Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 21, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    आणि जयाचां मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगें मिळे जीवें पाठीं । भलतया दे ॥668॥ व्याधाचे चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें । चांगाचीं अंतःकरणें । विरु करी ॥669॥ गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥670॥ अज्ञान तयाचां ठायीं । ठेविलें असे पाहीं । या बोला आन नाहीं । सत्य मानीं ॥671॥ आणि गुरुकुळीं लाजे । जो गुरुभक्ती उभजे । विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि ॥672॥ तयाचें नाव घेणें । हें वाचे शूद्रान्न होणें । परि घडलें लक्षणें । बोलतां इयें ॥673॥ आता गुरुभक्तांचें नांव घेवों । तेणें वाचेसि प्रायश्चित देवों । गुरुसेवका नांव पावों । सूर्य जैसा ॥674॥ येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामीं आला ॥675॥ हा ठायवरी । तया नावांचें भय हरी । मग म्हणे अवधारीं । आणिकें चिन्हें ॥676॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    अर्थ

    आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते (आपल्या मनातील गोष्ट जो दुसर्‍याला कधीही कळू देत नाही) ज्याचे बोलणे व पाहणे वरून वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने (एकाला) मदत करतो व नंतर भलत्यालाच (दुसऱ्याला) मदत करतो ॥668॥ पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते (वरून पाहणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो), त्याप्रमाणे ज्याचे दुसर्‍यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते (पण ते केवळ त्या पोसले जाणार्‍या माणसाच्या घाताकरिताच असते) व जो चांगल्या माणसाची अंत:करणे बिघडवतो ॥669॥ शेवाळाने आच्छादिलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, (परंतु आत कडू असते) तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते, ॥670॥ त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे मान. ॥671॥ आणि गुरुकुळाची ज्याला लाज वाटते, (जो) गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो, ॥672॥ त्या अभक्ताचे नाव घेणे हे (ब्राह्मणाच्या) जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे (म्हणजे पाप करण्यासारखे) आहे. पण काय करावे; अज्ञानाची ही लक्षणे सांगतांना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. ॥673॥ म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे, असे समजा. ॥674॥ एवढ्याने (गुरुभक्ताचे नाव घेतल्याने) ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील, ॥675॥ (गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार) येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय व (दोष) हरण करतो, मग आणखी (अज्ञानाची) चिन्हे ऐक, असे देव म्हणाले. ॥676॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कानडा राजा

    August 20, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    कानडा राजा

    By डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 20, 2026

    कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा… निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा…

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा

    August 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे

    August 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 403
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 543
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 865
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.