त्वाचे असेल.
कुंभ – स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आज शहाणपणाचे ठरणार नाही. स्वतःच्या कामासाठी घाई करणे टाळा. एका लहान चुकीचाही तुमच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पूर्ण करा. कार्यालयात तुमच्या सल्ल्याला, अनुभवाला आणि कार्यक्षमतेला महत्त्व दिले जाऊ शकते. आज तुमची ऊर्जा योग्य दिशेने लावा. इतरांच्या बोलण्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
मीन – आज पैशाच्या बाबतीत थोडी अधिक सावधगिरी बाळगल्यास तुम्ही मोठ्या संकटातून वाचू शकता. आज मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय पुढे ढकलणे उत्तम राहील. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या बाबतीत, अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आज कुटुंबाप्रती असलेली स्वतःची जबाबदारी पार पाडणे महत्त्वाची असेल. आर्थिक बाबतीत संयम बाळगा आणि केवळ झटपट नफ्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नका. वडिलांच्या तब्येतीच्या काही कुरबुरी असतील, त्यावर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.


