Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी
    अवांतर

    कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉ कार्लो उर्बानी, डॉक्टर कार्लो उर्बानी, इटालियन कार्लो उर्बानी, सार्स, डब्ल्यूएचओ, SARS,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    आपल्याकडं पेशंटला “खोकून दाखवा” म्हटलं की, तो तोंडावरच खोकतो! त्यामुळं कितीही जपलं तरी, डॉक्टरलाही विशेषत:, साथीच्या काळात संसर्गाला सामोरं जावंच लागतं… आताही तीच परिस्थिती आहे. तूर्तास चहाऐवजी काढा पितोय, नियमितपणे मास्कही वापरतोय तरी मधेच एखादा पेशंट असा काही भयंकर खोकतो की, ही सगळी कवचकुंडलं तेलुगू सिनेमात दाखवतात तशी स्लो मोशनमध्ये गळून पडतात आणि सगळे संमिश्र विषाणू जणू काही चहूबाजूंनी सपऽसपऽऽसपऽऽ आवाज करत श्वसनयंत्रणेवर हल्ला करतात…

    घरी पोहोचतात घसा धरलेला असतो, मधेच खोकल्याची उबळ येते, अंगात किंचित तापही जाणवतो आणि एक मन “उद्या आराम करू,” असं म्हणतं, पण युद्धजन्य काळात किंवा छोट्यामोठ्या चकमकी सुरू असतात, तेव्हा तर आपली ‘खरी’ गरज असते, हे जाणवतं आणि डॉक्टर कार्लो उर्बानीला नमन करत मी दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडीला हजर होतो!

    कोण कार्लो उर्बानी? थांबा आज त्यांचीच गोष्ट सांगतो…

    साल असावं 2003… व्हिएतनाममधील ‘हनोई’ शहरातलं एक साधं रुग्णालय आणि एका खाटेवर पडलेला रुग्ण… साधा ताप-खोकलाच होता, पण काहीतरी वेगळंही जाणवतही होतं… डोळ्यांना न दिसणारं, पण अनुभवी डॉक्टरला अस्वस्थ करणारं…

    त्या खाटेजवळ उभे होते डॉक्टर कार्लो उर्बानी. इटलीत जन्मलेले पण जगभर फिरून गरिबांच्या साथीच्या रोगांशी झुंज देणारे डॉक्टर… ‘डॉक्टर विदाऊट बॉर्डर्स’चे सदस्य आणि डब्ल्यूएचओचे (WHO) तत्कालीन संसर्गरोग तज्ज्ञ.

    हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

    रुग्णाकडं पाहताक्षणीच त्यांना जाणवलं, ‘हा साधा न्यूमोनिया नाही.’ रुग्णाची एक खोकल्याची उबळ आणि पाठोपाठ तिथला एकेक जण संक्रमित… एकेक नर्स, एकेक डॉक्टर आजारी पडू लागले. त्यांना श्वास घेणं कठीण होत होतं. औषधं घेऊनही फरक पडत नव्हता… डॉक्टर उर्बानी सतर्क झाले, पण ते घाबरले नाहीत… पळाले तर अजिब्बात नाहीत! त्यांनी WHO ला तातडीचा इशारा दिला, “हा नवा, अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे. त्वरित विलगीकरण आणि प्रवास निर्बंध गरजेचे आहेत.”

    त्या एका फोन कॉलने जगाची दिशा बदलली. हनोई रुग्णालय बंद करण्यात आलं. रुग्ण विलगीकरणात गेले. विमानतळांवर तपासणी सुरू झाली… सार्स अर्थात ‘सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ (Severe Acute Respiratory Syndrome – SARS) या नावानं जग पहिल्यांदाच हादरलं… पण तोवर उशीर झाला होता..

    रुग्णांची तपासणी करताना, त्यांना धीर देताना, त्यांचे हात धरताना विषाणू शांतपणे डॉक्टर उर्बानी यांच्या शरीरात प्रवेश करून बसला होता… एक दिवस प्रवासात असतानाच त्यांना ताप आला, पण ते घाबरले नाहीत; ते कर्तव्यनिष्ठ डॅाक्टर असण्यासोबतच जबाबदार नागरिकही होते. थायलंडमध्ये विमान उतरताच त्यांनी स्वतःच सांगितलं, “मला विलगीकरणात ठेवा. मी संसर्गजन्य असू शकतो.”

    क्षणभर विचार करा, एक डॉक्टर जो स्वतःला ‘रुग्ण’ ठरवतो, कारण जग सुरक्षित राहावं!

    रुग्णालयाच्या एका स्वतंत्र खोलीत ऑक्सिजनवर असताना, ते सतत विचारत होते, “इतरांना संसर्ग तर झाला नाही ना? माझ्या सहकाऱ्यांना सांगा काळजी घ्या.”

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    29 मार्च 2003… वय अवघं 46 वर्षे… सार्सनं त्यांचा श्वास कायमचा थांबवला. पण त्यांनी दिलेला इशारा जगाला श्वास देऊन गेला. त्यांच्या वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे हजारो जीव वाचले… जागतिक साथीला आवर घालण्यात मोठी मदत झाली.

    आज जेव्हा आपण साथींबद्दल,विलगीकरणाबद्दल, संसर्ग नियंत्रणाबद्दल बोलतो तेव्हा त्या संकल्पनांमागे उभा आहे, एक शांत विनम्र डॉक्टर… ज्यानं जगाला वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य दिलं! डॉक्टर कार्लो उर्बानी, हे फक्त नाव नाही, ते कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक आहे!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026 अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    By Team AvaantarJune 21, 2026

    सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं……

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 732
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.