Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिक्षा नको, सुसंवाद हवा
    शैक्षणिक

    शिक्षा नको, सुसंवाद हवा

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 26, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, महाविद्याल, अनीश_देशपांडे, सुसंवादाची_गरज, पालक_विद्यार्थी, विद्यार्थी_पालक, शिक्षक_पालक
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अर्चना कुलकर्णी

    दुपारी चार वाजता राऊंड घेऊन मी माझ्या केबिनकडे वळले. केबिनच्या बाहेर एक गृहस्थ माझी वाट पाहत उभे होते; मला पाहताच त्यांनी हसून नमस्कार केला. मी देखील हसून नमस्कार केला, ‌चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. चालता चालताच मी त्यांना म्हटलं, “या.”

    “थँक्यू,” असं म्हणत ते केबिनमध्ये आले. मी त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली. ‌खुर्चीत बसल्यावर ते बोलू लागले, “मी चंद्रकांत देशपांडे. अकरावीतला अनीश देशपांडे माझा मुलगा.”

    “अच्छा आपण अनीशचे वडील..!”

    “हो, आज ऑफिसमधून लवकर घरी जात होतो. तुम्हाला भेटायला मुद्दाम आलो.”

    ते उत्साहाने बोलत होते.

    “अनीश तुमच्या कॉलेजमध्ये रमला आहे. ‌त्याला मार्क्सदेखील चांगले मिळाले आहेत‌, पहिल्या सत्रातल्या परीक्षेत. मुख्य म्हणजे तो नियमित येतो. चांगला वागतो. याचा मला फार आनंद होतो.”

    देशपांडे यांचे बोलणे ऐकता ऐकता अनीशचा पहिल्या सत्रातला इतिहास माझ्या डोळ्यांसमोर झरझर येऊन गेला.

    अनीश देशपांडे, अकरावीच्या दोन्ही तुकड्यांमध्ये सर्वात जास्त बेशिस्त मुलगा. वारंवार गैरहजर राहणे, जॉब, जर्नल्स, ट्युटोरिअल्स, होमवर्क अपूर्ण असणे अशी सर्व शिक्षकांची त्याच्याविरुद्ध तक्रार असायची. वर्गात, प्रयोगशाळेत आणि वर्कशॉपमध्ये काम करताना त्याचे लक्ष नसायचे‌. अतिशय बेजबाबदार आणि बेफिकीर विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या वागणुकीत सुधारणा होण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ गेले.‌ पहिल्या सत्रात त्याच्या पालकांना पाचवेळा बोलावले‌. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी त्याची आईच भेटायला आली. अनीश विषयीच्या तक्रारी त्या निमूटपणे ऐकून घ्यायच्या.

    “तुम्हीच सांगा मॅडम आता मी काय करू?” या प्रश्नाने चर्चेची सांगता व्हायची‌. दुसऱ्या सत्रात त्या आल्या त्यावेळी मी त्यांना निक्षून सांगितले, “पुढच्यावेळी तुमच्याबरोबर अनीशचे बाबा आले तरच अनीशविषयी चर्चा केली जाईल.”

    या पार्श्वभूमीवर देशपांडे यांचे बोलणे ऐकून मला फारच आश्चर्य वाटले. देशपांडे यांचे बोलणे थांबवत मी त्यांना विचारले, “एक मिनीट मिस्टर देशपांडे, आपण हे जे बोलत आहात ते आपल्याला कोणी सांगितलं?”

    “कोणी म्हणजे अनीशची आई सांगते नेहमी, तुमच्या कॉलेजविषयी आणि अनीशविषयी‌.”

    “आय एम सॉरी टू से मिस्टर देशपांडे, पण वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे.”

    देशपांडे यांच्या चेहऱ्यावरील रेषा भराभर बदलल्या.

    “म्हणजे काय? काय म्हणायचे काय तुम्हाला?”

    “यावर्षीच्या अकरावीच्या बॅचमध्ये सर्वात irregular स्टुडंट म्हणजे अनीश..! त्याचं वर्गात शिक्षकांच्या शिकवण्याकडे तसेच प्रयोगशाळेत आणि वर्कशॉपमध्ये काम करण्याकडे अजिबात लक्ष नसतं‌, त्याचे सबमिशनही कधी पूर्ण नसतं.

    “असं कसं शक्य आहे…?”

    पूर्ण परिस्थिती लक्षात येताच देशपांडे खूप संतापले… “मी बघतोच आता दोघांकडे,” असं म्हणून खुर्चीतून उठून ते जायला निघाले. मी त्यांना थांबवत म्हटलं, “शांत व्हा मिस्टर देशपांडे, प्लीज बसा तुम्ही. आपण शांतपणे बोलूया या विषयावर.”

