Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सारं काही रंगभूमीसाठी!
    ललित

    सारं काही रंगभूमीसाठी!

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करJune 27, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, सारं काही रंगभूमीसाठी, सच्चा कलावंताची तळमळ, सुदर्शनची देवव्रत भूमिका, प्रतिस्पर्ध्याच्या नाटकात काम, संगीत मत्स्यगंधाचे सादरीकरण, नटराज ग्रुपकडून संगीत मत्स्यगंधा, साईनाथ ग्रुपकडून संगीत मत्स्यगंधा, कला सर्वश्रेष्ठ,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साईनाथ नाट्यमंडळाने संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटक सादर केलं. नाट्यमंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याने देवव्रत भूमिका साकारली. तर, ज्योतीने सत्यववती, अरुणने चंडोलच, मनोजने पराशरची भूमिका केली. विशेष म्हणजे, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा या नाट्यमंडळाचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा ‘मत्स्यगंधा’ हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते. आधी साईनाथ नाट्यमंडळाचे नाटक झाले आणि नंतर नटराज ग्रुपचे होणार होते. प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता.

    नटराज नाट्य ग्रुपचा ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते. त्यानुसार ही मंडळी पुन्हा जमा झाली एक ट्रॅव्हलर घेऊन तिथे गेली. सुदर्शन आणि बाकी ग्रुपमधील इतर मंडळी आत गेली, नटराजच्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.

    सुदर्शन – अन्या, जाडा झालास की रे, व्यायाम करत नाहीस काय?

    अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.

    ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस..

    अनिल – हो ग, आज थकवा आलाय, प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.

    सुदर्शन – हो बाबा, रोज चालणं महत्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.

    सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तोपर्यंत नाटकाची पहिली घंटा झाली होती. दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन, ज्योती, मनोज, अरुणा आत जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली. परीक्षक स्थानापन्न झाले, संगीत साथ करणारे, प्रकाश योजना करणारा आपआपल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली, मग पात्रपरिचय आणि नाटक सुरू झाले.

    हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    संगीत नाट्यस्पर्धेतील आठवा दिवस… आज आठव्या दिवशी नटराज ग्रुपचे नाटक ‘संगीत मत्स्यगंधा’ सुरू झाले. तिसऱ्या दिवशी एवढी गर्दी नव्हती, कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती, जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तसतशी गर्दी वाढत होती आणि आज शनिवार असल्यामुळे असेल, नाटकाला सातशेहून जास्त प्रेक्षक हजर होते. एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची सदस्य खूश होते.

    नाटक सुरू झाले… सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरू झाला, मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी, त्या गाण्यांनी प्रेक्षक खूश झाले, ‘वन्स मोअर’ मिळत गेले.

    दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट, शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं, तिच्यासाठी झुरणं, आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा… सुदर्शन आणि ग्रुप सरसावून बसला. देवव्रत स्टेजवर किती आत्मविश्वासाने बोलतो, यावर नाटकाचा कस लागणार होता… कारण, वाचिक अभिनयाची, मोठ्या दर्जाची, तिथे गरज होती.

    देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला, त्याचे पहिलेच वाक्य –

    “भिवरा, तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला आलो आहे.”

    खरेतर, ते देवव्रतासाठी महत्त्वाचे वाक्य. पण अनिलने मुळमुळीत म्हटले. संवाद सुरू होते, सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतषबाजी व्हायला हवी होती, पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित, तो फिका पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती…

    प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनाच्या कानात म्हणाली “आज अन्या मूडमध्ये नाही, कमी पडतोय. तुझा देवव्रत किती तरी श्रेष्ठ होता.”

    दुसरा अंक संपला आणि पडदा पडला. इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या. डावा हात दुखू लागला. छाती जड झाली. छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कण्हू लागला. त्याच्याकडे सर्व मंडळी धावली. अजितच्या लक्षात आले, बहुतेक हार्ट अटॅक येतो आहे… तो धावत स्टेजवर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली.

