Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!
    ललित

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 30, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अनिकेत पुरंदरेचा अपघात, मुलगी सृष्टीचा मृत्यू, पत्नी सानिकाचा मृत्यू, आयव्हीएफमार्फत भ्रूण, अनिकेत आणि सानिकाचा अंश, अनिकेत सानिकाची आयव्हीएफ ट्रीटमेन्ट, अनिकेत सानिकाचे भ्रूण, अनिकेत पुरंदरेचा कायदेशीर लढा, ॲड विभा शेलार यांचा युक्तिवाद, ॲड राघव आपटे यांचा युक्तिवाद, संकर्षण, अनिकेत पुरंदरेचा जबाब, पिता अनिकेतचा जबाब, अनिकेतचे न्यायालयात कथन
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    भाग – 6

    चार वर्षांपासून सुरू असणारी ही केस आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली होती. आज अतिशय एक महत्त्वाची व्यक्ती या संदर्भातील काही विशेष बाबींवर प्रकाश टाकणार होती… जैव-नैतिकता तज्ज्ञ (Bioethicist) प्रा. शशांक कुलकर्णी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे होते. गेली वीस वर्षे ते वैद्यकीय नैतिकता, अवयवदान, IVF आणि प्रजनन अधिकारांवर अभ्यास करत होते.

    ॲड. राघव आपटे यांनी सुरुवात केली…

    “प्राध्यापक, मृत व्यक्तीची स्पष्ट संमती उपलब्ध नसताना तिच्या भ्रूणचा वापर करणे, नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह आहे का?”

    “हो.”

    “का?”

    “कारण, आपण त्या व्यक्तीच्या इच्छेबद्दल निश्चितपणे काही सांगू शकत नाही.”

    “म्हणजे, तिच्या मृत्यूनंतर तिला काय हवं होतं, हे आपल्याला माहीत नाही.”

    “बरोबर.”

    राघव आपटे समाधानाने जागेवर येऊन बसले. त्यांना अपेक्षित उत्तर मिळालं होतं.

    हेही वाचा – संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    ॲड. विभा शेलार युक्तिवादासाठी उभ्या राहिल्या.

    “प्राध्यापक, एक साधा प्रश्न आहे.”

    “मृत व्यक्तीची इच्छा निश्चितपणे सांगता येत नसते, हे आपण म्हणालात…”

    “हो.”

    “म्हणून तिच्या संमतीशिवाय भ्रूण वापरणे नैतिकदृष्ट्या प्रश्न निर्माण करते.”

    “हो.”

    विभां काही क्षण थांबल्या…

    “मग मला सांगा…”

    त्यांचा आवाज आता अधिक गंभीर आणि प्रभावी झाला,

    “त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय भ्रूण नष्ट करणे नैतिकदृष्ट्या प्रश्न निर्माण करत नाही का?”

    प्राध्यापक अनपेक्षित प्रश्नाने क्षणभर गोंधळले. राघव आपटे लगेच सावध झाले.

    विभा पुढे म्हणाल्या, “कारण मला इथे एक मूलभूत विसंगती दिसते. विरोधी पक्ष म्हणतो की, सानिका पुरंदरे यांची स्पष्ट परवानगी उपलब्ध नाही. म्हणून भ्रूण वापरता येणार नाही. पण मग ते भ्रूण नष्ट करण्याची परवानगी कुणी दिली? तशी स्पष्ट परवानगी किंवा तशा सहमती पत्रावर किंवा करारनाम्यावर सानिका पुरंदरे यांची स्वाक्षरी आहे का? अशी कागदपत्रे आपल्याकडे आहेत का?”

    कोर्टात कुजबूज सुरू झाली.

    “सानिका पुरंदरे यांनी लेखी स्वरूपात ‘माझ्या मृत्यूनंतर हे भ्रूण नष्ट करा,’ असे कुठे लिहिले आहे का?”

    “नाही…” प्राध्यापक म्हणाले.

    “म्हणजे भ्रूण नष्ट करण्याचा निर्णय देखील आपण त्यांच्या इच्छेबद्दल अंदाजच बांधत एकट्या अनिकेतच्या स्वाक्षरीने घेणार आहोत?”

    “तांत्रिकदृष्ट्या… हो,” प्राध्यापक म्हणाले.

    “म्हणजे आपण एका बाजूला म्हणतो आहोत — ‘संमती नाही म्हणून वापरता येणार नाही…’ आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो आहोत — ‘संमती नसली तरी नष्ट करता येईल…’ हे परस्परविरोधी नाही का?”

    राघव आपटे लगेच उभे राहिले…

    “माय लॉर्ड, विरोधी वकील चुकीची समानता निर्माण करत आहेत. जन्म देणे आणि नष्ट करणे या दोन वेगळ्या कृती आहेत.”