    “अहो कसा शांत राहू…? मला खोटे रिपोर्ट दिले. त्याला काही अर्थ आहे का?”

    “प्लीज तुम्ही शांत व्हा आधी.”

    त्यांना पाण्याचा ग्लास देत मी म्हटलं. चहा घेतल्यानंतर देशपांडे जरा शांत झाल्याची खात्री पटल्यावरच मी त्यांना विचारलं,

    “मिस्टर देशपांडे, अनीश कॉलेजमध्ये बरेचदा अॅबसेंट असतो, हे त्याच्या आईने तुम्हाला सांगितले असते तर काय झालं असतं…?”

    “दोन मुस्कटात मारल्या असत्या मी त्याच्या. एक दिवस उपाशी ठेवलं असतं, मग बरोबर ठिकाणावर आला असता.”

    देशपांडे तावातावाने उत्तरले.

    “म्हणूनच या गोष्टी तुमच्या कानावर पडल्या नाहीत, मिस्टर देशपांडे.”

    आता देशपांडे भुवया उंचावून माझ्याकडे पाहू लागले. मी पुढे म्हटले, “मुलांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी त्यांना मारणं, त्यांना उपाशी ठेवणं हा उपाय असूच शकत नाही.”

    देशपांडे यांच्या चेहऱ्यावर आता कुतूहल उमटले.

    “मुलांना मारणे, शिक्षा करणे यापेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्यांच्याशी प्रेमाने वागावे. काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या कराव्यात, त्या आपल्याला पटत नसल्या तरी. मुख्य म्हणजे, मुलांशी आपला सुसंवाद असला पाहिजे. तरच ते त्यांच्या मनातल्या गोष्टी,  शाळेतल्या मित्रां-मित्रांमधील सर्व गोष्टी आपल्याला विश्वासाने सांगतील. त्यांच्या सांगण्यावरून ते चुकीचे वागतात असं वाटलं तर, सौम्य भाषेत त्यांना समजवावे आणि युक्तीने त्यांना चुकांपासून परावृत्त करावे. आपण मुलांपेक्षा बरेच पावसाळे जास्त पाहिलेले असतात. आपलं नातंदेखील ज्येष्ठत्वाचे असते, त्याप्रमाणे आपल्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात प्रगल्भता असली पाहिजे. मुलं आनंदी राहिली, आपल्या पालकांचे आपल्यावर खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे याची खात्री त्यांना असली तर, ते चुका करणार नाहीत.

    असं बघा आपल्या घरातलं वॉशिंग मशीन जर बिघडलं, म्हणजे चांगलं काम करत नसेल तर, आपण त्याला मारतो का? त्याचं खाणं म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय बंद करतो का? नाही ना? आपण काय करतो? ते का चालत नाही? काय दुरुस्ती केली म्हणजे ते चांगलं चालेल? आपलं काही चुकलं का ऑपरेट करताना? असा विचार करतो. त्याला दुरुस्त करण्याची सोय करतो.”

    काही क्षण थांबून मी पुढे बोलले, “अहो, निर्जीव मशीनचा आपण इतका विचार करतो आणि आपल्या पोटच्या मुलांच्या चुकांच्या बाबत, त्याच्या बिघडण्याच्या बाबत हा विचार का करत नाही?”

    माझे बोलणे देशपांडे यांना पटते आहे, असे वाटल्यामुळे मी पुढे बोलले,

    “अनीशला शिस्त लावण्यासाठी तुम्ही कठोर वागत असाल, ते नक्कीच त्याच्या भल्यासाठी. पण या कठोर वागण्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होत आहे, याचा विचार तुम्ही कधी केला का? मन दुखावलेला, संतापलेला मुलगा चांगलं काम करण्याची अपेक्षा कशी पूर्ण करू शकेल?”

    बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. ती शांतता भंग करून मीच मग बोलले, “अनीश खूप चांगला मुलगा आहे. हुशार आहे. त्याची काळजी घ्या. बघा तुमच्या अपेक्षेपेक्षा तो जास्त चांगला वागेल.”

    “ठीक आहे,” असे म्हणून देशपांडे खुर्चीतून उठले.

    “थँक्स,” एवढेच बोलून ते केबिन बाहेर पडले. मला खात्री होती आता अनीशच्या विरुद्ध यापुढे कुठलीही तक्रार येणार नाही आणि तसेच झाले…!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    By Team AvaantarMay 20, 2026

    डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील…

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.