Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!
    फूड काॅर्नर

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJune 5, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, स्वादिष्ट कढीगोळे, कढीगोळे रेसिपी, विदर्भ स्पेशल कढीगोळे, कढीगोळे विदर्भ रेसिपी, विदर्भातील कढीगोळे, चटपटीत कढीगोळे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कढी हा प्रकार बहुतांश भारतीयांचा आवडता प्रकार आहे. ठिकठिकाणी कढी करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. काही लोकांना तुपाच्या फोडणीतील कढी आवडते तर, काहींना तेलाच्या फोडणीतील, काही लोकांना जरा आंबट कढी आवडते तर काहींना गोडसर चवीची, काहींना पातळसर कढी आवडते तर, काहींना घट्टसर, काही लोकांना दह्याची केलेली कढी चालते तर काहींचा आग्रहच असतो की, लोणी काढलेलं ताक असेल तरच कढी करावी नाहीतर नाही! बरं त्याच्या फोडणीत कढीपत्ता, जिरं, जाड मोहरी/ बारीक मोहरी किती आणि कसे वापरायचे तेही प्रमाण त्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडी निवडीनुसार ठरते. फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि आलं वापरायचं की लसूणही घालायचा, यावरूनही बरीच काथ्याकूट होते. काहींना कढीपत्ता वगैरे दाताखाली आलेला अजिबात आवडत नाही, तर माझ्यासारखी कढीपत्ता चावून खाणारी माणसं निराळीच म्हणावी लागतील! कढी अजिबात न आवडणारे लोकही आहेत, परंतु हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे… म्हणतात ना “व्यक्ती तितक्या प्रवृत्ती!”

    मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात कढीपकोडा हा प्रकार फार प्रचलित आहे. गुजराती लोक गोडसर आणि घट्ट कढी पसंत करतात. आमच्या नागपूरमध्ये सांबारवडी, समोसा यासोबत चाटवाल्यांकडे कढी देतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमांना लागून असल्यामुळे नागपूरच्या आहार पद्धतीमध्ये संमिश्रता आढळते. अशा या कढीच्या विविध प्रकारातीलच विदर्भात बहुतेक सगळ्याच लोकांचा आवडीचा प्रकार म्हणजे कढीगोळे! याची रेसिपी आपण पाहूयात –

    कढीचे साहित्य

    • ताक – अर्धा लिटर
    • बेसन – दोन चमचे
    • पाणी – एक ते दीड वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • तूप किंवा तेल – एक पळी
    • मोहरी – एक चमचा
    • जिरं – एक चमचा
    • हिंग – एक लहान चमचा
    • हळद – अर्धा चमचा
    • काळीमिरी – तीन ते चार दाणे
    • लवंग – तीन ते चार
    • मेथीदाणे – चार ते पाच
    • हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट
    • कढीपत्ता – सात ते आठ पाने
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी छोटी वाटी

    कृती

    1. अर्धा लिटर ताकात एक ते दीड वाटी पाणी घालून त्याला दोन चमचे बेसन लावावे.
    2. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकून ताक घुसळून घ्यावे.
    3. कढईत एक पळी तूप किंवा तेल घेऊन ते तापले की, त्यामध्ये एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे टाकून ते तडतडल्यावर गॅस मंद करुन एक लहान चमचा हिंग टाकावा.
    4. नंतर त्यात सात-आठ कढीपत्त्याची पाने टाकून तीन-चार मिरे, लवंग आणि चार-पाच  मेथीदाणे टाकून नंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून ती पेस्ट थोडी परतून अर्धा चमचा हळद टाकायची.
    5. या फोडणीमध्ये घुसळलेले ताक टाकावे आणि पळीने सर्व मिश्रण एकदा ढवळून घ्यावे.
    6. खमंग कढी उकळत आली की, वरून परत एकदा कोथिंबीर पेरून मंद गॅसवरच थोडी आणखी उकळून घ्यावी.
    7. कढी उकळत असतानाच त्यात चणाडाळीचे गोळे हळूवारपणे सोडावे आणि कढीला अधून मधून ढवळत मंद गॅसवर कढीगोळे उकळून घ्यावे.

    हेही वाचा – Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा

    टीप्स

    • काळे मिरे, लवंग व मेथीदाणा टाकल्याने कढीला खमंग चव येते.
    • विदर्भात कढी ही बहुतेक तेलाच्या फोडणीची करतात.

    कढीतील गोळ्यांसाठी साहित्य

    • चणाडाळ – दोन वाट्या (तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवलेली)
    • हिरव्या मिरच्या – चार
    • लसूण पाकळ्या – सात ते आठ
    • आले – साधारणपणे दोन इंच
    • जिरे – एक चमचा
    • मीठ – चवीनुसारर
    • बरीक चिरलेली कोथिंबीर – मूठभर

    कृती

    1. तीन ते चार तास भिजवलेली चणाडाळ पाण्यातून उपसून कापडावर थोडी वाळत ठेवावी. म्हणजे त्यातील ओलसरपणा थोडा कमी होईल, जेणेकरून त्याचे गोळे सैल होऊन कढी उकळताना फुटणार नाहीत.
    2. ही चणाडाळ वाटताना हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे, मीठ आणि कोथिंबीर टाकावी. या मिश्रणाचा जाडसर भरडा वाटून घ्यावा.
    3. या भरड्याचे आपल्याला हवे तसे गोळे तयार करावेत आणि कढी तयार करून ती उकळली की, त्यात हे गोळे सोडावेत.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

    टीप्स

    • हे गोळे सैलसर वाटत असतील तर, एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवावे आणि चाळणीवर तेलाचा हात लावून ती त्यावर ठेवावी आणि त्यात हे गोळे वाफवून घ्यावेत.
    • कढी गोळे करताना कढी थोडी पातळसर केल्यास चणाडाळीचे गोळे बाधत नाहीत.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर किंवा

      9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

      तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    By Team AvaantarJune 3, 2026

    पंचरस आमटी साहित्य तुरीची डाळ – एक वाटी कच्ची केळी – चार लहान वांगे -…

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026

    Dnyaneshwari : कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें

    June 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 05 जून 2026

    June 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 319
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 443
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 680
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.