    “नक्कीच वेगळ्या आहेत…” विभा म्हणाल्या, “पण दोन्ही निर्णय कोणाच्या तरी वतीने घेतले जात आहेत. दोन्ही ठिकाणी सानिका पुरंदरे स्वतः उपस्थित नाहीत. दोन्ही ठिकाणी आपण त्यांच्या इच्छेबद्दल अनुमान लावत आहोत. मग एका अनुमानाला कायदेशीर मान्यता आणि दुसऱ्याला पूर्ण नकार… असं कसं?”

    न्यायमूर्ती प्रधान आता स्वतः टिपणं घेत होते. ते विचारमग्न होते.

    विभा पुढे म्हणाल्या, “माय लॉर्ड, माझे म्हणणे असे नाही की, न्यायालयाने सानिका पुरंदरे यांच्या इच्छेचा अंदाज बांधावा. माझे म्हणणे एवढेच आहे की, जर मृत व्यक्तीची इच्छा अज्ञात असेल, तर न्यायालयाकडून कमीत कमी अपरिवर्तनीय निर्णय घेण्यात यावा”

    “अपरिवर्तनीय? नेमकेपणाने सांगता येईल का?” न्यायाधीशांनी विचारलं.

    विभा म्हणाल्या, “कारण भ्रूण न वापरता तसाच गोठलेला ठेवला तर तो भविष्यात वापरण्याचा पर्याय उपलब्ध राहू शकतो. पण एकदा तो नष्ट केला तर, तो पर्याय कायमचा संपतो.”

    प्राध्यापक कुलकर्णी काही क्षण विचार करून मग म्हणाले, “नैतिक तत्त्वज्ञानात याला ‘least irreversible harm’ म्हणजेच कमी अपरिवर्तनीय परिणाम असलेला पर्याय निवडणे असे म्हटले जाते.”

    राघव आपटे लगेच म्हणाले, “पण त्याचा अर्थ असा नाही की, जन्म देणेच योग्य ठरते.”

    “नाही,” प्राध्यापक म्हणाले, “पण याचा अर्थ इतकाच की, नैतिक प्रश्न दोन्हीही बाजूंना आहेत.”

    त्या क्षणी प्रथमच न्यायालयात एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली होती. आजवर विरोधी पक्ष वारंवार एकच प्रश्न मांडत होता —

    “मृत व्यक्तीची संमती नसताना भ्रूण वापरता येईल का?”

    पण विभा शेलारांना आज तो प्रश्नच बदलून टाकला होता —

    “मृत व्यक्तीची स्पष्ट संमती नसताना भ्रूण नष्ट तरी कसा करता येईल?”

    आणि या नव्या प्रश्नाचे समर्पक उत्तर ना विरोधी पक्षाकडे होतं ना प्राध्यापक कुलकर्णी यांच्याकडे होतं.

    विभा शेलारांच्या या आक्रमक प्रश्नाने केसची दिशाच पलटली गेली होती.

    0000

    न्यायालयातील अनेक सुनावण्या, तज्ज्ञांच्या साक्षी, कायदेशीर युक्तिवाद आणि प्रतियुक्तिवादानंतर न्यायमूर्ती प्रधानांनी आज प्रथमच अनिकेतला बोलण्याची संधी दिली.

    “मिस्टर पुरंदरे, या प्रकरणाचा अंतिम निर्णय देण्याआधी तुम्हाला काही मांडायचे आहे का? कृपया तुमचे म्हणणे साक्षीदारांच्या पिंजर्‍यात उभे राहून कोर्टापुढे मांडा.”

    अनिकेत उभा राहिला. आज त्याचा आवाज मात्र स्थिर होता…

    “माय लॉर्ड, गेली साडेचार वर्षे या न्यायालयात माझ्याबद्दल बरेच काही बोलले गेले. माझ्या हेतूंवर प्रश्न उपस्थित झाले. माझ्या निर्णयांवर चर्चा झाली. पण आज मला व्यक्त होण्याची संधी न्यायालयाने दिली त्या साठी आपले आभार.”

    तो काही क्षण थांबला. संपूर्ण न्यायालय त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत होते.

    “माझे आणि सानिकाचे सहजीवन अत्यंत सुंदर होते. आमच्यातील प्रेम कधी कमी झालेच नाही. आम्हाला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे. आमचे मित्र, नातेवाईक, शेजारी… सर्वजण आम्हाला प्रेमीयुगूल म्हणूनच संबोधायचे.”

    त्याचा गळा किंचित भरून आला.

    “या अपघाताला आता सहा वर्षे झाली आहेत. पण मी पुन्हा विवाह करण्याचा विचार करू शकत नाही. माझ्यासाठी तिचे अस्तित्व संपलेले नाही. ती एक आदर्श पत्नी होती… आहे… आणि राहील….”

    “मी इतर कोणालाही उद्देशून बोलत नाही. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार आहे. पण माझ्यासाठी… माझ्यासाठी सानिकाच माझी पत्नी आहे. विरोधी पक्ष वारंवार म्हणतो की, सानिकाची संमती मिळू शकत नाही, हे सत्य आहे. ती आज इथे नाही. ती स्वतः येऊन तिचे मत सांगू शकत नाही. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर त्या अपघातात सानिकाऐवजी माझा मृत्यू झाला असता… आणि ती जिवंत राहिली असती… तर तिने हे भ्रूण नष्ट करण्याची परवानगी दिली असती का?”

