Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 10, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, भातावरचे पिठले, पिठले, विदर्भ स्पेशल, Bhatawarche Pithale, Pithale, Vidarbha special, Bhatawarche Pithle, Pithle
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    भातावरचे पिठले हा एक भन्नाट स्वादिष्ट पदार्थ आहे. ‘वन पॉट मिल’ या संकल्पनेत हा पदार्थ चपखल बसतो. कमीत कमी वेळेत पोटभर आणि चविष्ट पदार्थ काय करता येईल, याचे उत्तर शोधतानाच अशा ‘वन पॅाट मिल’ असलेल्या बिर्याणी, गोळाभात, वडाभात, खिचडी, दाल खिचडी इत्यादी पदार्थांचा शोध लागला असावा. ‘भातावरचे पिठले’  हा देखील त्यापैकीच एक. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ कसा तयार करायचा ते!

    साहित्य

    • तांदूळ – 1 वाटी
    • बेसन – अर्धी वाटी
    • हिरव्या मिरच्या – 2-3
    • आलं – 1 इंच
    • लसूण – 4 ते 5 पाकळ्या
    • कोथिंबीरी – 1 वाटी
    • कांदा – 1 (मध्यम आकाराचा)
    • तिखट – दोन ते अडीच चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • हळद – 1 चमचा
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • जिरे – 1 लहान चमचा
    • हिंग – चिमुटभर
    • तेल – अर्धा पळी

    पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी

    तयारीला लागणारा वेळ – तयारीसह अर्धातास

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    कृती

    1. तांदूळ स्वच्छ धुवावेत. त्यानंतर तांदळाच्या अडीचपट म्हणजे एक वाटी तांदळाला अडीच वाट्या पाणी घालून भात एका मोकळ्या भांड्यात शिजायला ठेवावा. (भात मऊसर शिजवावा लागतो.)
    2. भात शिजेपर्यंत आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची जाडसर पेस्ट करून घ्यावी.
    3. एक भांड्यात अर्धी वाटी बेसन घेऊन त्यात तयार केलेली पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि हिंग टाकावे. हे बेसन सरसरीत भिजवून घ्यावे.
    4. आता भातावरील ताटली काढून भातामधील पाणी कमी झाले असेल आणि भाताची शिते शिजली असतील तर त्यावर बेसनाचा घोळ गोलाकार पसरवून टाकावा आणि त्यावर ताटली ठेवून मंद आचेवर भातासह बेसन शिजू द्यावे.
    5. एका कढईत अर्धी पळी तेल घालून ते तापले की, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतवून घ्यावेत. त्यानंतर लगेच चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर झाला की, अगदी चिमूटभर हळद घालावी आणि ही फोडणी भातावरच्या पिठल्यावर टाकून एखादा मिनिट त्या भाताला वाफ येऊ द्यावी.
    6. एका मिनिटाने भातावरची ताटली काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
    7. अशा प्रकारे केवळ दहा मिनिटात ‘भातावरचे पिठले’ हा अप्रतिम चवीचा पदार्थ तयार होतो.

    हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…

    टीप

    • या पिठल्याकरता बेसनाचा घोळ तयार करताना पाण्याऐवजी ताकही वापरू शकता.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ताक…

    August 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…

    August 18, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    ताक…

    By पराग गोडबोलेAugust 22, 2026

    का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस…

    Recipe : चटपटीत मुटके कढी भात

    August 19, 2026

    Kitchen Tips : अननसाचा मुरंबा, सफरचंदाचे मिल्कशेक, पेरूचे पंचामृत…

    August 18, 2026

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 868
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.