Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 30 ऑगस्ट 2026

    August 30, 2026

    कोलांटी उडी

    August 29, 2026

    श्रमिक

    August 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 29, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं । हें मानी तो सपिली । मुकला जेवीं ॥766॥ तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी । तंव जो न करी । व्याधीचिंता ॥767॥ आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे । तेणें रजें डोळे । जाती जयाचे ॥768॥ सवळेचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हें दुःख पुढील । देखेना जो ॥769॥ तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥770॥ वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥771॥ न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी । चिंतू नये तें विचारी । जयाची मती ॥772॥ रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें । स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥773॥ न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे । न खावें तें खाये । तेवींचि तोषे ॥774॥ न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥775॥ नायकावें तें आइके । न बोलावें तें भुंके । परि दोष होईल हें न देखे । प्रवर्ततां ॥776॥ अंगा मनासि रुची यावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें । जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥777॥ परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हें कांहींचि पुढील । देखेना जो ॥778॥ तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें । जें सज्ञानाही संगें । झोंबों सके ॥779॥ असो हें आइक । अज्ञानचिन्हें आणिक । जेणें तुज सम्यक् । जाणवे तें ॥780॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    अर्थ

    शत्रूला झोप लागली, एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडणतंटे संपले (असे मानून जो स्वस्थ राहतो), तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो ॥766॥ त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही ॥767॥ आणि स्त्रीपुत्रादिकांच्या संगतीत जसजशी संपत्ति अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो, ॥768॥ या स्त्रीपुत्रादि व संपति यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढचे दु:ख जो आगाऊ जाणत नाही ॥769॥ अर्जुना, तो अज्ञानी आहे आणि जो इंद्रियांना हवे ते विषय देतो, तो देखील तोच (अज्ञानीच) समजावा. ॥770॥ तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साहाय्याने, जो सेवन करण्य़ास योग्य-अयोग्य अशी निवड न करता, सरसकट विषय सेवन करतो ॥771॥ जे करू नये ते करतो, न होणार्‍या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते ॥772॥ जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो ॥773॥ जेथे जाऊ नये, तेथे जातो, जे पाहू नये ते पाहतो व खाऊ नये, ते खातो व (ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता) त्याविषयी आनंद मानतो ॥774॥ ज्याची संगती धरू नये, त्याची धरतो, जेथे संबंध करू नये, तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे जो आचरण करतो. ॥775॥ जे ऐकू नये, ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पाहात नाही. ॥776॥ शरीरास व मनास आवडेल तेवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य आहे किंवा नाही, याचा काही तो विचार करत नाही व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो ॥777॥ परंतु (यापासून) मला पाप लागेल अथवा (या योगाने) नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील होणार्‍या गोष्टी जो काहीच पहात नाही. ॥778॥ त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. ॥779॥ परंतु हे राहू दे. आणखी काही अज्ञानाची लक्षने सांगतो, ती ऐक. ज्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख पटेल. ॥780॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    August 28, 2026 अध्यात्म

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    August 27, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कडाडीं लोटला गाडा, शिखरौनि सुटला धोंडा

    By Team AvaantarAugust 28, 2026

    अध्याय तेरावा पैं जीविताचेनि सुखें । जैसा कां मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्यतोपे ।…

    मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!

    August 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे

    August 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 30 ऑगस्ट 2026

    August 30, 2026

    कोलांटी उडी

    August 29, 2026

    श्रमिक

    August 29, 2026

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026

    नाते जपूया

    August 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु

    August 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 413
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 556
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 885
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 30 ऑगस्ट 2026

    August 30, 2026

    कोलांटी उडी

    August 29, 2026

    श्रमिक

    August 29, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.