    संगीत नाटक म्हणून डॉ. विभुते बायकोसह आले होते. त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत आले. त्यांनी टेबलावर विव्हळणाऱ्या अनिलला पाहिले, त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले, हार्ट अटॅक आला आहे, याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहें.

    डॉक्टरनी त्यांच्या पाकिटातील सोरबिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले. तोपर्यंत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती. घाम पुसत होती. छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती.

    सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि तो पण आत आला. अनिलची परिस्थिती त्याने पाहिली, त्याला आठवले, नाटक सुरू व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आले होते, आज अन्याची तब्येत बरी दिसत नाही, त्याला श्वास लागत होता, म्हणून!

    डॉ. विभुते यांनी सोरबिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित, अनिलच्या छातीत दुखणे थोडे कमी झाले, घाम थांबला. डॉक्टरांनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले “आता काळजी करू नका, मी डॉ. भागवत हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करतोय. हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरू ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्यासोबत राहतील.”

    डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.

    प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले… काही म्हणाले, “आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरू करा, आम्हाला नाटक पाहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.”

    काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव, आमास्नी नाटक बघायचं हाय.”

    काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्त्वाची भूमिका कोण करेल? एवढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने यावर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”

    अजितच्या लक्षात आले, “होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की! नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत.” तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला, “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”

    “होय खरे आहे, पण आता काय करणार?”

    “तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला-दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पाहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी…”

    सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?

    हेही वाचा – पाप आणि पुण्य

    तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्यांना पण अजितचा प्रस्ताव आश्चर्यकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्यांचा प्रतिस्पर्धीही होता, गेल्या कित्येक वर्षांचा. ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला प्रतिस्पर्धी असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण.”

    मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.

    सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्माचा पुढचा भाग करणार, हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली. ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटकादरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार आहोत… स्पर्धेसाठी नाटक पूर्ण होणे चांगले”.

    तोपर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्रॉम्प्टिंगवर बोलेल, दहा मिनिटं बघू नाहीतर सटकू..

    पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते त्यांना, प्रतिस्पर्धी ग्रुपमधील कलाकार आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला, याचे कौतुक वाटत होते. आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुपमध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.

    आतमध्ये सुदर्शन मेकअपला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुपमधील इतर साथीदार डोळ्यांसमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहे, हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई-वडिलांना नमस्कार केला, ‘आज मला यश द्या’, असं मनात म्हणत राहिला.

    सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेजवरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला. त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवतीसोबत आणि चंडोल झालेल्या मोहनसोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली… पडदा उघडला.

    तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरामधील संवाद सुरू होते, तेव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्रीसाठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत, यावर भिवर काही म्हणणार एवढ्यात देवव्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो.”

    सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे… आणि मग सुरू झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये…. कानेटकरांनी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारता येणे साध्या नटाचे काम नव्हे!

    एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेजवरील आणि विंगेत राहून पाहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्मदर्शनाने आश्चर्यचकित झाले होते. आज स्वतः सुदर्शन खूश होता, त्या दिवशी तो मूडमध्ये आला नव्हता, पण मोठी जबाबदारी पडली. त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता…

    शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्वीकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल, असा शाप मागते आणि भीष्म तो देतो… पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.

    आज काहीतरी विलक्षण पाहिले, असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.

    नटराज नाट्यग्रुपचे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती… Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.

    सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पाहात होते, आजची सुदर्शनची भीष्माची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.

    दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमीवर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुपमध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.

    नाटक मधेच सोडून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले… आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,

    “दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”

    त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”

    “होय दोस्ता, रंगभूमी आहे म्हणूनच आपण आहोत.”

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    मारवाडी…

    June 27, 2026 ललित

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026 ललित

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मारवाडी…

    By पराग गोडबोलेJune 27, 2026

    पुण्याच्या विस्तारीत उपनगरातला, एक नव्यानेच उदयाला येत असणारा निवासी भाग. काही इमारतींमध्ये राहणारे रहिवासी, काही…

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026

     ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!

    June 27, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 341
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 741
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.