    “याचे उत्तर मीच देतो, कारण मी तिला ओळखतो इतर कोणापेक्षाही जास्त! मी हे खात्रीने सांगू शकतो… तिने कधीच तसे केले नसते…”

    राघव आपटे उठण्याचा प्रयत्न करत होते… पण न्यायमूर्तींनी हाताने त्यांना थांबवले.

    “त्यांना पूर्ण बोलू द्या.”

    अनिकेत पुढे म्हणाला, “माय लॉर्ड, आम्ही दोघांनी मिळून हा प्रवास सुरू केला होता. हे भ्रूण एखाद्या प्रयोगशाळेतील नमूना नाही. तो आमच्या आयुष्याचा एक भाग आहे. आमच्या अपूर्ण स्वप्नांचा एक भाग आहे.”

    त्याने काही क्षण डोळे मिटले.

    “मी हिंदू धर्मात जन्माला आलो आहे. माझ्या श्रद्धेनुसार गर्भ किंवा भ्रूण हा केवळ पेशींचा समूह नसतो. तर ती एका जीवाची सुरुवात असते…. एका आत्म्याचे निवासस्थान असते.”

    कोर्टरूम पूर्णपणे शांत होते.

    “माझ्या धार्मिक आणि वैयक्तिक विश्वासानुसार भ्रूणाचा अकारण नाश करणे, हे अत्यंत मोठे पाप कृत्य आहे. मी माझी श्रद्धा कोणावरही लादण्याचा प्रयत्न करत नसून माझ्या अंतरात्म्याला जे योग्य वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ”

    त्याने न्यायालयाकडे पाहिले.

    “मला माहिती आहे की, हे न्यायालय धार्मिक श्रद्धेवर निर्णय देणार नाही… आणि तसे व्हावे, अशी माझी अपेक्षाही नाही. पण मी ज्या संस्कारांत वाढलो, ज्या मूल्यांमध्ये जगलो, त्यांच्यामुळे हे भ्रूण नष्ट करण्यासाठी संमती देणे माझ्यासाठी अशक्य आहे.”

    हेही वाचा – संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?

    आता त्याचा आवाज अधिक ठाम झाला.

    “मी न्यायालयाकडे विशेष सवलत मागत नाही. मी कोणाचा अधिकार हिरावून घेत नाही. मी सरकारकडून आर्थिक मदत मागत नाही. मी कोणावरही कोणतीही जबाबदारी टाकत नाही. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे — पिता म्हणून त्या बालकाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी त्याचे संगोपन करू इच्छितो… त्याचा प्रेमाने सांभाळ करू इच्छितो… त्याचा पिता होऊ इच्छितो.”

    तो काही क्षण थांबला… मग शेवटचे शब्द उच्चारले…

    “आज न्यायालयासमोर उभा राहून एखादा कायदेशीर मुद्दा मांडत नाही. मी न्यायालयाला सानिकाच्या मनात काय होते, हे ठरवण्याची विनंती करत नाही. माझी प्रिय पत्नी आणि लाडकी मुलगी दुर्दैवाने मी गमावली, आता एक अजून न जन्मलेलं मूल गमावण्याची परवानगी माझ्याकडून मागितली जात आहे.”

    त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

    “माय लॉर्ड, मी त्या जीवाला जन्म देण्याचा अधिकार नव्हे तर, त्याचा बाप म्हणून त्याच्यावतीने मी फक्त त्याला जन्म घेण्याची संधी मागतो आहे.”

    कोर्टरूममध्ये इतकी शांतता पसरली होती की, एखाद्या कागदाची सळसळही ऐकू आली असती!

    आज प्रथमच अनिकेत पुरंदरे एक व्यक्ती म्हणून काय आहेत, हे स्पष्ट झाले होते.

    क्रमश:

    (Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026 ललित

    कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’

    June 29, 2026 ललित

    संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?

    June 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आजच्या भाजीचा बेत…

    By सुरेखा मोंडकरJune 30, 2026

    रोजची भाजी ‘अहो’च आणतात. नेहमीप्रमाणे बाहेर जाताना विचारलंच, “भाजी कोणती आणू?” (अत्यंत आज्ञाधारक आहेत बरं…

    कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’

    June 29, 2026

    संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?

    June 29, 2026

    आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?

    June 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रोमां कवण पेरी, कोण समुद्र भरी

    June 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जून 2026

    June 30, 2026

    बेबी स्वामीचरणी रुजू झाली…

    June 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 344
    • अवांतर 192
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 472
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 229
    • मैत्रीण 23
    • ललित 747
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!

    June 30, 2026

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026

    आजच्या भाजीचा बेत…

    June 30, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.